मोठी माणसं
*मोठी माणसं ?*
✍️ २७१९
🤔🤔🤔
------------------------
जो मनानं मोठा आहे तो मोठा .
जो विचाराने मोठा आहे तो मोठा .
जो स्वकर्तृत्वाने मोठा आहे तो मोठा .
जो इतरांचं सुखदुःख समजावून घेतो तो मोठा .
जो इतरांच्या सुखदु:खात सहभागी होतो तो मोठा .
जो समाजाचं सुखदुःख समजावून घेऊन त्यांना आधार देतो तो मोठा .
धनाने मोठा आहे पण मनाने छोटा तर ?
तो मोठा कसा होईल ?
म्हणुन धनाने मोठं असणं किंवा होणं महत्वाचं नाही तर मनानं मोठं , श्रीमंत होणं महत्वाचं आहे .
त्यामुळे सगळेच धनी लोकं समाजातील सुखदुःख समजावून घेतात का ?
समाजाला योग्य मार्गदर्शन करून सामाजिक सलोखा , आत्मीयता वाढवतात का ?
म्हणूनच आत्मकेंद्री श्रीमंती घातक असते तर समाजामुख श्रीमंती तारक असते .
आज समाजामुख श्रीमंत कमी आणि आत्मकेंद्री श्रीमंतच जादा दिसताहेत .
श्रीमंत असावं . श्रीमंत असणं गुन्हाही नाही .
पण परदु:ख शितल असणारी श्रीमंती नको तर परदु:ख समजावून घेणारी श्रीमंती असावी .
मी बरेच श्रीमंत बघितले . पण बरेचसे मनाने कंगाल बघितले .
धनाने आणि मनाने श्रीमंत असणारे विरळा .
असे धनवान, आपण त्यांना शंभर फोन करा , मेसेज पाठवा , उत्तर देणार नाहीत...अशी माणसं आत्मप्रौढी व आत्मश्रीमंती मध्ये अडकल्या सारखी वाटतात .
अहंकार .
तर सामाजिक समस्यांमध्ये धाऊन जाणारी माणसं ईश्वराधिष्ठीत व समर्पीत जीवन जगणारी वाटतात .
सामाजिक कार्य वाढवण्यासाठी आपणाला सगळ्यांच्या आत्मिय सहकार्याची अथवा त्यांच्या मार्गदर्शनाची नितांत गरज असतेच .
पण धनवान व्यक्ती समाजात वरपांगी मिसळून आपला वैयक्तिक स्वार्थ साधण्यामध्ये निपुण असतात .
एखादा गरजवंत , अडला नडलेला त्यांच्याकडे गेला तर त्याला अशी संबंधित माणसे निट बोलतही नाहीत .
त्यांना मार्गदर्शन करणे तर दूरच .
आपली धन श्रीमंती वाढवण्यातच अशी माणसे रस्ते शोधत असतात .
धन वैभव हाच त्यांचा आत्मा असतो .
तर कांहीं कुढ्या वृत्तिची माणसं स्वकर्तात्वर पुढे येणारालाही सतत दुषणे देत असतात .
स्वतः मध्ये कर्तत्वशून्यता आणी दुस-यांना दुषणे हा त्यांचा मानसिक आजार असावा .
माझी इच्छा सदैव अशी असते की माझा प्रत्येक भारतीय , माझा प्रत्येक सनातनी बंधू व ईश्वराधिष्टीत जीवन जगणारा प्रत्येक जण धनाने तर श्रीमंत व्हावाचं , शिवाय मनाने पण श्रीमंत व्हावा .
कारण गरीबी हा जसा भयंकर शाप आहे तसाच सामाजिक विकृती हा पण एक फार मोठा शाप आहे .
म्हणून नवसमाज निर्मितीसाठी स्वतःला झोकून देऊ या .
वैभव दायीनी माता महालक्ष्मी सर्वांना श्रीमंत करो हीच तिच्या चरणी प्रार्थना .
🙏
माता महालक्ष्मी की जय .
✅✅✅✅
*विनोदकुमार महाजन*
Comments
Post a Comment