पती पत्नीचे प्रेम

 *पतीपत्नीचे प्रेम व सुखी* *संसाराचे रहस्य !* 


✍️ २७०९


 *विनोदकुमार महाजन* 

( आंतरराष्ट्रीय पत्रकार )


👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨


प्रेम !

पवित्र शब्द !

ईश्वराच्या ह्रदयातून निर्माण होणारे पवित्र अमृत म्हणजे प्रेम !

उच्च कोटीची आत्म्याची दिव्य अनुभूति म्हणजे प्रेम !

पावित्र्य , शुध्दता , निरागसता , निरपेक्षता ,भव्यता , दिव्यता म्हणजेच स्वर्गीय प्रेम !

जे आजच्या स्वार्थी जगात दुर्मीळ होत चालले आहे !


प्रत्येक ठिकाणी स्वार्थाच्या बाजारात पवित्र , निस्सीम प्रेम दुर्मीळ होत चालले आहे !


ईश्वरावरील प्रेम , सद्गुरू ,पशुपक्षी , निसर्ग ,

नात्यागोत्यातील प्रेम यात शुध्दता , सात्विकता नसेल तर असे प्रेम काय कामाचे ?


पतीपत्नीमधील प्रेम हेही असेच उच्च कोटीचे असते !

त्यामुळेच पती पत्नीला लक्ष्मी नारायणाचा दर्जा दिला जातो !


पण दोघापैकी एकामध्येही असे पवित्र प्रेम नसेल तर , दूसरी बाजू आयुष्यभर एकटी पडून , कुजत राहते !


म्हणूनच पती पत्नीमधील प्रेमही असेच पवित्र असावे लागते !

दोन्ही कडूनही !

तरच तो संसार आनंददायी होतो !


पती किंवा पत्नी एकतर्फी प्रेम करत असेल तर तो संसार संसार रहात नाही !


ब-याच वेळा पती सगळ्यांच्या सुखासाठी अनेक तडजोडी करत असतो !

तर अनेक वेळा पत्नीही मोठे मन दाखवून तडजोडी करत असते !

सगळ्यांच्या सुखासाठी !


पण ब-याच वेळा एखाद्या स्त्रीचा सासरी अनन्वित छळ होत असतो !


घरातील सर्वच सदस्य , संबंधित स्त्रिचा अनन्वित छळ करत असतात !

तरीही ब-याच स्त्रिया मूकपणे , सर्वांच्या सुखासाठी असा मानसिक छळवाद ही सहन करत असतात !


घरातील सदस्यांकडून अथवा आयुष्याच्या जोडिदाराकडूनही असा छळवाद , मारहाण , शिवीगाळ आजच्या युगातही होत असेल तर ते नक्कीच भयावह आहे !


नशा करून अथवा माहेरहून पैसे आणण्यासाठी आजही एखाद्या स्त्रीवर अत्याचार करत असेल आणि संबंधित स्त्रिया असा अन्याय अत्याचार निपुटपणे सहन करत जीवन जगत असतील तर ? 

हे लक्ष्मी नारायण तर दूरच ,

पैशाचिक अत्याचारच आहेत !


एखादा व्यक्ती , समाज अशा घटनेविरूध्द पेटून उठत असेल तर ते नक्कीच कौतुकास्पद आहे !


पण.? आजची सामाजिक व्यवस्थाच अशी होऊन बसली आहे की , एखादा व्यक्ती अत्याचाराविरूध्द पेटून उठत असेल आणि बंडाची भाषा बोलत असेल.... तर ?

सामाजिक वातावरण अशा " बंडखोर व्यक्तीला व्हिलन तर अत्याचारी समुहाला हिरो !" बनवून मोकळा होतो !


त्याच्या एकाकी लढ्यास ना सामाजिक पाठिंबा मिळतो ना कौटुंबिक पाठिंबा मिळतो !


एखाद्याच्या भल्यासाठी संबंधित व्यक्ती , स्त्री कठोर भूमिका घेत असेल तर अशा स्त्री , व्यक्तीलाच समाज व सगेसोयरे समस्याचे मूळ समजतात !


काळ कितीही बदलला , कायदे कितीही कठोर झाले तरी....असे सामाजिक उत्पात कधी संपणार आहेत ?

की संपणारच नाहीत ?

हा मूलभूत प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो !

कितीही विज्ञान युग आले अथवा मनुष्य चंद्रावर पोचला तरी सामाजिक विकृति समाजात चालतच राहणार हे नक्की !


घरचे सगळे काम बघून , पतीला सुख देण्यापासून ते प्रजोत्पादन व पुढच्या पिढीचा देवीच्या रूपात येऊन त्याचा आजीवन वात्सल्याने सांभाळ करणे , खरोखरीच शब्दातीत आहे !


नारीची नारायणी जरूर व्हावी पण त्याच बरोबर नराचा नारायण देखील जरूर व्हावा व नारायणी व  नारायण यांनी मिळून विश्वोध्दारासाठी व ईश्वर निर्मित सत्य सनातन हिंदू धर्मासाठी आपले आयुष्य वेचावे एवढीच अपेक्षा !


।। सर्वे भवन्तु सुखिन:।।


हरी ओम् !!

जय हरी विठ्ठल !!


🙏🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

संपूर्ण लेखांक भाग २५

ईश्वर