सहवास
*सहवास...!*
✍️ २८५५
स्वर्गातील देवतूल्य असणारी माणसं संगतीला असली की ? काळ कितीही वाईट असला अथवा गरीबी असली तरी ? नित्य स्वर्गाचाच आनंद असतो.
आणी ?
दररोज पंचपक्वांनाच ताट समोर असलं , राजऐश्वर्य जरी असलं , आणी संगतीला राक्षसी माणसं असतील तर ?
ते जीवन नरकापेक्षाही भयंकर असतं.
निरपेक्ष प्रेम हा साक्षात स्वर्ग होय तर ? स्वार्थी प्रेम हा तडफडवणारा जीवन प्रवास आहे.
म्हणूनच देवासारखी माणंस नित्य संगतीत असणं म्हणजे ? परम भाग्याचे लक्षण होय.
ईश्वरीय दिव्य अनुभूती साठी ? पवित्र ईश्वरीय व्यक्तींचा व शुद्ध आत्म्यांचा सहवास म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्वाचा असतो.
श्रीकृष्णासाठी आपला भरजरी शालू ही द्रौपदी नेच, कसलाही विचार न करता, एका झटक्यात टरटरा का फाडला ?
प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्ण , रूक्मिणी , सत्यभामेपेक्षा राधेपाशीच का रमतो ?
सुख आणी दुःख सुध्दा म्हणूनच आपल्या संगतीवर अवलंबून असते. हल्ली माणसं आत्म्यांनं एकमेकाजवळ राहणं तर दूरच ? देहाने सुद्धा एकमेकाजवळ रहायला टाळतात , असं वाटू लागतं आहे ?
मग कारणे कांहीही असोत.
संत संगती सदा घडो
सूजन वाक्य कानी पडो...
*जय हरी विठ्ठल...!!*
*विनोदकुमार महाजन*
Comments
Post a Comment