डबूलं
*डबूलं...*
✍️ २८३०
*विनोदकुमार महाजन*
🤫🤔🤔🤔
*डबूलं...??*
धनाचं डबूलं...
अपरीमीत धनाचं डबूलं...
कुणाकडे आहे तर...? कुणाकडे नाही.
ज्याच्याकडे हे डबूलं आहे तो आनंदाने हसतोय तर ?
ज्याच्याकडे नाही तो दु:खाने रडतोय ?
*म्हणजे काय ??*
तर झालं असं की ,
एखाद्याला पै पै जमवायची सवय असते.
स्वतः चा पैसा.
हक्काचा पैसा.
कष्टाचा पैसा.
घामाचा पैसा...
*वगैरे वगैरे..*
असू द्या.
पै पैसा जमवणं तसं कांही पाप नाही , आणी वाईट पण नाही.
पैसा काय करू शकतो ?
पैसा काय काय खेळ करू शकतो ?
पैसा काय काय करू शकत नाही ?
तर ? पैसा सगळंच करू शकतो.
ज्याच्याकडे पैसा ? त्याच्यापुढे काढती उठाबशा ?
ज्याच्याकडे नाही पैसा ?
त्याला धुवायला लावती कपबशा.?
असा एकंदर दुनियेचा न्याय आणी हीच खरी दुनियादारी.
तर आता मूळ मुद्यावर येऊ या...
डबूलं...
पैसेवाल्याला कुणी कांहीं म्हणतो , कुणी कांहीं बोलतो...
" अरे डबूलं घेऊन काय करणार आहेस ?
अरे पैसा पैसा करून काय करणार आहेस ? बरोबर घेऊन जाणारं आहेस का ?? "
वगैरे वगैरे...
तर एखाद्याला डबूलं साठवायची फार हौस असते , भारी हौस...
पक्षी कसं काडी काडी जमवून घरटं बांधतो तशी कांहीं माणसं ही
पैसा पैसा जमवून भला मोठ्ठा इमला वगैरे बांधतात , अथवा एखाद घरं तरी.
एखाद्याच्या नशीबात , पुर्व पुण्याईने आयतंचं डबूलं मिळतं , पुण्य असतं एखाद्याचं. तर एखाद्याला मर मर काबाडकष्ट करून डबूलं जमवावं लागतं , तर एखाद्याला रात्रंदिवस मर मर काबाडकष्ट करूनही हाता तोंडाची गाठ पडत नाही . तर एखाद्याच्या नशिबात आयुष्यभर कर्जाचे हप्ते अन् हप्त्याचं ओझचं लिहीलेलं असतं.
घबाड...
धन की हांडी...
धनाचा साठा...
या वरच मानवी जीवनाचं सुख दुःखाच गणित ठरलं जातं.
पण ब-याच वेळा होतं काय की , घरात एखादा असा चिक्कू माणुस असतो की तो सतत पैसा पैसा करत असतो आणी धन जोडत असतो.
हळूच त्या डबुल्यात वाकून बघायचं...
" आता किती लाख जमले बघू..." असं मनाशीच पुटपुटायचं अथवा बॅंकेत...
रूपया वर रूपये , रूपया वर रूपये जमवत रहायचं.
खायचं प्यायचं 🫣 मुळिच नाही.
ना खाऊंगा ना खाने दूंगा..🤫🤣
अशी यांची रीत...
कुणी धनासाठी तडफडतंय , खुशाल तडफडत राहू दे...
" मी आपलं गाठोडं...( धनाचं गाठोडं , धन की पोटली ) जमवत राहणार...राहणारचं...तो माझा जन्म सिद्ध हक्क आहे..." असं म्हणत.
स्वभावाला औषध नसतं..मी कुण्या एखाद्या व्यक्तिबद्दल लिहीत नाही तर ब-याच वेळा समाजात हीच धारणा दिसुन येते.
" जोडोनिया धन उत्तम व्यवहारे ..."
हे सगळं खरं आहे.
कारण धन सन्मार्गाचं हवं.
धन जोडतं ( नातं ) पण आणी तोडतं ( नातं ) पण...
धन वैभवाशिवाय समाज कार्य पण अवघडच आहे.
आणी ? समाज कार्याला ? काला गोरा सब धन चलता है... यहाँ सबकुछ चलता है...असं म्हणतात.
ओलं पण जळतं अन् वाळलं पण जळतं.
धनाशिवाय कोण कुणाला विचारतो हो...
कुत्र्याला खाऊ घालायला सुध्दा धन , पैसाच लागतो ना ?
म्हणून तर आमच्या खेड्यात एक म्हण आहे , " पैसा नसंलं तर कुत्रं सुद्धा विचारत नाही . "
खरे धन म्हणजे ?लक्ष्मी कृपा...
धन प्राप्ती वेगळं आणी ब्लैक मनी वेगळा...
आता हा ब्लैक मनी काय भानगड आहे ? याचा उटारेटा मी कांहीं करत बसत नाही.
लक्ष्मी कृपेमुळे सगळे असाध्य ही साध्य होते.
गुरू सेवा , गुरू कृपा , ईश्वरी कृपा असेल तर लक्ष्मी प्राप्ती तर होतेच शिवाय , सगळी सुखे वैभव ही प्राप्त होते.
पण होतं काय की ,
धन आलं की अनेक मित्र जमा व्हायला लागत असावेत.
आणी जळके लोकं ही वाढत जात असावेत.
तसं समाजात अलिकडे जळक्या लोकांच जणू पिकचं आलंय की काय ? असं वाटू लागलंय...
कुणाचं चांगलं झालं , एखाद्याच्या नशीबाने चार पैसे गाठीला आले की ? जळक्यांची संख्या सुद्धा खूप वाढते.मग बसतात दुस-याचं उणं दूणं काढत.
स्वतः मध्ये कर्तृत्व नाही , नशीबात ही धन नाही मग ? दुस-याला सतत शब्दाने बदडत रहायचं.
अरे बाबा ,
दुस-याचं चांगलं झालेलं बघायला आणी त्याचा आनंद साजरा करायला ही फार मोठ मन लागतं.
पण अलिकडे समाजातून मोठ्या मनाची माणसंच हद्दपार झाली आहेत की काय असं वाटू लागलं आहे.
जिकडे तिकडे कोती बुध्दी आणि आखूड मन...अशान थोडचं नशीब बदलणार आहे ?
नशीब बदलायचं असेल तर ? मनाचा मोठेपणा तर हवाचं.मनाचा मोठेपणा असेल तिथे नक्कीच लक्ष्मीचा वास असतो.
त्याचबरोबर धन प्राप्ती साठी जीद्द हवी , अथक प्रयत्न वाद हवा , खडतर तपश्चर्या करण्याची मनाची तयारी असावी.
उगीचच सहजासहजी गुरू कृपा , ईश्वरी कृपा व लक्ष्मी कृपा होईल होय...?
मुळीच नाही.
त्या साठी भगवंतावर , सद्गूरूवर निरपेक्ष प्रेम , विश्वास , श्रध्दा हवी.
त्यासाठी मन शुद्ध असावं.समाज हिताची व जनकल्याणाची अखंड तळमळ असावी.
मग भगवत् कृपा तर होतेच.हवं ते ही मिळतं.अगदी रिद्धी सिद्धी सुद्धा प्राप्त होतात.
पण...?
" मनी नाही भाव अन् ?
देवा मला पाव...
अथवा
दे रे हरी पलंगावरी..."
अशाने कांहीच साध्य होणार नाही.
श्रध्दा , विश्वास , प्रेम , चिकाटी , सातत्य असेल तर ? हरी सुध्दा भेटेल आणी ? केवळ याचं जन्माचं काय जन्मोजन्मीचं कल्याण ही करेल...
पण त्यासाठी...
" कल्याण करी रामराया..." अशी सतत आर्ततेने साद घालता आली पाहिजे.
मग ? ईश्वर तर प्राप्त होईलच.
त्याच्या कृपेने धन , वैभव , घबाड , डबूलं सगळंच प्राप्त होईल.
आणी त्याच्या ही पलीकडे जे असेल तेही मिळेल.
होय...
त्यासाठी सर्व प्रथम आपलं मन साफ असायला हवं.
" मन चंगा तो कठौती में गंगा..."
मतलब ? समझ गये ना ?
" मना त्वाची रे पुर्व संचीत केले..."त्यामुळे मन चंगा व्हायला पण पूर्व संचितच असावे लागते.
मतलब की दुनियादारी क्या समझेगी ?
क्योंकी यहाँ सिर्फ
" मतलब की ही बात होती है... " असं बरंच जणं म्हणतात.
" मतलब की दुनिया और ? मतलब की दुनियादारी ? " असं ही म्हणतात.
धनाची खनखनाहट आली की , ब-याच जणांचे डोळे विस्फारतात.
आपल्याला काय त्याचं पडलंय ?
मस्त मस्त लिहीत रहायचं आणी र ट फ जोडून समाज प्रबोधन करण्याचा छोटासा प्रयत्न करायचा.
बाकी ईश्वर जाणे.
" ईश्वर एक अथांग सागर आहे , आपण त्यातला एक थेंब..."
पण तो ईश्वर अमृत सागर आहे...जहर का दरीया नहीं , म्हणून आपणही ईश्वरी गुणसंपन्न अमृत सागराचा एक थेंब होऊ या...एका थेंबातही तेच ईश्वरी चैतन्य सामावलेले असते...ते पाहू या...
" सो... अहम्..."
आसुरी शक्ती वाला जहर के दरीया का बूंद कभी भी नहीं बनना है...!!!
*जय हरी विठ्ठल...*
🚩🚩🚩🚩
Comments
Post a Comment