विचार धन
*विचार धन...*
१ ) जेंव्हा असत्य सत्याला जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न करतं तेंव्हा ते सत्य अधिक शक्तिशाली , धारदार आणी घातक होतं आणी असत्याला कायम स्वरूपी नेस्तनाबूत करून टाकतं...
२ ) साधुसंत नेहमी सांगतात की , नातिगोती सगळी खोटी आहेत.सगळा मोहमायेचा फाफटपसारा आहे.भगवंत हेच अंतिम सत्य आहे...हेच त्रिवार खरं आहे....
३ ) लेकराची आतुरतेने वाट
फक्त आईच बघत असते , दूसरे कुणीही नाही... हे एक कटुसत्य आहे...
माता महालक्ष्मी की जय ...
४ ) राजबिंड रूप , अमोघ कर्तत्वाची छाप , चेहऱ्यावर ईश्वरी तेज असणारं उत्तुंग व्यक्तित्व सुध्दा , सततच्या राक्षसी खेळामुळे , आणी छळामुळे कांही काळ का होईना पण काळवंडून जातंच जातं... उदाहरण ध्रूव बाळ...
*विनोदकुमार महाजन*
Comments
Post a Comment