खेडूत

 *आम्ही खेड्यातली* *माणसं* 

✍️ २७५४


खेडं , ग्रामीण भाग म्हणजे एक जित्या जागत्या माणसांचा समुह.


आज खेड्याविषयी चार शब्द लिहीण्याचा एक छोटासा प्रयत्न.


तसा मी ही खेड्यातलाच .

माझे बालपण , माझे बरेचसे आयुष्य खेड्यातच गेलेले.

त्यामुळे ग्रामीण भागाचे अवलोकन मी जवळून अनुभवलेले आहे.


त्यातल्या त्यात माझे आजोबा , ( आण्णा ) म्हणजे तत्कालीन पोलीस पाटील.

त्यामुळे त्यांचे अठरा पगड जातीशी अत्यंत जीव्हाळ्याचे व आत्मीय संबंध.


माझे आईचे वडील ( नाना ) तेही खेड्यातले कुलकर्णी वतनदार.

त्यांचेही संपूर्ण गावावर जीवापाड प्रेम.

त्यामुळे गावात कुणी उपाशी आढळत नव्हता.


दोन्ही आजोबांची आध्यात्मिक पार्श्वभूमी .


हाच गावावरील प्रेमाचा , जिव्हाळ्याचा , आत्मीयतेचा वारसा मला मिळाला , हे माझे परम भाग्य.


खेड्यातली माणसं म्हणजे अगदी बिनधास्त.

बिनधास्त बोलणारी.

बिनधास्त प्रेम करणारी.

बिनधास्त आत्मीयता दाखवणारी.

बिनधास्त एकमेकांना सहकार्य करणारी.

बिनधास्त एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारी.


त्या चार चार तास चालणा-या पारावरच्या गप्पा.

ते बिनधास्त मनमोकळे , मोठमोठ्याने हसने.

गप्पांची मैफल.

गावातील नाटके , भजनी मंडळे , विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल.


अजूनही खेडी म्हणजे एक आदर्श उदाहरण आहे.

संस्कृतीचा एक अफलातून संगम आहे.


खरी माणसं , जीवाची माणसं पहायची  असतील,खरी माणसं जोडायची असतील, माणुसकी जपायची असतील तर मस्त खेड्यात रहावं.

खरं, नैसर्गिक जीवन जगायचे असेल तर मस्त शेतात रहावं , शेतात घर बांधाव , गाई ( गावरान गाई म्हणजे देशी गाई , गीर गाई फक्त ) पाळाव्या.

गौसेवा करावी.

शेण झाडलोट करावी.


दोन खिलारी बैल पाळावी.


काय मस्त आनंदी जीवन ना ?

जीथे गौमाता तीथे साक्षात स्वर्ग व तेहतीस कोटी देवतांचा सहवास.

पशुपक्षांचा सहवास.


 *साक्षात स्वर्ग.* 

स्वर्ग से भी सुंदर जीवन हो अपना.


आणि शहरी जीवन म्हणजे बंदिस्त फ्लॅट सिस्टिमच

भयंकर जीवन.

असह्य तडफड.


खेड्यात राहणाऱ्या माणसांना शहरी जीवन म्हणजे असह्य जीवन.


पण काय करणार ?

पोटासाठी दाहीदिशा.


सरकारने आता विशेष लक्ष घालून , खेडी सुधार योजना राबवाव्यात , म्हणजे शहराचा ताणही कमी होईल , आणि मानवी समुह पुन्हा संस्कृतीशी जोडला जाईल.


प्रत्येक खेड्यात गुरूकुल , गौशाला आरंभ करण्याचा माझा संकल्प आहे.

अगदी परदेशात सुध्दा.


केंद्र सरकारचे व संबंधित राज्य सरकारचे मला संपूर्ण सहकार्य हवे आहे. आणि भविष्यात ते मिळेल अशी आशा व अपेक्षा आहे.


अलिकडे मोदी सरकारच्या भरीव कामगिरी मुळे व सहकार्यामुळे खेडिही सुधारू लागली आहेत .

शेतकऱ्यांना अनेक सवलती व आर्थिक योजनांचा लाभ मिळू लागला आहे.

त्यामुळे ओस पडत चाललेली खेडिही आता संपन्नतेकडे जाऊ लागली आहेत.


परंतु यामध्ये आणखी भरीव कार्यक्रमांची आखणी होणे गरजेचे आहे.


शहरी कारखानदारी खेड्याकडे वळवण्याची आजची काळाची गरज आहे.


मी खेड्यातला आहे , मातीशी नातं जपणारा आहे , माझ्या गावातल्या सगळ्या अठरा पगड जातिवर , निरपेक्ष प्रेम करणारा आहे , याचा मला सार्थ अभिमान आहे.


अजूनही माझ्या गावाकडे माझी जमीन , वाडा आहे .

त्या गावात गेल्यावर अजूनही मला स्वर्गीय आनंद मिळतो.

माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी , मला हक्काने आरेतुरे बोलणारी , आत्मीयतेची माणसं माझ्या गावात आहेत.

ती खरी माणसं भेटली की मला साक्षात स्वर्ग मिळाल्याचा आनंद होतो.


अहो 

स्वर्ग कुठे आहे ?

माणसाच्या मनात , मानसाच्या ह्रदयात , ख-या प्रेमात , आत्मीयतेतच स्वर्ग आहे.

पशुपक्षात स्वर्ग आहे.

गाई गुरात , वासरात स्वर्ग आहे.

म्हणूनच स्वर्ग वेगळा शोधण्याची, देव वेगळा शोधण्याची काय गरज आहे ?

हेच तीर्थ आहे.


म्हणूनच जो खेड्यात जन्मतो व खेड्यावर , खेड्यातल्या माणसांवर भरभरून प्रेम करतो , तो खरोखरीच भाग्यवान असतो.


चला खेड्याकडे.

चला संस्कृती कडे.


पुन्हा नवा भारत घडवू या.

खेडी , देश सुजलाम सुफलाम बनवू या.


जय जय विठ्ठोबा रखुमाई .

पांडूरंग हरी.


 *विनोदकुमार महाजन* ( एक खेडूत )

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

संपूर्ण लेखांक भाग २५

ईश्वर