प्रेम
*मनापासुनचं प्रेम...!*
✍️ २८२५
*विनोदकुमार महाजन*
🩷🌹🩷🌹
आपण आपल्या आयुष्यात नेहमीच कुणावर ना कुणावर तरी प्रेम करत असतो.
अगदी खरं प्रेम.
ह्दयापासूनच प्रेम.
मनापासूनच प्रेम.
हवं तर अगदी आत्म्यावरचं सुध्दा प्रेम म्हणा ना.
निखळ , निरागस , निष्पाप , निरपेक्ष.
अगदी भगवंतावर प्रेम करतो ना तस्स...
आणी आपला समज असा असतो की , आपण जसं प्रेम करतो आहोत , अगदी तसचं प्रेम समोरची व्यक्ती सुध्दा आपल्यावर करत असेल.
पण वास्तविक हा आपला फार मोठा भ्रम असतो.
आणी आपल्याला असं जेंव्हा कळत की आपण खरंच इतके दिवस भ्रमात होतो ? तेंव्हा आपले डोळे खाडकन उखडतात.
आणी आपण पुर्ण शुध्दीवर येतो.
खरंच प्रेम म्हणजे भ्रम आहे ? आभास आहे ? भुलभुलैया आहे की आणखी काही ?
कांहीच कळत नाही.
यालाच बहुतेक आंधळं प्रेम म्हणत असावेत लोकं .
वाटल्यास एकतर्फी प्रेम ही म्हणू फार तर.
नात्यागोत्यातही आपली ब-याच वेळा फसगत होते.आपल्याला नेहमी असं वाटतं असतं की मी जसा त्याच्यावर प्रेम करतोय ना ?
अगदी तस्स प्रेम समोरची व्यक्ती सुध्दा आपल्यावर प्रेम करते आहे.
अरे पण प्रेमात तर संपूर्ण समर्पण असतं.
पण इथे तर समर्पण वगैरे कांहीच दिसत नाही.
इथे तर सगळा स्वार्थाचाच बाजार वाटतोय.
कसलीही अपेक्षा न करता केलं जाणारं ते खरं प्रेम.
रात्री अपरात्री प्रत्येक प्रसंगात धावून येणारं ते खरं प्रेम आणी ते खरं नातं.
म्हणूनच प्रेम आंधळ वगैरे असतं असे लोक बोलत असावेत.
पण अलिकडच्या काळात असं आंधळ वगैरे प्रेम कुणीच करत नाही हो.
फार डोळसपणे प्रेम केलं जातं अलिकडे.
अगदी सिनेमातल्या सारख्या प्रेम विरांच्याही अशाच अपेक्षा असाव्यात असं वाटतं.
पण जेंव्हा वास्तव आयुष्य चालू होतं ना तेंव्हा खरे डोळे उघडतात.
आणी आपला भ्रम संपतो.
असो...
आपल्याला काय करायचे आहे त्याच्याशी ?
आपण मात्र एक नाम केशवा या म्हणीप्रमाणे सगळ्या जगावर अगदी खरं प्रेम करत जगावं एवढं नक्की.
अगदी भगवंतासारखं..
आणी ? खरं प्रेम करूनही फसगत झालीच तर ? कायमचचं दूर निघून जावं.परत कधिही न भेटण्यासाठी.
आणी कायमसाठी भगवंताचचं होऊन जावं.
तिथं मात्र खोटंनाटं ,भ्रम , फसगत नाही तर अस्सल , खरंखुरं ह्रदयातलं पवित्र प्रेमच मिळतं.
केवळ एक जन्मच नव्हे तर ? जन्मोजन्मी.
पण त्यासाठी सुद्धा भगवंतासाठी अगदी वेडं पिसं होऊन जावं.
लागले मज ब्रम्ह पिसे..
अगदी अस्स... होऊन जावं.
भगवंताठी आपली केवळ तहान भूकच नव्हे तर शुध्दही हरपावी.
हेच खरं प्रेम.
*जय हरी विठ्ठल*
🩷🌹🩷🌹
Comments
Post a Comment