लोकं चालली पळून

 परदेशात लोकं ? चालली पळून ??

✍️ २६११


🤔😳🤔😳🤔😳


प्रोग्रेस, प्रगति याच्याविषयी ब-याचं लोकांना कांहीही घेणंदेणं नसतं.

फक्त लाथाळ्या , लाथाळ्या आणी लाथाळ्या.

आयुष्यभर लाथाळ्या अन् एकमेकांच उणदुणं काढणं.


प्रोग्रेस साठी शून्य प्रयत्न.


आयुष्यभर फक्त द्वेष, मत्सर ,हेवेदावे, निंदा,नालस्ती ,कुटील कारस्थान यांनीच अख्ख जीवन भरलेलं.


कर्तृत्व ? शून्य !


अन् कुणी पुढे चालला ,

स्वकर्तृत्वाने मोठा व्हायला लागला की ?

त्याला सहकार्य सोडाच...

त्याचेच पाय ओढणं , त्याला बदनाम करणं,त्याला अपमानास्पद वागणूक देणं,

त्यालाच स्वार्थी, मतलबी, ढोंगी म्हणणं....


हेच चाललंय का हो अख्खा देशात ? अन् हिंदू समाजात ?

म्हणूनच हिंदू अन् देशसुध्दा मागं आहे का हो ?


घरोघरी मातीच्या चुली ?

( स्साँरी...घरोघरी लोखंडी गँस ?...कारण काळ बदललायं ना ? चुली गेल्या अन् गँस आला ? )


डोकं खरंच चक्रावून जातं ना असल्या भयंकर प्रकारानं ?

कांहीच सुचत नाही.

स्वतः पुढं जायचं नाही.

दुस-याला पुढं जावु द्यायचं नाही.

पुढ जाणाराला रात्रंदिवस दुषण देऊन छळतं रहायचं ?


त्याला एकट्याला तरी आनंदाने जगु द्या ना रे बाबांनो ?


खरंच , आम्ही कधी सुधारणार ?


" विना सहकार, 

नही उध्दार "

असं म्हणतात.

अहो इथं सहकार तर दूरच सोडा हो,

पावलोपावली जळक्या मनाचीच लोकं भेटतात.


सुखातही त्रास देतात.

दुखा:तही त्रास देतात.

कसंच जगु देत नाहीत.

सुखानं ही नाही, अन् दु:खानही नाही.


काय घोर कलियुग आलं रे बाबा ?

सहकार्य केलं तरी ? 

जळफळाट ?

अलिप्त राहिलं तरी ? जळफळाट ?

विरोध केला तरीही ? जळफळाट ?


एखाद्याचा भयंकर मानसिक छळ करून करून , त्याला येडं करायचं , त्याला मानसातून उठवायचं , आयुष्यातून उठवायचं , समाजातून उठवायचं , सग्यासोय-यातूनही उठवायचं.

अन् वर पुन्हा ?

त्या येड्यालाबी बदनाम करायचं ? त्याला बी छळायचं ?


काय राव दुनियादारी ?


एकंदर काय तर स्वस्थ अन् शांत पणानं ?

जगुच द्यायचं नाही ?


पारायण करायची अन् ?

आत द्वेष खदखदलेला ?


अन् यावर उत्तर ?

रामबाण औषध ?


नाही ? नाही ?


मनं साफं करणारी मशीन मार्केट मध्ये मिळत असती तर बरं झालं असतं ना ?


एकंदर काय तर ?

असंच जगतं रहायचं आयुष्यभर ?

स्वतःही सुधारणार नाही, अन् दुसऱ्यालाही सुधरू देणार नाही.

असा आमचा ?

विकृत समाज ??


म्हणूनच लोकं ?

परदेशात चालली हो पळून ?

असल्या प्रकाराला कंटाळून , वैतागून ?


काय करणार ??

बिच्चारी !!



😭😭😭😭😭


विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

मोदिजी को पत्र ( ४० )

ईश्वर