आलिंगन

 *आलिंगन - भगवंताचे !*

✍️ २८७०


 *विनोदकुमार महाजन*


🌞🌞🌞🩷 


आपण आपल्या आयुष्यात नक्कीच कुणावर तरी खरे प्रेम करत असतो.

अगदी ह्रदयापासूनचे.


नाती गोती , मित्र परिवार यावर सुद्धा आपण ब-याच वेळा , निस्सिम , निष्कपट प्रेम करत असतो.


बरेच दिवस , कांहीं कारणाने, आपल्या व नात्यागोत्यांच्या , मित्रांच्या गाठीभेटी होत नाहीत.

आणी मग आपणाला त्यांच्या भेटीची एक ओढ लागते.

बरेच दिवस भेट न झाल्यामुळे मनाला हूरहूर लागते.


आणी अचानक, ध्यानीमनी नसताना त्यांची भेट झाली की ?

आपणास स्वर्ग प्राप्तीचा एक अलौकिक आनंद मिळतो.

आणी आपण त्या व्यक्तीस अगदी कडकडून मिठी मारतो.

अत्यानंदाने.


उत्स्फूर्त प्रेमाचे ते एक स्वर्ग तुल्य आलिंगन असते.

ते प्रत्यक्षात दोन देहाचे मिलन नसते तर ? दोन आत्म्यांचे मिलन असते.


एकमेकांची अत्यानंदाने कडकडून भेट घेणे.आणी त्यातला तो परमोच्च आनंद...

याचे वर्णन खरोखरीच शब्दात काय करावे ?


अगदी असंच अलौकिक पवित्र नातं , भक्त आणी भगवंताचं असतं.


भक्ताला भगवंत दर्शनाची ओढ असते. आणी ?

भगवंताला सुद्धा ?

आपल्या ख-या भक्तांच्या भेटीची , अगदी कडकडून भेटीची , गळाभेटीची ओढ असते.

अशा दिव्य प्रेमासाठी आणी उत्तुंग अनुभूती साठी देव सुद्धा भूकेलेला असतो.


भगवंताला सुद्धा आपल्या भक्ताला कडकडून आलींगन द्यावं वाटतं , आपल्या भक्ताला कडकडून मिठी मारावी वाटते.


आणी अशा अलौकिक भेटीचा आनंद काय वर्णावा ?


होय , देव भावाचा भूकेला असतो.

त्याला फूले माळा, दान दक्षिणा, नैवेद्य आरती कांहीं कांहीं लागत नाही.


त्याला कांहीं कमी आहे का हो ?

मग तो तुमच्या कडे असलं स्वार्थी ( मला हे दे , मला ते पाहीजे ) प्रेम कशाला मागेल तो ?

त्याला तर शुद्ध , पवित्र , निरपेक्ष प्रेम लागतं.


म्हणूनच तर तो ख-या भक्ताची अगदी आतुरतेने वाट बघत असतो.


माझाच एक अनुभव सांगतो.


तसा मी सुद्धा एक कृष्ण भक्त.आत्यंतीक प्रेमाने मी सतत कृष्ण कृष्ण नामजप करत असतो.

त्याला अहोरात्र आर्ततेने हाका मारत असतो.


मी कांहीं दिवस , पंढरपूर जवळील गोपाळपूर येथे रहायला होतो.

तिथलं कृष्ण मंदिर अगदी लोकप्रिय आहे.


मी गोपाळपूरला रहायला गेलो आणी ?

एक दिवस एक दिव्य स्वप्न पडलं मला.

स्वप्नात मी गोपाळ कृष्ण मंदिरात गेलो.

दस दिशांना एक दिव्य प्रकाश पडलेला मला दिसला.आणी ?

कृष्ण धावतच आला आणी मला त्याने अक्षरशः कडकडून मिठी मारली.


एक अवर्णनीय गळाभेट होती ती.

ती गळाभेट मला अजूनही जसीच्या तशी आठवते.


माझ्या सद्गुरू आण्णांनाही मी नेहमीच अशीच कडकडून मिठी मारायचो.

तो अत्यानंद काय वर्णावा ?


अगदी तशीच कडकडून मिठी मला माझ्या श्रीकृष्णाने अत्यानंदाने गोपाळपूरात मारली. अत्यानंदाने त्याने आलींगन दिले मला...


स्वप्नातील ती भेट नेहमीच मला स्मरते.


पण मी तर भगवान श्रीकृष्णाला , आई महालक्ष्मीला असे सांगत असतो की ,

" तुम्ही मला स्वप्नात आलींगन , गळाभेट देऊ नका , आता साक्षात देह धारण करून , गळाभेट ,आलींगन द्या "


शेवटी आपण सगळीच त्या भगवंताची लेकरं आहोत.

आपली उच्च कोटीची श्रद्धा , भक्ती , प्रेम ईश्वरावर खरोखरीच असेल तर ?

त्याला प्रत्यक्ष देह धारण करून , दर्शन द्यायला काय हरकत आहे ?

माणसांना आपली खरी कींमत कळो अथवा न कळो , भगवंताला मात्र आपली खरी कींमत , योग्यता नक्कीच ओळखता येते.


म्हणूनच तर प्रत्येक संतांसाठी तो अगदी दूडूदूडू धावत येतो.


आणी नंतर ? गोपाळपूरातील स्वप्न दृष्टांतांनंतर , पुढे कांहीं दिवसांनी, माझ्या आण्णासह स्वप्नात कोणत्या तरी अद्भुत व दिव्य ठिकाणी...राधाकृष्णाची भेट झाली.

पण ही गळाभेट नव्हती तर ? ते दर्शन होते.

दिव्य दर्शन.

सार्थकतेचे व दिव्य प्रेमाचे दर्शन.


राधाकृष्णाचे अजरामर प्रेम.


आपणही भगवंतावर असेच दिव्य प्रेम करावे .

त्याच्या भेटीची ओढ लागली की तो नक्कीच तुम्हाला सुध्दा मोठ्या प्रेमाने आलींगन देईल.

गळाभेट देईल.

आनंदाने मिठी मारेल.


" *ज्या सुखा कारणे...* *देव* *वेडावला..."* 

ते सूख , ते वेडं प्रेम आपणही अगदी वेडंपिसं होऊन , आपणही भगवंताला अर्पण करु या.


 *भगवान श्रीकृष्ण की* *जय* 

 *सद्गुरू आण्णा की जय* 

 *राधेकृष्ण* 


🌞🌞🌞🩷

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

सोनारीचा काळभैरवनाथ

विश्व विजेता हिंदु धर्म