बाप,आई आणी सद्गुरू
हक्काने आरडावे ओरडावे,
रागाने डोके बडवून घ्यावे,
भांडावे आदळआपट करावी,
तरी त्याबदल्यात प्रेमच मिळते
तो बाप....
आणी,
काळजावर कितीही आघात केलेतरी दुखा:त हंबरडा फोडून धावत येते अन् वेळप्रसंगी ह्रदयही तळहातावर काढून देते
ती आई....
आणी जन्मोजन्मी सोबत राहून
वारंवार मार्गदर्शन करून शिष्याला ईश्वरस्वरूप बनवते ती
सद्गुरू माऊली....
अशी तीन नाती ज्याला लाभली,
त्याच्या जन्मोजन्मीचे कोट कल्याण झाले असे समजावे.
हरी ओम्
विनोदकुमार महाजन.
Comments
Post a Comment