माझा कृष्ण
*कुणी काळा कृष्ण म्हणो...*
✍️ २७२२
✅✅✅✅✅
कुणी म्हणे गोविंद
कुणी म्हणे गोपाल
कृष्णाला नांवे किती ?
कुणी म्हणे सावळा
कुणी म्हणे काळा
कृष्णाची रूपे किती ?
कुणी म्हणे रूक्मिणी पती
कुणी म्हणे सत्यभामेचा
पण रमतो कसा हा राधेच्या
घरी ?
कुणी म्हणे मिरेचा
कुणी म्हणे राधेचा
कुणी म्हणे अर्जुनाचा
कुणी म्हणे सुदाम्याचा
प्रत्येकाच्या ह्रदयात हा काळा राहतो कसा ?
कुणी म्हणे सुदर्शन चक्र धारी
कुणी म्हणे मधुर मुरलीवाला
कुणी म्हणे श्रीकृष्ण: शरणं मम्
लिला तरी अगाध हा दावितो किती ?
कुणी म्हणे कपटी
कुणी म्हणे नाटकी
कुणी म्हणे महाभारत रची
कुणी म्हणे अंतरज्ञानी
सगळ्यांच्याच ह्रदयात हा
कान्हा राहतो कसा ?
कुणी म्हणे माखनचोर
कुणी म्हणे नंदकिशोर
कुणी म्हणे रणछोडदास
श्रीकृष्णाची सांगा येड्यांनों नांवे किती ?
सगळ्यांनाच हा कसा वेडा करी ?
कुणी म्हणो काळा
कुणी म्हणो सावळा
पाप्यांचा हा युगेयुगे संहार करी
भक्तांचे आपल्या सदैव रक्षण करी
माझा श्याम
तुमचा श्याम
सगळे मिळून बोलू
जयजय राधेश्याम
श्रीकृष्ण : शरणं मम्
श्रीकृष्ण : शरणं मम्
🙏🙏🙏🙏✅
*विनोदकुमार महाजन*
Comments
Post a Comment