भगवंताची बार्शी

 *बार्शीचा माझा भगवंत !!*

✍️ २४९४


 *विनोदकुमार महाजन*

पत्रकार


🕉🕉🕉🕉🕉🕉🕉


बार्शी....

एक साधारण लोकसंख्या असणार ,कमी पर्जन्यमान असणारं , दुष्काळी पट्यातील तालुक्याच गांव.

बार्शीची लोक पण साधी , सरळ , सगळ्यावर भरभरून प्रेम करणारी ,सगळ्यांना आधार देणारी , दुस-याच्या सुखदू:खात धावून जाणारी , सभ्य माणसं.

सभ्य माणसांचा गाव म्हणजे बार्शी .

बार्शीची आडत व्यापार लाईन पण मोठी.


बार्शी तस विशेष प्रसिद्ध आहे ते भगवंतासाठी.

इथे लक्ष्मीसह साक्षात भगवंताचे आजही वास्तव्य आहे.

अशी बार्शीकरांची विशेष श्रद्धा आहे.

अंबरीश राजा , दुर्वास मुनी व भगवंताची इथे विशेष कथा सांगितली जाते.

अंबरीश राजाच्या रक्षणासाठी साक्षात भगवंत इथे प्रकट झाले व आजही त्यांचे इथेच वास्तव्य आहे , असे इथले लोक समजतात.


माझ्या लहानपणी मी माझ्या आजोबांसह बार्शीला शिकायला होतो तेंव्हाचा तो काळ , त्या आठवणी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवाव्या अशा आहेत.

साक्षात स्वर्ग माझ्याजवळ चोवीस तास नांदत होता. सगळी स्वर्गीय सुखही इथे फिकी वाटतात , एवढं छान वातावरण , छान गांव .


आनंदाचे डोही , आनंद तरंग.


आजही त्या बालपणाच्या आठवणी जशाच्या तशा ताज्या तवान्या आहेत.


माझे आण्णा भगवंतापुढे बराच वेळ उभा राहून प्रार्थना करायचे.

त्यावेळी मी माझ्या आण्णांना सहज विचारलं ,

" आण्णा , एवढा वेळ भगवंताकडे काय मागता ? "

त्यावेळी माझे सद्गुरू आण्णा उद्गारले ,

" अरे बाळा मी माझ्यासाठी थोडचं देवाकडे मागतो आहे. मी तुझ्या सगळ्या सुखासाठी भगवंताकडे साकडं घालतो 

आहे " 

धन्य ते स्वर्गीय ईश्वरी प्रेम.

असे पवित्र ,भव्यदिव्य ,उदात्त , उत्तुंग , निस्वार्थ प्रेम आता कुठे शोधावे ? कुठे मिळेल ?


अजूनही असं वाटतं की , पुन्हा एकदा माझ्या भगवंताच्या बार्शी नगरीत येऊन कायमचं स्थायीक व्हावं.


नको ते पुणे , नको मुंबई ,

माझ्या भगवंताची बार्शी बरी.

नको पंढरपूर , नको आळंदी ,

माझ्या भगवंताची बार्शी बरी.

नको परदेश , नको देशविदेश ,

माझ्या भगवंताची बार्शी बरी.


माझी बार्शी ,फळावी फुलावी .

आनंदाची इथे नित्य नवी बहार यावी.


भगवंता , माझ्या बार्शी शहरातील व बार्शी तालुक्यातील तमाम लोकांना सुखी  - समाधानी - आनंदी ठेव.

हीच तवचरणी प्रार्थना.


अंबरीश वरद श्री भगवान की जय हो .


८३२९८९४१०६


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र