मौलिक विचार

 *मौलिक विचार...* 

✍️ २६२३


दु:खी आहात ? तर मग ?

एकटे जगायचं शिका.कुणाकडेही आधार मागू नका.दुनिया फार मतलबी आहे . तुम्ही दु:खी आहात हे बघून , तुम्हाला आधार देणारे कुणीचं भेटणार नाहीत.उलटपक्षी नरकयातनाचं देणारे भेटतील.अगदी पावलोपावली. 

ज्यांना छातीची ढाल करून आधार दिला , तेही रडवतील.म्हणुनच दु:खात कुणाचाही आधार शोधू नका. प्रसंगी एकटे जगा.


ईश्वरावर भार सोपवा , त्याचा आधार घ्या.


ये भी दिन जायेंगे.

तेरे भी दिन आयेंगे.

असं मनोमन  सतत म्हणत रहा.

ईश्वरी चिंतनाने सैरभैर मन शांत करा.


वाटल्यास,

" चंदन चावल बेल की पतीया , शिवजी का ध्यान धरो रे , हे प्रभो , मेरा काम करो रे..." हे गजानन महाराजांच आवडतं भजन सतत गुणगुणतं रहा.


नक्कीच दु:खमुक्त व्हाल.


हर हर महादेव.


 *विनोदकुमार महाजन*

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

संपूर्ण लेखांक भाग २५

ईश्वर