देवा तु मला पाहिजे

 *देवा , तु मला पाहीजे...!*

✍️ २८५८


 *विनोदकुमार महाजन* 


🙏🙏🙏🙏


देवा ...

तु मला पाहीजे.

खरंच रे देवा , तुच मला पाहीजे.

सुख असो अथवा दुःख ,

श्रीमंती असो अथवा गरीबी,

तु मला पाहीजे.


देवा मला तु कांहींही नाही दिलंस तरी ?

तुच मला पाहीजे.


यश नको , किर्ती नको , धन नको , वैभव नको ,

तुझे चरण मला पाहीजे.

देवा तु मला पाहीजे.


दु:खाचे डोंगर असो ,

जीवनाची कठीण परीक्षा असो ,

तु कशातच साथ नाही दिलीस तरी चालेल पण ? 

देवा मला तु पाहीजे.


तुझं निरंतर , निर्व्याज , पवित्र , शुद्ध प्रेम मला पाहीजे.

जन्मोजन्मीच , कधीही न तुटणारं , कधिही भंग न पावणारं , तुझं माझं घट्ट नातं मला पाहीजे.

देवा तु मला पाहीजे.


मी तुझ्यावर रूसलो , रागावलो , तुझ्यावर मी प्रेम नाही केलं , तुला चिडवलं तरीही ?

देवा तु मला पाहीजे.


जन्मोजन्मी तु मला पाहीजे.

जगन्मिथ्या..ब्रम्हंसत्य..

हेच अंतिम सत्य आहे रे देवा...

म्हणूनच देवा तु मला पाहीजे.

देवा तु मला पाहीजे.


वेडी माणसं ?

कितीही प्रेम केलं तरी 

साथ सोडतात...

स्वार्थ नाही साधला की ?

दूर निघून जातात.

पण देवा ?

तु तर या सगळ्याच्या पलीकडे असतोच.

रूसलं रागावलं तरी तु ?

प्रेमच करतोस.

अगदी आईसारखं...

निष्पाप , निरपेक्ष...

म्हणूनच देवा तु मला पाहीजे.


खरंच सांगा...? आपल्यालाही कुणी असं खरंखुरं प्रेम करणारं जगात कुणी भेटेल का हो ?

मला फक्त तु पाहीजे ,

मला तुझं कांहीं कांहीं नको...

फक्त मला तुझं प्रेम पाहीजे आणी ?

फक्त तु पाहिजे...??

असं म्हणणारं आणी खरं ईश्वरी प्रेम करणारं कुणी भेटेल का हो ?

खरंच कुणी भेटेल का हो ??


 *श्रीहरी...* 


🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

सोनारीचा काळभैरवनाथ

विश्व विजेता हिंदु धर्म