मिठी

 *झाडाला कडकडून मिठी* *मारा...!!*

✍️ २८६९


 *विनोदकुमार महाजन* 


🌳🌳🌳🌳


 *होय...*

जेंव्हा माणसं आपल्याला विसरतात , धोका देतात...

तेंव्हा ? पशुपक्षी आपणावर प्रेम करतात.

नक्कीच प्रेम करतात.

अनुभव घेऊन बघा.

नक्कीच प्रचिती येईल.

पण ? त्यासाठी तुमची संवेदना जागृत हवी.उच्च कोटीचा प्रेमभाव ह्रदयात हवा.


आपले सुखदुःख व्यक्त करतात .गायी  , बैले सुध्दा साथ देतात.त्यांनाही प्रेमाची भाषा कळते.

ते सुध्दा आपल्यासाठी रडतात हो...मुके जीव...

किती प्रेमाने आपल्याला चाटतात ते बघा.


सुखदुःख व्यक्त करायला झाडे सुद्धा साथ देतात आपल्याला.

प्रत्येक सुखदुःखात त्यांना कडकडून मिठी मारली की ते ही ?

आपले सुखदुःख हलके करतात.

आपला आनंद द्विगुणित करतात.

तर ?

आपले दुःख शोषून घेतात आणि ?

जमीनीत सोडतात.


एका न्हाव्याची गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे ना ?


एक न्हावी एका राजाकडे त्याची दाढी कटिंग करायला जायचा.

पण ?

राजाचे कान नेहमी झाकलेले असायचे ते ?

न्हाव्यापुढे कटींग करताना उघडे पडायचे.

आणी गंमत म्हणजे...

त्या राजाचे कान ?

लांब होते लांब...

अगदी गाढवा सारखे.

आणी त्या राजाने न्हाव्याला तंबी दिली होती की...

" जर तू ही बातमी कुणाला सांगितली तर ? तुझा शिरच्छेद करेन..."


झालं... न्हावी हादरला.

पण मनोमन बेचैन पण झाला.

आता ही बातमी सांगायची तरी कुणाला ?

ती...बातमी...?

 *लीक* झाली तर ?

राजा मुंडकं तोडेल.


पण म्हणतात ना ?

एखादी गोष्ट कुठेतरी बोलल्याशिवाय , सुखदुःख हलकं केल्याशिवाय , मन हलकं होतं नाही...?

तसं नेमकं त्या न्हाव्याचं झालं.

बोलायचं कुठं ?


मग त्याने एक...

शक्कल... *आयडिया* 

लढवली...

तो दूर एका बांबूच्या बेटात गेला आणी ?

बांबूला घट्ट मिठी मारत कवटाळून बोलला...?

" राजाला गाढवासारखे लांब कान आहेत..."

हे दररोज असंच घडत चाललं.

पण ? त्यांन मात्र न्हाव्याचं मन ?

हलकं , मोकळं झालं.


पण तिकडे झालं काय तर ?

बांबूलाही हे असह्य झालं...आणी ?

बांबूच्या बेटातून आवाज ऐकू येऊ लागला...

" राजाला गाढवासारखे लांब कान आहेत..."

जाणारे येणारे , ऐकणारे बघे सुद्धा ?

आश्चर्य चकित झाले.


ही गोष्ट त्या न्हाव्याला कळाली.

त्यानं तत्काळ बांबूच ते बेट गाठलं आणी ?

ते बांबूचं बेट...

खसा खसा करवतीने कापून काढले...

काम तमाम...


बंधुंनो हे असंय तर एकंदर.

यातला विनोदाचा , गमतीचा , दंतकथेचा भाग सोडला तर ?

एवढं मात्र नक्की की ,

झाडांना सुद्धा मन भावना असतात.

व ते व्यक्त सुध्दा करतात.


असो...

तुम्ही पण बघा अनुभव घेऊन...

सुखदुःखात झाडाला बोलून , अगदी आनंदाने त्याला मिठी मारून , अथवा ढसढसा रडून...?


नक्कीच तुमचे मन हलके , मोकळे होईल.

माझा अनुभव आहे.


मी तर नेहमीच , औदुंबराच्या झाडाला , प्रत्यक्ष दत्त समजून , प्रत्येक सुखदुःखात मिठी मारतो.

सुखातही आणी दुःखातही ?

आणी ?

गुरू दत्तात्रेय यांचेकडून मला तसा प्रतिसाद सुद्धा मिळतो.


 *अवधूत चिंतन श्री* *गुरूदेव दत्त...*

 *दिगंबरा दिगंबरा श्रीपाद* *वल्लभ* *दिगंबरा...*


🌳🌳🌳🙏

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

सोनारीचा काळभैरवनाथ

विश्व विजेता हिंदु धर्म