श्रीकृष्ण

 *प्रेमवीर श्रीकृष्ण हवा की* *धर्मवीर* *श्रीकृष्ण...??*

✍️ २८२८


 *विनोदकुमार महाजन* 

🌹🪷🌹🪷


एक श्रीकृष्ण 

बांसुरीवाला...

प्रेमवीर 

मुरलीधर...

एक श्रीकृष्ण 

सुदर्शन चक्र धारी...

धर्मवीर...


तुम्हाला कोणता श्रीकृष्ण हवा आहे ?

दोन्ही श्रीकृष्ण एकच 

परंतु परिस्थिती अनुसार एकाच श्रीकृष्णाची दोन वेगवेगळी रूपे...


एक प्रेमासाठी तहान भूक विसरून सर्वोच्च प्रेम करणारा तर ?

दूसरा ?

कर्तव्यकठोर होऊन 

महाभारतासारखे भयंकर धर्म युद्ध करून 

धर्म व सत्याचा अंतिम विजय करणारा व सदैव 

जींकणारा 

अजेय श्रीकृष्ण...


आपण कोणत्या श्रीकृष्णावर प्रेम करता ?

साहजिकच मनमोहन , मनमोहक , बांसुरीवाला श्रीकृष्ण 

राधेबरोबरचा श्रीकृष्ण...


कांहीं वैश्विक संस्थांनी बांसुरीवाला श्रीकृष्ण जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवला...

कृष्ण भक्त वाढले 

कृष्ण भक्तिही वाढली 

पण 

वैश्विक स्तरावर धर्माचा , सत्याचा , सत्य सनातन धर्माचा विजय झाला का ?


आजही वैश्विक स्तरावर बांसुरीवाला श्रीकृष्ण , राधेचा श्रीकृष्ण पुजला जातो पण ?

सुदर्शन चक्र धारी श्रीकृष्ण किती पुजला जातो ? हा प्रश्न आहे.


आज संपूर्ण विश्वाला बांसुरीवाल्या श्रीकृष्णाची नव्हे तर सुदर्शन चक्र धारी श्रीकृष्णाची गरज आहे.

पण...जगाला हे कधी कळलंच नाही का ?

म्हणूनच वायु वेगाने वैश्विक स्तरावर हाहाकारी , उन्मादी , राक्षसी धर्म फोफावला आणी मानवता , सत्य धर्म अडचणीत आला ?


पाकिस्तान , अफगानिस्तान , बांगलादेश इथेही श्रीकृष्ण मंदिरे होतीच ना ? बांसुरीवाला श्रीकृष्ण ?

आज तिथली सगळी मंदिरे जमीनदोस्त करण्याचे हैवानी खेळ चालू आहेत ?

बांसुरीवाला हे थोपवू शकला का ? का ??


तोच जर 

सुदर्शन चक्र धारी श्रीकृष्ण जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवला असता तर समाज आणी समाज मन अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणी हाहाकारी शक्तिचा संपूर्ण बिमोड करण्यासाठी संपूर्ण समाज प्रेरित झाला असता आणी आजचा भयंकर विनाशकारी वैश्विक उन्माद थोपवण्यासाठी समाज मन तयार झाले असते.


अजुनही वेळ गेलेली नाही.अजुनही काळ हातात आहे.

अजुनही सुदर्शन चक्र धारी श्रीकृष्ण , त्याची धर्म रक्षणाची अचूक निती समाज मनाच्या खोलवर वायु वेगाने पोचायला हवी.

आजही सुदर्शन चक्र धारी श्रीकृष्ण प्रत्येकाच्या मनात वसायला हवा.


मग ? अधर्माचा संपूर्ण नाश आणी उन्मादी , उन्मत्त शक्तिचा संपूर्ण संहार करणे असंभव नाही.


म्हणूनच आता प्रेमवीर श्रीकृष्णाची नव्हे तर सुदर्शन चक्र धारी 

धर्मवीर श्रीकृष्णाची संपूर्ण जगाला नितांत व त्वरीत गरज आहे.


युध्दाने सगळेच जरी साध्य होत नसले तरी रामायण , महाभारतासारख्या ईश्वराधिष्ठित युध्दाने सृष्टी संतुलन नक्कीच भरून आलेले आहे हे नक्की.


 *जय श्रीकृष्ण* 


🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

सोनारीचा काळभैरवनाथ

संपूर्ण लेखांक भाग २५