सवीता थोरवे मुंबई
[17/01, 11:29 pm] सविता थोरवे~ समाजसेविका: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष आदरणीय श्री माऊली थोरवे साहेब, आणि आपल्या मित्र पक्षांच्या अधिकृत उमेदवार सौ सविताताई माऊली थोरवे दोघांचेही शतशः आभार. 💐
काल मुंबई महानगरपालिका 2026 चा निकाल जाहीर झाला. आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करून मतदारांनी आपला लोकप्रतिनिधी निवडला.
आपल्या प्रभाग क्रमांक 150 मध्ये अत्यंत मैत्रीपूर्ण वातावरणात ही निवडणूक पार पडली याचा आनंद मानावा लागेल. या निवडणुकीचा सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही याबद्दल सर्वच राजकीय पक्षांचे आभार मानायला हरकत नाही.
प्रभाग क्रमांक 150 ची जनता सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेली असली तरी बौद्धिक आणि मानसिक दृष्ट्या अत्यंत आत्मनिर्भर आणि सक्षम आहे. याची अनुभूती यावेळी देखील आली.
या विभागातील जनतेच्या मनात विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावर आहे. या विभागातील जनतेला संघर्ष हा नवा नाही. मागील गेली पन्नास वर्षापासून विभागातील जनता सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय आणि व्यवसायिक क्षेत्रात आपल्या परीने संघर्षाचा इतिहास रचत आहे.
संपूर्ण चेंबूर विभागातील नगर रचना पाहता पी.एल. लोखंडे मार्ग अत्यंत दुर्लक्षित केला जाणारा विभाग आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव त्याचबरोबर सक्षम नेतृत्वाची कमतरता असल्यामुळे या विभागातील तिसऱ्या पिढीला देखील दैनंदिन जीवनातील मूलभूत सोयी सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. अरुंद अस्वच्छ अस्तव्यस्त पसरलेला हा विभाग क्षेत्रफळाने कमी असला तरी लोकसंख्येने आणि झोपडपट्ट्यांच्या दृष्टीने मोठा आहे.
सन 1950 पासून या विभागाला पायवाटेचा मार्ग म्हणून ओळख मिळाली. आजच्यासारखी वाहतूक व्यवस्था आणि मार्ग त्यावेळी अस्तित्वात नव्हता. मुंबईमध्ये पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणातून आलेल्या कामगार कष्टकरी वर्गाने या ठिकाणी वास्तव्य करण्यास सुरुवात केली.
मुंबईसारख्या ठिकाणी राहून हक्काचं असं स्वतःचं घर या मुंबई नगरीत आपल्याला परवडणार नाही याची खात्री झाल्यावर मुंबई उपनगरात झोपडपट्टीचे साम्राज्य निर्माण झालं. सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील लोक या विभागात प्रामुख्याने वास्तव्य करू लागले. त्यांच्यासोबत मुस्लिम समाजानेही याच विभागात आपला निवारा शोधला. हळूहळू देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारा कष्टकरी वर्ग या विभागातील आपल्याला परवडणाऱ्या जीवनशैलीचा स्वीकार करू लागला आणि येथेच थांबला.
1980 च्या दशकाआधी हा विभाग गरिबांचा असला तरी अत्यंत सुशिक्षित दर्जाचे जीवन जगत होता. कष्टाच्या मार्गाने पैसा कमावणे आणि आपल्या परिवारासोबत आनंदाने या ठिकाणी वास्तव्य करणे यात इथला समाज रमून गेला होता. 1980 नंतर प्रत्येक घरातील लोकसंख्या वाढली, कष्ट करून पैसे कमावणारी लोक कमी झाले प्रत्येक घरात खाणारी तोंडे वाढत गेली. तेथूनच इथे आर्थिक विषमता वाढत गेली.
1990 पासून या विभागात आपल्या सामाजिक संघर्षाची लढाई सुरू झाली, मुंबई सारख्या शहरात शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात फिरणारी तरुण मंडळी आपलं सामाजिक आणि राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागले.
पी एल लोखंडे मार्ग या नावाने नावारूपाला आलेला हा विभाग आपलं राजकीय आणि सामाजिक अस्तित्व निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगू आला.
असं नाही की या विभागाला राजकीय अस्तित्व प्राप्त झाले नाही. लोक नगरसेवक झाले, आमदार, मंत्री, व्यवसायिक उद्योजक, अधिकारी तसेच विविध क्षेत्रांमध्ये अग्रेसर होत गेले. मात्र या जन्मभूमीकडे, कर्मभूमीकडे आत्मीयतेने पाहण्याची दृष्टी त्यांच्यात निर्माण झाली नाही, हीच या विभागाची सर्वात मोठी शोकांतिका आहे.
हा विभाग अस्तित्वात आल्यापासून चौथी ते पाचवी पिढी या ठिकाणी आज वास्तव्यास आहे. दर पाच वर्षाला तीन-तीन निवडणुका होत असतात. लोकसभेची, आमदारकीची आणि काल निकाल लागलेली नगरसेवक पदाची निवडणूक दर पाच वर्षाला होत असते. खासदार, आमदार या ठिकाणी फक्त प्रचारला येतात आणि पाच वर्ष दिसतच नाहीत. निवडणुकीत आपण या विभागातील जनतेला काही आश्वासन दिले होते याचा सपशेल विसर त्या लोकप्रतिनिधींना झालेला असतो.
आपल्या कर्तुत्वावरती संघर्ष करणारा, त्याचसोबत बहुजन समाजाची ओळख असणारा आपला विभाग कधीही या लोकप्रतिनिधींच्या आशेवर राहिला नाही. तो संघर्ष करत आलेला आहे, आजही संघर्ष करतोय आणि यापुढेही संघर्ष करत राहील.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि तिचे महत्व आमच्यासारख्या सुशिक्षित लोकांना माहित आहे. नगरसेवकाची प्राथमिक कर्तव्य आणि त्याची मर्यादा याची आम्हाला पूर्णपणे जाण आहे. मात्र या विभागाच्या निर्मितीपासून ते आज पर्यंत रस्ते, वस्त्यांमधील अस्वच्छता, स्वच्छतागृहे, हॉस्पिटल, युवकांसाठी क्रीडांगण, अभ्यासिकांचा अभाव, धार्मिक स्थळांची झालेली दैयनीय अवस्था यासारख्या मूलभूत समस्यांची जाण असलेला आणि तो सोडवण्याची इच्छाशक्ती बाळगणारा कणखर नेतृत्वाचा, चेंबूर मनसे विभाग अध्यक्ष, आदरणीय माऊली थोरवे यांच्यासारखा प्रामाणिक नेता या विभागाला लाभावा ही प्रामाणिक इच्छा होती.
आदरणीय माऊली साहेबांसमोर पहिल्या भेटीत ही इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांनी यासाठी लगेच होकार देऊन उमेदवारी देखील मिळवली. फक्त दहा दिवसांच्या प्रचारात विभागातील जनतेचा दुसऱ्या क्रमांकाचा पसंतीचा उमेदवार म्हणून बहुमान मिळवला आहे. हे देखील अत्यन्त महत्वाचे आहे.
आदरणीय माऊलींना माझी एकच आग्रहाची विनंती आहे. आपल्या उमेदवारीमुळे ठाकरे परिवारातील तीन सदस्य या दुर्लक्षित विभागात आले होते. इतक्या मोठ्या नेत्यांचे या विभागात झालेले आगमन या विभागाला राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्व प्राप्त करून देणार आहे, देखील मी नम्रपणे कबूल करतो. मात्र या पुढेही आपले कार्य या विभागात लोकांना दिसत राहो ही नम्र विनंती 🙏🏻
ज्या विभागात आमदार आणि खासदार येत नाहीत, त्या विभागात आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय श्री. राज साहेब ठाकरे यांना घेऊन आलात. महाराष्ट्रातील युवकांचे प्रेरणास्थान असणारे सन्माननीय दोन्ही युवा नेते. आदरणीय श्री. आदित्य साहेब ठाकरे. आणि आदरणीय श्री. अमित साहेब ठाकरे या दोन्ही युवा नेत्यांचं आपल्यामुळे या विभागात आगमन झाले. त्याबद्दल आपले खूप खूप आभार 🙏🏻
साहेब, ही निवडणूक आपण खूप प्रामाणिक लढली, पैशाचा कोणताही गैरवापर नाही, लोकांना खोटी आश्वासने दिली नाहीत, कोणताही राजकीय दबाव नाही, सर्वांना आपुलकीने आणि प्रेमाने साद घालत आपण ही निवडणूक पूर्ण केली. हे आमच्यासाठी खूप महत्वाचे होते. आम्ही या विभागातील कार्यकर्ते आपल्या या सहकार्याबद्दल नेहमीच ऋणी राहू.
आपल्या अपयशाचे आत्मचिंतन करणे हे नक्की जबाबदार व्यक्तीचे लक्षण आहे. मात्र मर्यादित क्षमतेचा संपूर्ण वापर करून अवघ्या दहा दिवसात 3281 लोकांचा विश्वास संपादन करण्याचा बहुमान आपण मिळवलेला आहात.
आपण सन्माननीय राज साहेबांचे शिलेदार आहात. संघर्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं नातं महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. संघर्षाला घाबरून किंवा अपयशाने खचून जाणारा राज साहेबांचा सैनिक होऊ शकत नाही. त्याला जितकं अपयश मिळतं तितक्याच आक्रमकतेने तो पुढील कामाला लागतो. आपणही या अपयशाला यशाचीच पहिली पायरी मानून आपल्या सामाजिक कार्याचा आलेख अधिक उंचावत न्याल हीच अपेक्षा.
या निवडणुकीचा निकाल आपल्या सर्वांनाच वेदना देणारा आहे. मात्र या निमित्ताने शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यासोबत राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्ते एकत्र येताना दिसले आणि आपल्या पाठीशी तितक्याच खंबीरपणे उभे राहिले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. 🙏🏻🌹
आपल्या सर्वांना हे नवीन वर्ष आनंदाचे आणि यशाचे जावो ही ईश्वर चरणीं प्रार्थना करतो आणि थांबतो.
जय महाराष्ट्र 🙏🏻🌹🚩
आपला सहकारी.
गजानन आवळे.
अध्यक्ष चेंबूर नागरिक विकास संघ
[17/01, 11:55 pm] vinodkumarm826: उमेदवार योग्य आहे पण रस्ता चुकला आहे
असे वाटते
आपणासारखा खंबीर कार्यकर्ता वास्तविक भाजप मध्ये हवा.
राम कदम , प्रविण दरेकर यांनी रस्ता बदलला आणि यश खेचून आणले.
माऊली थोरवे
आपणास शुभेच्छा
भगव्याचा स्विकार करावा ही विनंती
मग यश नक्की मिळेल
👍🙏🕉️🚩💐
Comments
Post a Comment