क्रांती

 चला राष्ट्रीय क्रांतिकारक बनुया


आमच्या साप्ताहिकाचे संस्थापक संपादक श्री.ए.ज्योतीप्रकाश ( बापू )यांनी माझ्यावर कार्यकारी संपादक पदाची जबाबदारी विश्वासाने टाकली आहे त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभार मानतो.


राष्ट्रीय समाज जागृती द्वारा मृतप्राय भारतीय समाजाला गदगदा हलवुन जागे करणे अन् एक आदर्श नवसमाज निर्मितीचा आमचा ध्यास पूर्ण करणे हाच आमच्या दोघांचा हे साप्ताहिक काढण्यामागचा मूळ उद्देश आहे.आमच्या या कार्यामध्ये समाजातील सर्व स्तरातील व्यक्ती, समुह,समाज यांचा आम्हाला भरभरून प्रतिसाद आणी प्रेम मिळेल व उत्तुंग गरूड भरारी घेण्यासाठी व आमच्या कार्यसफलतेसाठी सामाजिक स्तरावरून आमच्या पंखामध्ये बळ भरले जाईल एवढीच माफक अपेक्षा आम्ही व्यक्त करतो.


समाजातील आत्मग्लानी,मरगळ,निराशा, हतबलता संपवून एक चैतन्य दाई,आदर्श नवसमाज निर्मितीसाठी संपूर्ण देशामध्ये एक शक्तिशाली क्रांतिकारक लाट निर्माण करून त्या लाटेवर स्वार होवून नवराष्ट्र निर्मितीच्या आमच्या संकल्पामध्ये आपण सारे तन,मन,धनाने व समर्पित भावनेने आमची शक्ती, बळ वाढवाल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो.


देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावणारे किंवा वेळप्रसंगी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता हसत फासावर जाणारे महान क्रांतीकारकांचे ते कार्य आठवले की आजही डोळ्यातून घळघळा अश्रुंच्या धारा वाहु लागतात.आज देशातील भयंकर अराजक पाहिले तर असे वाटते की,स्वातंत्र्य प्राप्ती पुर्वीचे ते मंतरलेले दिवस कुठे हरवले ?

का भारतीय समाज हा एवढा अंध,स्वार्थी, मतलबी,अहंकारी बनला ? आत्मतेज का विसरला ? क्रांतीकारकांचे ते महान कार्य का विसरला ? काय व कुठे नेमके ग्रहण लागले या देशाला ? स्वैराचार, दुराचार, भ्रष्टाचार, अनाचार, अत्याचार याची किड का वाढत चालली या देशात ? संस्कार, संस्कृती, सभ्यता, शालीनता,मानवता,भूतदया, पशुपक्षी प्रेम हा देश का विसरत चालला ?

कारणे अनेक असतील.पण आता सगळी कारणे बाजूला सारून एकसंध समाज निर्मीती द्वारा चला एक नवराष्ट्र निर्मीतीचा संकल्प करू या.एक जबरदस्त ध्यास उराशी बाळगून स्वप्न पूर्तीसाठी रात्रंदिवस प्रयत्नांची पराकाष्ठा करून यश खेचून आणु या.

स्वराज्य तर मिळाले. पण सुराज्य निर्मितीचे क्रांतीकारकांचे अधुरे स्वप्न पुरे करू या.

रोम रोम जागवु या.मन मन जागवु या.चैतन्य दाई समाज बनवूया. क्रांतीचे वारे पुन्हा या देशात आणु या.


चला तर मग.उठा,कार्यरत व्हा.


याच निमित्ताने आमच्या साप्ताहिकाचे वाचक,जाहिरात दार,बातमीदार, स्तंभ लेखक,लेखक,कवी,समाज सेवक व सर्वपक्षीय राष्ट्र प्रेमी व्यक्ती या सर्वांचे भरभरून प्रेम मिळेल एवढीच अपेक्षा आम्ही या अंकाच्या प्रथम आवृत्ति प्रकाशनाच्या वेळी व्यक्त करतो.


बाकी वादळी लिखाण पुढील अंकापासून.

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस