पालथ काळीज

 *पालथ्या काळजाची* *माणसं....?* 

✍️ २७२०


🙊🤦‍♂️🤦‍♂️🤔🙊


खरंच जगात पालथ्या काळजाची माणसं असतात का हो ?

हो असतात .

आणी अशा माणसांशी 

वागणं , बोलणं म्हणजे महाभयंकर संकट .


विशेषतः दुष्ट , मुर्ख , मंदबुद्धी , पागल , व्यसनाधीन अशी माणसं अशीच असतात .

असतातच असतात .


हेकेखोर .


स्वतःच खोटं असल तरी खरंच मानणारी .

व खोटसुध्दा पुढं रेटून नेणारी .


पालथ्या काळजाची .


त्यांना कितीही समजावून सांगा , कितीही उच्च कोटीचे प्रेम करा , अशा माणसांवर कांहीच फरक पडत नाही .


उलट अशी माणसं आपल्यालाच उपदेश करतात , आपल्याशीच भयंकर हुज्जतच

घालतात . 


पालथ्या घड्यावर पाणी .


म्हणून अशा माणसांच्या नादी नाही लागलेल बरं .

अशापासूंन नेहमी चार हात लांब राहीलेलचं बरं .


।। दुर्जनंम् प्रथमंम् वंन्दे ।।

हेच खरं .


आपल्याला समाजात अशी माणसं नेहमीच भेटत असतात .

यांना दुरूनच नमस्कार केलेला बरा .


मुर्खाच्या नादी कधीही लागूं नये . दुष्टांच्या व कपटी लोकांच्या तर ? मुळीच नादी लागू नये .


तत्वज्ञान शहाण्याला सांगावं .


एकवेळ दगडालाही पाझर फुटेल असं म्हणतात .

पण पत्थरदिल माणसं म्हणजे....

महासंकट .


एखाद्या दगडाला शेंदूर लावला तर त्याचाही देव होतो .


पण पत्थरदिल माणसं ?

यांच्यावर कितीही प्रेम करा .

यांना कितीही समाजावून सांगा . यांच आयुष्य सुधारण्यासाठी कितीही प्रयत्नाची पराकाष्ठा करा....

कांहीही उपयोग होत नाही .


आपलं डोकं फुटलं ?

तरीही यांच्यावर कांहीही फरक पडत नाही .

आपलं डोकं फुटून रक्तबंबाळ झालं ? 

तरी अशी माणसं....?

कधीही सुधरत नाहीत .


आपलं डोकं रक्तबंबाळ होऊन आपला जीव गेला ?

तरी यांच्यावर कांहीही फरक पडत नाही .


उलट हेच पालथ्या काळजाची माणसं आपल्याला म्हणतील....

" बरं झालं मेला...आपल्या कर्मानं मेला...."

अन् वरं पुन्हा आपल्यालाच हसतील सुध्दा .


आता मला सांगा....

अशा पालथ्या काळजाच्या माणसांवर प्रेम करून तरी कांहीं उपयोग होईल का हो ?


मुळीच नाही .


एकवेळ पशुपक्षी सुध्दा आपल्यावर निर्वाज्य , खरं प्रेम करतील . आपलं खरं प्रेम समजतील .


पण पालथ्या काळजाची माणसं ?

कधीही सुधारणार नाहीत .


म्हणून अशा माणसांना सुधारण्याचा अथवा त्यांना चांगलं सांगण्याचा कधीही प्रयत्न करू नये .


त्यापेक्षा मौन , अबोला , दुरावा , एकांत व ईश्वरी चींतन बरें .

त्याने आत्मकल्याण तरी होईल .


।। मौनं सर्वार्थ साधनंम् ।।


 ।। *जय हरी विठ्ठल* ।।


🤫🥸🥸🥸🥸


 *विनोदकुमार महाजन*

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

संपूर्ण लेखांक भाग २५

ईश्वर