आत्मियता
*आत्मीयता संपली आहे* *का ?*
✍️लेखांकन : - २७१८
💁💁♀️💁♂️
मित्रांनो ,
खरंच जगातुनच
प्रेम , आत्मीयता , ममत्व , स्नेह , आपुलकी , माया , वात्सल्य संपत चालले आहे का ?
मानसाची मने रूक्ष , एकाकी बनत चालली आहेत का ?
घराघरायुन वात्सल्य , आत्मियता संपत चालली नव्हे तर , मनामनात दूरावे निर्माण होतं चालले आहेत का ?
एकमेकांच्या सुखदु:खाबद्दल खरंच कुणाला कांहीच वाटेनासे झाले आहे ?
एकमेकांपासून दूर राहण्यातचं समाज मनातील ब-याच घटकांना आनंद वाटतो आहे का ?
मानसाची मनं बोथट , संवेदनाशून्य बनत चालली आहेत का ?
संवेदनशीलता पार हद्दपारच होत चालली आहे का ?
हा काळाचा प्रभाव आहे की डाॅलरचा की समाजरचनेचा ? की सामाजिक आत्मकेंद्री पणाचा ?
समाजात वरपांगी दिखावा जसा वाढतो आहे तशीच मनामनाची उदासिनता , घालमेल ही खरंच वाढते आहे ?
नात्यागोत्यात दुरावा का वाढतो आहे ?
सामाजिक तेढ , नात्यागोत्यातील तेढ वरचेवर का वाढत आहे ?
आणि यावर उत्तर काय आहे ?
आत्मकेंद्री स्वभाव वाढत जाऊन , आत्मसंशोन , अंतर्मुखता कमी होत चालली आहे का ?
माझ्या लहानपणीचा काळ हा खरंच स्वर्णीम काळ होता .
माणसाची मनं मोठी होती , त्यामुळे माणसंही एकमेकांवर भरभरून प्रेम करायची .
सुखदुःख वाटायची .
भरलेल्या जुन्या वाड्यामधून हास्याचे फवारे उडायचे . आनंदाचे तरंग उमटायचे . माणसं एकमेकाची मनं जपायची .
आनंदाचे डोही आनंद तरंग..
आणि आता... बिनधास्तपणे मन जोडनं तर दूरच , एकमेकाची मनं जाणीवपूर्वक तोडली जातात . ?
एकमेकावर कुठाराघात केले जातात . ?
आणि आता समाजामध्ये मानसाची मनं दुखावण्यामध्येच धन्यता वाटते आहे का ?
का ???
कुठं हरवलो आपण ?
कुठे काळ हरवला तो ?
कुठे हरवले ते एकमेकावरील दिव्य प्रेम ?
एवढा विचित्र अन् विकृत समाज का निर्माण झाला .?
एकमेकाची प्रेमानं मनं जपायची , प्रेमानं मनं जिंकायची , एकमेकांना उच्च कोटीचा आनंद द्यायचा , एकमेकांची सुखदुःख समजावून घेऊन, एकमेकांना सुखदु:खात खंबीर आधार द्यायचा ,...
खरंच असा काळ हरवला ?
जो प्रेमाने , वात्सल्याने , आत्मीयतेने वागायचा प्रयत्न करतो तोही मुर्ख ठरला जातो ?
खरंच उच्च व आदर्श भारतीय संस्कृती कुठे लोप पावत चालली आहे ? आणी याची कुणाला खंतही नाही.?
आणि ज्याला याची खंत आहे , त्याची किंमत मात्र शून्य आहे.
आणि हेच भयंकर सामाजिक सत्य व समाजाचं विदारक चित्र आहे का ?
आणि याला उत्तर कांहीही नाही ???
एकत्र कुटुंब व्यवस्था मोडीत निघाली इथपर्यंत ठीक आहे.
पण विभक्त कुटुंब पध्दतीमध्ये आत्मीयता ही संपुष्टात आली का ?
हे कशाचे द्योतक आहे ?
समाज जोडणीचे प्रयत्नही संपत चालले ? उलटपक्षी समाज मन तोडण्याचे , असंतुष्ट करण्याचे , कलह वाढवण्याचे प्रयत्नच वाढू लागले ?
कशासाठी ?
एकमेकावर जिवापाड प्रेम करने , संकटात एकमेकांना खंबीर आधार देणे तर जवळजवळ दुरापास्तच होत चालले आहे का ?
की ही खरंच धर्म ग्लानी आहे ?
भयंकर धर्म ग्लानी आणि धर्म संकट !!?
यावर एकच उतारा व उत्तर आहे का ...??
अवतारी युगपुरूषाची...
भगवान श्रीकृष्णाच्या पुनरागमनाची...
प्रतिक्षा....
येईल का हो खरंच अवतारी युगपुरुष ?
सत्य अन् धर्म तारावया ?
येईल...
नक्कीच येईल...
" यदा यदा हि धर्मस्य...."
हे वचन पुर्ण करण्यासाठी तो येईल...
आज तो अवतारी युगपुरुष अवतरीत झाला आहे का...
प्रगट होण्याची त्याची वेळ पण जवळ आली आहे का ?
कोण आहे तो...
कुठे आहे तो...
श्रीकृष्ण: शरणं मम्
श्रीकृष्णार्पणमस्तु
🕉️🕉️🕉️🚩🚩
*विनोदकुमार महाजन*
Comments
Post a Comment