प्रिय मित्रा

 *प्रिय मित्रा , माझंही थोडं* *ऐकून घेशील का ??* 


✍️ २७१०


( कथा एका सोडून गेलेल्या ख-या मित्राची )


🕉️🕉️🕉️🕉️🕉️


प्रिय मित्र,

खरं प्रेम केलसं

जीवनभरासाठी दोस्ती निभावण्याचा

वादाही केलास...

मूकपणे , एकही शब्द न बोलता ,सदैव खरं प्रेम व्यक्त करत गेलास....


आणि एक दिवस आयुष्यातूनच न सांगताच कायमचाच दूर निघून गेलास...


नियतीपुढे तु तरी काय करणार ? मी तरी काय करणार ?

पण कित्येक वर्षे झाली तरी तुझ्या आठवणी आजही ह्रदयात तशाच ताज्या आहेत.


नियती फार क्रूर असते हेच खरं.


प्रिय मित्रा 

प्रेम ...

हे ईश्वरावर करावं, त्याच्या सृष्टीवर करावं,पशुपक्षावर करावं.प्रेम हे ख-या माणसावर ही करावं.


निखळ, पवित्र, निस्सीम,खरं प्रेम.

आणि जगात सतत हसत खेळत प्रेमामृत वाटतं रहावं.


तेच खरं प्रेम मी तुझ्यावर ही केलं.अगदी आजही तेच प्रेम माझ्या ह्रदयात आयुष्यभर जपले जाईल.

कारण त्यात स्वार्थ, मोह नव्हता.


आपण सदैव पवित्र आणि निरपेक्ष प्रेमामृत वाटूनही आपल्या विरूध्द कोणी जाणीवपूर्वक द्वेषाचं विषच पेरत असेल तर ?

तर त्याला इलाज तरी काय...?


गैरसमज ही मर्यादित असावे.


अशा दुषीत वातावरणात राहून आपले आयुष्य व्यर्थ घालवण्यापेक्षा तिथून कायमचंच दूर निघून जावं.

तिथे परत कधिही वापस न जाण्यासाठी , हा यशस्वी जीवनाचा फार मोठा सिध्दांत आहे.


आता राहीला प्रश्न तो असा , आपण सतत अमृत वाटूनही आपल्या द्वेषापोटी कोणी सतत रात्रंदिवस आपल्या बदनामीचं विषचं पेरत असेल तर त्याचीही चींता करू नये.


कारण ज्याचं त्याच्याकडे परत जातंच जातं , हा ईश्वराचा न्याय आहे.

सृष्टिचा सुध्दा.


सत्यावर आणि सत्यवादीवर कोणी कितीही प्रहार करत असेल तर , नियती त्याचा एक दिवस नक्कीच प्रतिशोध घेतेच घेते .


आपल्या कोणी जाणीवपूर्वक बदनाम्या केल्या , आपल्याला समाजातून उठवण्याचा प्रयत्न केला तर ते विष शेवटी त्याच्याकडेचं जातं ना रे  ?


आपण सर्वांना सतत अमृतच वाटले आहे तर मग , काळजी आणि भिती कशाला ?


तो ईश्वरच आपली काळजी व चींता करत असेल तर मग रडायचं कशाला ?

तो ईश्वरच आपल्याला नक्कीच एक दिवस यश देईलच देईल. आणि न्याय सुध्दा देईल.


माझी आई साक्षात कोल्हापूर निवासिनी महालक्ष्मी पण मला खूप मंजूळ व प्रेमळ आवाजात म्हणते ,

" कशाला रडतोस ? कशाला चींता करतोस ? कशाला काळजी करतोस ?

मी आता तुझ्या घरी रहायला आलेली आहे ."


प्रत्यक्ष जगद्जननी आपल्याला आश्वस्त करत असेल तर मग ? आपल्याविरूध्द जर कोणी सतत विषारी गरळ ओकत असून , आपण उच्च कोटीचे प्रेम करूनही आपल्या फक्त बदनाम्याच करत असेल तर त्याला साक्षात महालक्ष्मीच साक्षीदार आहे ना रे प्रिय मित्रा ?


एक दिवस तरी दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होईलच ना ?


एखाद्याचा कोणी मानसिक छळवाद केला तर तो दोष त्याचा आहे ,आपला नाही.तो त्याला बूमरॅंग होईलच.


एवढं होऊनही

आपण ज्याच्यावर खरं, निष्कपट प्रेम केलं, ते तसंच आयुष्यभर आपल्या ह्रदयात ठेवावं.त्याच्या कल्याणाची ईश्वराकडे सतत प्रार्थना करावी.

भलेही त्याच्या मनात अकारण आपल्याबद्दल विष पसरलं असेल, अथवा हेतुपुरस्सर असे विष कोणी पसरवले असेल, आणि त्याच्या वागण्याबोलण्यातुनही जर ते जाणवत असेल तरीही 

त्याच्यावर निखळ प्रेमच करावं.


अगदी आयुष्यभरासाठी.


कारण त्याचं विष त्याच्याकडेच राहू द्यावं.आपलं अमृत आपल्या जवळचं ठेवावं.

आणि अकारण आपला द्वेष करणारा पुन्हा आपल्या जवळ आला तर त्यालाही पुन्हा हे पवित्र अमृतचं वाटावं.


प्रेमाला सुध्दा अमृतच म्हणतात.

प्रेमामृत.


असं माझं भाबड मत आहे.


आपण सर्वांना भरभरून अमृत कूंभ वाटावे.

सगळ्याच ख-या मित्रांना उच्च कोटीचा परमानंद देण्याचा प्रयत्न करावा.


कारण प्रेम हे एकदाच होतं असतं.


आणि सतत प्रेमामृत वाटतं राहणं, दुस-याच्या दु:खात सहभागी होणं, हाच तर खरा ईश्वरी सिध्दांत व परमोच्च आनंदही आहे.


एखादा असुरी सिध्दांताने जगला म्हणून आपणही तसंच का जगायचं ?

आपण सतत ईश्वरी सिध्दांतानचं जगायचं.

आपलं निखळ हास्य , प्रेम सतत वाटतचं रहायचं.


आपल्या संपर्कात येणा-याला सतत प्रेमामृत वाटून , त्याच्याही जीवनात हास्यच फुलवायचं.


कठीण जरूर आहे , पण अवघड नाही.


आपण स्वच्छ मनाने जगत , वागत असताना , जगावर खरं प्रेम करत असताना , आपल्याला कोणी कपटी , नाटकी म्हणत असेल तर? तो त्याचा दोष आहे,आपला नाही.


एक दिवस स्वत: ईश्वरच आपण कपटी, नाटकी आहोत की नाहीत , हे सिध्द करून दाखवेलच ना ?


मग कशाला आपण का वाईट वाटून घ्यायचं, अथवा मनात झुरायचं?


ईश्वराच्या चरणी सगळंच अर्पण करून सतत मस्त आनंदीच जगायचं.


आपण छान आनंदी व्हायचं. आपल्यासोबत राहणारांनाही छान आनंदी ठेवायचं.


स्वतः आधी प्रयत्नाने संपन्न व्हायचं , आणी आपणावर खरंखुरं प्रेम करणारालाही एक दिवस संपन्न बनवायचं.


तोपर्यंत त्याला कितीही शिव्या द्यायच्या , बदनाम्या करायच्या ते करू दे ना ?


योग्य वेळ आल्यावर त्यालाही खरी किंमत कळेलच ना आपली प्रिय मित्र ?


भगवान के घर में देर है मगर अंधेर नहीं है...

हे शंभर टक्के व त्रिकालाबाधित सत्य आहे.


पण मित्र ,

नाण्याची फक्त एक बाजू पाहूनच तु आपले मत बनवत असशील , व आपली मते अकारण ठाम करून घेत असशील व आपल्या मतावरच शिश्चल रहात असशील तर त्याला मी तरी काय करणार ?

हा ही अन्यायच आहे , हे तुझं अंतर्मन बोलतंय का ?


नाण्याला दूसरी बाजूही असते व ती दूसरी बाजू न बघताच, न ऐकून घेताच तु आपले मत बनवत असशील व खरे मित्रप्रेम सोडून , भुलभूलैयाच्या युगात वावरत असशील तर त्याला मी तरी काय करणार ?


ईच्छा ईश्वराची !


कर्मभोग भगवंतालाही सुटला नाही तर आपण कोण आहोत ?


फक्त एकच विनंती आहे की ,दूसरी बाजूही ऐकण्याची तयारी ठेवावी.

अन्यथा तोही एकप्रकारे अन्यायच ठरतो.


न्यायालयात सुध्दा दोन्ही पक्षाचे म्हणने रितसर पणे ऐकून घेतले जातेच ना ?

तेंव्हाच ते सत्य प्रमाण मानले जाते.

केवळ एक बाजू ऐकूनच कोणी न्यायनिवाडा करत नाही.


मित्रा , 

प्रत्यक्ष देवाधिदेवांनाही संकटांच , भयंकर बदनामीच विष पचवावचं लागलं ना ?


राजा विक्रमादित्य, राजा हरिश्चंद्र , आदी शंकराचार्य , ज्ञानेश्वर , तुकाराम यांनाही काळानं सोडलं नाही , तर माझ्या सारख्या साधारण जिवाची काय स्थिती ?


गैरसमजाचं आणि अपमानाचं विष पचवनं खरंच महाभयंकर असतं.खरे विषही परवडलं एकवेळ.

मृत्यु सुध्दा बरा.

पण हे विष पचवनं म्हणजे , एकाकी लढलेली अस्तित्वाची लढाई.


आणि ही लढाई जिंकून पुन्हा अस्तित्व निर्माण करायचं , पुन्हा उभं रहायचं खरंच खूपच अवघड असतं .


जावे ज्याच्या वंशा तेंव्हा कळे.


यावरही मात करून जींकून दाखवणं....


हाच तर खरा जीवनाचा सिध्दांत आहे.


त्यामुळे कोणी कितीही पुर्वग्रहदुषीत गैरसमज करून घेवो, कोणी कितीही बदनामी करो, कुणाच्या ह्रदयात कितीही विष असो,

आपण प्रेमच करत रहावं.

तुझ्या सारख्या ख-या मित्रावर.


सगळ्या ख-या मित्रावर .


भलेही दहा दहा वर्षे गाठी भेटी होवो न होवो , पण पोटात गाठ न ठेवताच , सर्वांवर खरं प्रेम करावं.


आणि तरीही खूपच त्रास होणार असेल तर कायमचच दूर निघून जावं.

अगदी परदेशात सुध्दा.


कारण हाच एकमेव सुखाचा व यशाचा मार्ग असेल तर तोही स्विकारायलाच हवा.


पुन्हा आयुष्य भरासाठी गाठीभेटी नको.

पुन्हा गैरसमजाचं विष नको.


परदेशात जाऊन खूप मोठ्ठ व्हावं.खूप नाव कमवावं.

आपलं नाव ऐकूनही सगळेच धन्य होतील , एवढं भव्यदिव्य ,उत्तुंग कार्य करावं.


तरीही आपण ज्याला आपला मानला , त्या सर्वांवर प्रेमचं करावं.


शुद्ध, पवित्र, निरपेक्ष.


कारण प्रेम, पावित्र्य हे ईश्वराच्या हृदयातून निर्माण होतं.


आपणही ते तसंच आयुष्यभर जपून ठेवावं.


दूर राहुनही ते करता येतं.

त्याला दिखावा, नाटक याची कांहीच गरज लागत नाही.


शुध्द सोनं हे शुध्दचं असतं.


वातावरण कितीही गढूळ असलं तरी मोठ्या हिंमतीने त्यावर मात करून आपलं अस्तित्व निर्माण करून दाखवावं.


अशक्य आहे ?


तीव्र इच्छाशक्ती ,सद्गुरु कृपा , ईश्वरी कृपा यापुढे जगात अशक्य असं कांहीच नसतं मित्र.


तु ही असाच मोठा हो.

खूप लौकिक, नाव कमावं.

योग्य वाटलं , कांही गरज लागली तर नक्कीच आवाज दे.


मित्रा , 

आयुष्यात तुझी माझी पुन्हा कधी गाठभेट होवो न होवो , तुझ्या मनात माझ्याबद्दल कितीही गैरसमज असो,

मी तुझ्या सुखासाठी ईश्वराकडे अखंड प्रार्थनाच करेन.अगदी जीवनभर.

तु माझा द्वेष केलास तरीसुध्दा.


कारण प्रेम हे प्रेमचं असतं.


आणी आयुष्यात एखाद्यावर असं पवित्र प्रेम एकदाच केलं जातं.


तुला ह्रदय असेल तर कदाचित तुझे डोळे पाणावतील.ह्रदयशून्य असलास तर ? शिव्या देशील.


तुझी मर्जी.


तरीसुद्धा एक सच्चा मित्र म्हणून तुझ्या बद्दल माझ्या मनात आयुष्यभरासाठी फक्त प्रेम आणि प्रेमचं असेल.


कारण प्रेम हे प्रेमच असतं.


तू कायमचा दूर निघून गेलास तरीसुध्दा.


आईचा एक रट्टाही तितकाच महत्वपूर्ण असतो,तसंच माझं मनोगत समजं व ते समजावून घेण्याचा प्रयत्न कर.अन्यथा सोडून दे.


तू कायमचाच दूर निघून गेलास. याची खंत मनात आहेच.ती आयुष्यभरासाठी तशीच कायम राहील.


तु फोन कर , न कर.

माझं प्रेमामृत माझ्या ह्रदयात हे असंच कायम राहील.


दूषित गैरसमज हे जालीम विषापेक्षाही ही महाभयंकर असतात.


असो.


 *जय हरी विठ्ठल!* 


तुझाच मित्र

 *विनोदकुमार महाजन* 


🩷🩷🩷🩷🩷

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

संपूर्ण लेखांक भाग २५

ईश्वर