भारतीय संस्कृती चा आदर्श

 *U turn!*

~~~~~~~

          युरोपमधील फिनलंड या देशातील ही कथा. थॉमस मुर अँड कंपनी या नावाची प्रचंड मोठी आंतरराष्ट्रीय कंपनी.स्वतःची 55 मजली इमारत ही फक्त कंपनीचे ऑफिस होते.विशेष म्हणजे या कंपनीचे फक्त बारा संचालक होते. एकाच कुटुंबाचे हे सर्व सदस्य. होते.प्रत्येक सदस्या साठी. स्वतंत्र पाच मजली इमारती होत्या.या इमारतीं मध्ये मूर कुटुंबीय राहात होते. एकूण बावीस देशात कंपनीची कार्यालये होती. प्रत्येक ठिकाणी कार्यालयाच्या स्वतंत्र इमारती होत्या. सुमारे तीन लाख कर्मचारी कंपनीत काम करीत होते.कंपनीचे अनेक प्रकारचे व्यवसाय होते. फिनलँड मध्ये कंपनीचा स्वतंत्र विमानतळ होता. कंपनीची ३५ विमाने ठीक ठिकाणी जात असत. एवढ्या मोठ्या कंपनीचे व्यवस्थापन पाहणारा विल्यम मूर जगात उत्कृष्ट व्यवस्थापक म्हणून प्रसिद्ध होता. 

          त्याची बायको भारतीय वंशाची होती

सुभद्रा असे तिचे नाव होते.विल्यम तिला सुबा या नावाने हाक मारीत असे. तिचा हि खूप मोठा सहभाग होता. कंपनीचा विस्तार गेल्या पाच वर्षात थांबवला होता. सर्व संचालकांनी सर्वानुमते हा निर्णय घेतला होता.इतकेच काय कंपनीने आपले शेअर्स आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये वाटून टाकले होते. शेअर्सची खरेदी विक्री फक्त थॉमस मूर कंपनी आणि त्यांचे संचालक करीत होते. मार्केट मधून केव्हाच शेअर्स बाहेर पडले होते. कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना आलिशान घरे तसेच वाहने कंपनीने पुरवली होती. शिक्षण आरोग्य सर्व जबाबदारी कंपनी सांभाळत होती. वर्षातून दोन वेळा कर्मचाऱ्यांना कंपनीच्या आलीशान हॉटेल्समध्ये राहण्यासाठी म्हणून कंपनी व्यवस्था करीत होती. कर्मचाऱ्यांची मुले बहुधा कंपनीत रुजू करुन घेतली जात असत. या कंपनीच्या यशाचे कारण कंपनी राजकारणापासून अलिप्त होती. पूर्वी फिनलंड या देशात राजेशाही होती. कंपनीचा मूळपुरुष थॉमस मूर हा एक राजा होता. त्यानंतर संस्थाने खालसा झाली. फिनलंड सरकारने या राजांच्या संपत्तीचे वर्गीकरण करून काही भाग त्यांना  दिला बाकी संपत्ती जप्त करण्यात आली. या पैशातून मूर कंपनीने आपला व्यवसाय सुरू केला वाढवला. सरकार दरबारी या कंपनीचा मोठा दबदबा होता.

          २४ डिसेंबर हा तो दिवस सर्वत्र ख्रिसमसची गडबड चालू होती.पूर्वीपासून कंपनी सर्व कर्मचाऱ्यांना दहा दिवस पूर्ण पगारी सुट्टी देत होती शिवाय विशेष रक्कम गिफ्ट म्हणून दिली जात होती. संचालक मंडळ आपल्या परिवारात देखील या काळात मौल्यवान भेटी देत होते.विल्यम मूर याने आपली पत्नी सूबा तिला सरप्राईज द्यायचे ठरवले. गुलाबी पाकिटात एक पत्र होते. विल्यम म्हणाला.या रविवारी आपण जेव्हा चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जाऊ त्यावेळी प्रार्थनेहून आल्यावर


तू हा लखोटा ओपन कर.असे कोणते रहस्य त्या गुलाबी पाकिटात होते?

    *Dear Suba,*


          *Today I am very happy, satisfied and completely calm.All the credit for this goes to you alone. I still*

*remember the day you chose me as your life partner.*

          *You was  also the only daughter, from a well-known royal family of India. your sound education & your  alertness and dedication helped us for growing our business!*

          अशी सुरुवात करुन,विल्यम्सनी अतिशय भावपूर्ण रितीने,सुबा चे मनःपूर्वक कौतुक आणि आभार मानले!

          खरं तर जेंव्हां फिनलॅंड मधिल संस्थान खालसा झाले,तेव्हा बरिचशी संपत्ती सरकारनी जप्त केलेली होती! थोडी बहूत संपत्ती राजघराण्याच्या ताब्यांत आली,तथापि त्यांतून आज ज्या स्तरावर *थाॅमस मूर* कंपनीचा विश्वव्यापी अवाढव्य पसारा पसरला आहे,तो पसरणे कठीणच होते! *विल्यम्सला* याची जाणिव होत असे.यांत *सुभद्रा* ची मेहनत,तीच्या कल्पना याच मुख्यत्वे करुन कारणीभूत होत्या,हे तो सतत जाणवत होता! म्हणूनच एक *ऋण* चुकवण्यासाठी नाही तर त्याची जाणिव व्यक्त करण्या साठीच,त्याने एक जगावेगळे गिफ्ट द्यायचे ठरवून,हे पत्र *गुलाबी पाकीटात* घालून दिले!


          त्या पत्रांत तो पुढे म्हणतो.

*सुबा, तुझ्या जागी एखादी दुसरी माझ्याच संस्कृति मधील माझ्याच देशाची बाई असती तर तीने देखील मला इतके संभाळून घेतले नसते, कदाचित आमच्या विवाह संस्थेच्या परंपरेत ३० वर्षे  प्रेमा बरोबरच विवाह संबंध सुध्दा  पुर्वी सारखेच अबाधित ठेवणे हे जमले नसते,आणि त्याची खंत सूध्दा कोणालाही झाली नसती. हे भारतिय संस्कृति चे एक वैभव आहे!*

          *तुझ्या साथीने मा़झा व्यवसाय हा केवळ माझा किंवा आपल्या दोघांचाच न रहाता तो आपण  कुटूंबाचा करु शकलो, आणि तो पुर्णपणे यशस्वी देखील करु शकलो!*

            *आता या व्यवसायात अजून कांहीं करायचे बाकी उरलेले नाही! भौतिक सौख्य मी तुझ्या साथीने अनुभवले, आता माझी इच्छा आहे,की मी आता  तुझ्या सहवासात संपूर्ण पणे असावे! ऐहिक सुख तर* *अनुभवले,आता आत्मिक आनंद तुझ्या साह्यानी मिळवण्याचा प्रयत्न करावा असे मनापासून वाटते!* 

          *तुला आश्चर्य वाटेल, कदाचित,पण मी भारतांत एका रम्य ठिकाणी जवळपास १० एकर जमिन मागेच एका भारतभेटीच्या निमित्ताने घेऊन ठेवली होती.तेथे "प..पू.स्वामी समर्थ" यांची ध्यानमुद्रेंतील मुर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे ठरवले आहे! मी बऱ्याच वेळा स्वामींची आराधना करतांना तुला बघत आलेलो आहे! प्रत्येक कठीण प्रसंगी तू स्वामींना आर्तभावनेने साद घातलेली मी बघत आलेलो आहे!* 

          *तू मला ३० वर्षे तुझा देश,माणसे,परंपरा सोडून मला साथ दिलीस,आता माझी वेळ सुरु होत आहे.*

          *आपण दोघेही पुढील  वर्षीपासून श्रीदत्त जयंती आपल्या भारतांतील आश्रमवजा घरांत साजरी करायची!*

          *इकडचा सर्व व्याप आपण सर्वसंमतीने आवरता घेण्याचे ते एक कारण होते!ते झालेले आहे,फक्त एकदा येशूचे सुध्दा या साठी आशिर्वाद घेण्या साठीच आपण २५ डिसेंबर पर्यंत इथे आहोत!*

            *पुढील वर्षी,शनिवार दिनांक १८ डिसेबर २०२१ *रोजीची श्री.दत्त जंयंति पासून आपण भारतांत असु!*


            *आपल्या कडे विमाने आपल्या मालकीची असुन सुध्दा मी ब्रिटिश एअरवेज ची दोन तिकीटे या पत्रासोबत दिलेली आहेत! सामान्य साधका सारखे जीवन जगण्याची ती पहिली पायरी आहे!*


          *मला हि गिफ्ट देतांना ह्रदयापासून अत्यानंद होत आहे! आता आपण खरे सहजीवन जगणार आहोत!* 


*केवळ तुझाच*

*विली*

~~~~~~~~

||शुभं भवतु|


🌹🙏👍👌👆   *एका पाश्चात्याला कळलेली भारतीय संस्कृतीची महत्ता!*

संकलन : - विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र