भव्यदिव्य जीवन

 *एक भव्यदिव्य जीवन* *जगावे...!!*

✍️ २८२३


 *विनोदकुमार महाजन* 


✅✅✅🎯🕉️


अगदी प्रत्येकालाच असे वाटत असते की...

आपण छान , सुखी , आनंदी जीवन जगावे.


एक उत्तुंग , भव्यदिव्य जीवन जगावे.यशाची उत्तुंग गरूड भरारी घेऊन यशाची अनेक शिखरे काबीज करावी.


कुणाला पैशाने मिळणारी श्रीमंती , पैशाने मिळणारी सगळी सुखे हवी असतात.

तर कुणाला खूप मोठ्ठ , भव्यदिव्य नाव कमवावं असं वाटत असतं.


कुणाला सिनेमातील हिरो हिरोईन व्हायचं असतं तर कुणाला मोठ्ठा महाराज होऊन समाज हित साधायचं असतं.

कुणाला मोठ्ठा क्रीकेटपटू व्हायला आवडतं.


तर कुणी गबरगंड उद्योगपती होणं पसंत करतो.


कुणाला मंत्री , आमदार , खासदार व्हायचं असतं.

तर कुणाला कांहीं.


जीवनात प्रत्येकाचं एक स्वप्न असतं.

सुखाचं स्वप्न , यशाचं स्वप्न.

प्रत्येकाचं स्वप्न अगदी वेगवेगळं असतं.


आणी प्रत्येकाचं स्वप्न , प्रत्येकाचं ध्येय पुरं होईलच असं ही नसतं.

पण प्रत्येक जण अगदी आपापल्या स्वप्न पुर्तीसाठी स्वतःला अगदी झोकून देत असतो.


ध्येयवादी राहणं , स्वप्न पाहणं कांहीं वाईट नाही.पण त्याची पुर्तता करणं , स्वप्न पुर्तीसाठी सतत त्याचा पाठपुरावा करणं कठीण असतं.


प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपल्या आयुष्यात कांहीं तरी भव्य दिव्य करून दाखवावं.


पण काय करून दाखवावं हेच मुळी माहित नसतं.आणी जरी माहित असलं तरी त्याकडे जाणारा योग्य रस्ता माहित नसतो.


आणी अशा गोंधळलेल्या अवस्थेत खरा रस्ता दाखवणारंही कुणी भेटत नाही , त्यावेळी मनाची अस्वस्थता आणी तगमग वाढत जाते.


पुढं काय ? असा प्रश्न सतत मनात येत राहतो.


जीवनात अनेक यशाची शिखरे पादाक्रांत करायची आहेत पण नेमकी कशी ? हेच मुळी माहित नसेल तर त्या स्वप्नाला अर्थ तरी काय ?

केवळ एक दिवास्वप्न एवढीच त्याची व्याख्या उरते.


भल मोठ्ठ यश , नाव , किर्ती , लौकिक मिळवण्यासाठी  , उत्तुंगता मिळवण्याठी , भव्यदिव्य होण्यासाठी सर्वप्रथम ध्येयवादी व्हावं लागतं.एक उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवावं लागतं.

आणी त्याच्या पुर्ततेसाठी तळमळीने रात्रंदिवस मेहनत करावी लागते , तसे त्या दिशेने प्रयत्न करावे लागतात.

ध्येयपूर्तीसाठी अचूक रस्ते निवडावे लागतात.


भाग्य आणी भाग्योदय या आयुष्यातील फार मोठ्या घटना आहेत.

प्रत्येकजण आपला भाग्योदय होऊन , आपले संपूर्ण आयुष्य उजळून निघेल व एक नवीन आयुष्य सुरू होईल या आशेवर जगत असतो.


म्हणूनच आशा आणी आशावाद आयुष्यात फार महत्त्वाचा असतो.त्यामुळे आयुष्यात मोठमोठी स्थित्यंतरे ही होतात.

पण त्याच्या जोडीला लागतो तो अथक प्रयत्न वाद आणी दुर्दम्य इच्छाशक्ती.


उत्तुंग गरूड भरारी घेऊन लौकिक जीवनही अलौकिक बनविण्यासाठी अथक प्रयत्नवाद , जीद्द खूप महत्वाची असते.


ब-याच वेळा काय होतं की आपलं भाग्य बदलण्याचा क्षण अथवा भाग्योदय होण्याचा क्षण अगदी जवळ आलेला असतो.

पण अथक प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळत नाही म्हटल्यावर आपण नाराज आणी उदास मनाने चिकाटी सोडून देतो आणी तिथेच आपली नेमकी फसगत होते.


अपेक्षित यश जवळ असतानाच आपण हताश , उदास मनाने हतबल होऊन प्रयत्नवाद सोडून देतो.


अन् ... दुर्देवाने हाताशी आलेले यश , हातातोंडाशी आलेला घास निघून जातो.

आणी मग आपण आपल्याच भाग्याच्या , नशीबाच्या नावाने कोसत बसतो.


म्हणूनच जीवनात संघर्ष कितीही भयावह असो , जीद्द , चिकाटी कधीही सोडू नये .आयुष्यात हार कधिही मानू नये .

जे पाहिजे आहे ते प्राप्त झाल्याशिवाय शांत आणी स्वस्थ बसू नये .


कुणी म्हणेल की एका लाॅटरीच्या तिकीटाने माझे नशीब बदलेल.म्हणून कर्जबाजारी होऊन सतत लाॅटरीच्या नादी लागून आयुष्य बरबाद करने चुकीचे आहे.

कारण जुगार आयुष्यात कधिही यश देत नसतो.


व्यसनाधिनता ही सुद्धा आपल्या आयुष्यातील यशाच्या आड येणारी फार मोठी भींत आहे.

त्यामुळेच व्यसनाधीन व्यक्ती आयुष्यात सहसा कधीच यशस्वी होत नाहीत.


म्हणूनच स्वप्न नेहमी मोठ असावं , भव्यदिव्य असावं , आयुष्य ही भव्यदिव्य असावं.आणी या भव्यदिव्य आयुष्यासाठी उभं आयुष्याचं झोकून द्यावं.


माझं ही एक भव्यदिव्य ध्येय आहे.

ईश्वर निर्मित सत्य सनातन वैदिक हिंदू धर्माचा अंतिम वैश्विक विजय.

आणी मी ते प्राप्त करणारंच.


खूप मोठ्ठा पल्ला पार केलेला आहे.

यश अगदी अंतिम टप्प्यात आहे.


ईश्वर ही प्रेम प्रेरणा आणी सहकार्य करतो आहे , अशी धारणा असल्यावर यश मिळणारच ना ?


मी ईश्वराला नेहमी माझ्यासाठी अथवा माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी कांहीं मागत नाही आणी मागितलेलं ही नाही.

ईश्वर चरणी आणी सद्गुरू चरणी मागणं एकचं आहे की , सनातन धर्माचा अंतिम वैश्विक विजय आणी संपूर्ण विश्व कल्याण व्हावे.


ईश्वरी इच्छेने मिळालेला नरदेह व्यर्थ जाऊ नये.


धन वैभवाचा मी भुकेलेला नाही तर ईश्वरी सिध्दांत व सत्य सनातन यांचा अंतिम विजय...

हीच माझी तहान भूक आहे.


बस्स्... यासाठी तुमची सर्वांचीही मनस्वी नव्हे तर आत्मीक साथ हवी आहे.

 *द्याल का साथ ??* 


 *आपली इच्छा...* 


 *जय श्रीकृष्ण* 


🎯🎯🎯🙏🕉️

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

सोनारीचा काळभैरवनाथ

संपूर्ण लेखांक भाग २५