हक्क संपलेले आहेत

 *हक्क ? संपलेले* *आहेत ???*

✍️ २८९३


 *विनोदकुमार महाजन* 


💔💔💔💔


होय...

हक्क...

एकमेकांनी एकमेकांना भांडण्याचे हक्क...


ती लहान पणीची लुटूपुटूची लडाई , झगडे , भांडणे , रूसवे फुगवे...

आणी ?

कांही क्षणातच सगळे कांहीं विसरून ?

पुन्हा प्रेमाने एकमेकांना हाका मारणे , पुन्हा ती लपाछपी खेळणे...

पुन्हा एकमेकांवर जीवापाड प्रेम करणे...?


खरंच किती रम्य होतं ना ते बालपण ?

रूसवे फुगवे असुनही ह्रदयात प्रेम , माया , ममता , ममत्व , आत्मीयता होती.

एकमेकांना एकमेकांची ओढ होती.

कोणी चार दिवस बाहेर गावी गेले तर ? पुन्हा भेटीची हुरहुर होती , ओढ होती.

नात्यात ओलावा होता.


सगळ्यांची मनं ? जीवंत पाण्याचे वाहते झरे होते.

खळाळते झरे.

खळखळून हसणारे जीवंत झरे.


एका झाडावरच्या फांदीवर सगळेच पक्षी छान , मस्त आनंदात रहात होते , आनंदाने बागडत , विहरत होते.


रम्य ते बालपण...

पाहुण्या रावळ्यांची रेलचेल.

ती गप्पांची रात्र रात्र चाललेली महीफल.

ते मोठमोठ्याने , गर्जना करून , केले जाणारे हास्याचे कारंजे , मनसोक्त हास्याचे फवारे...


पण...???

हळूहळू दिवस सरले.

नात्यात अंतर पडू लागले.हळूहळू हे अंतरही वाढू लागले.

एकमेकांची ती ओढ , आत्मियता संपत चालली.

हळूहळू प्रेमाचे , मायेचे झरेही आटू लागले.


एका झाडावरच्या एका फांदीवर बसणारे , सदैव किलबिल करणारे ते पक्षी ?

नेहमीसाठी ? दूर उडून गेले.


कोणी या गावी , कोणी त्या गावी...

कामधंद्यानिमीत्त सगळेच दूर निघून गेले.


आत्मीयतेचे झरे आटत गेले.एकमेकांच्या भेटीची ओढ , हूरहूर पार संपून गेली.


उरल्या त्या आठवणी.

फक्त आठवणी.


मोहमायेच्या अन् पैशाच्या बाजारात सगळंच एका झटक्यात भूर...$$$ उडून गेले.


नात्यातला दूरावा ही हळूहळू वाढत गेला.

एक क्षणही ज्याच्या वाचून करमत नव्हते , त्यांच्या दहा दहा , विस विस वर्षे गाठीभेटी नाही झाल्या तरी ?

कुणाला कांहीच सोयरसुतक राहील नाही.


दूरावा वाढत गेला.

न जाने का कोण जाणे ?

मनंही भकास , हताश , उदास बनत गेली.


काय झालं समाजाला ?

काय झालं समाज रचनेला ?

काय झालं समाज व्यवस्थेला ?


माणूस ? माणसापासून दुरावला.

कायमचा.

ओढ , वात्सल्य , ममत्व संपलं.

आत्मियता संपली.


ह्रदये पण हळूहळू शुष्क होत गेली का हो ?

अगदी सगळ्यांची ?


संसाराचा फाफटपसारा वाढत गेला.

बायका पोरातही जीव रमेनासा झाला.

अगदी प्रत्येकाचा ?


मग ही मनाची उदासी आहे की उच्च कोटिचे वैराग्य ?

की जगाचे टप्पे टोणपे खाऊन , नको ते वाईट अनुभव घेऊन , 

आलेली आत्मग्लानी होय ?


कुठे हरवले ते पुर्वीचे दिवस ?

तो बालगोपालांचा रम्य मेळा आणी ?

सगळ्या चिमण्यांचा एकत्र ऐकू येणारा तो चिवचिवाट ?


काळाच्या उदरात सगळं कांहीं गडप झालं.

उरल्या त्या आठवणी...

चिमण्यांच्या आणी ? चिमण्यांच्या पिलांच्या आठवणी...??


एकमेकांना हक्काने भांडण्याचे आणी ? पुन्हा एकमेकांना मायेने बोलण्याचे ते रम्य दिवस केंव्हाच भूर्र... करून उडून गेले आहेत.


बस्स्...आता फक्त आणी फक्त...हरी हरी करत बसायचं...

ईश्वरालाच आपलंसं करून घेऊन ?

मस्त मजेत आणी आनंदात जगायचं...


जीना इसी का नाम है...


 *जय हरी विठ्ठल...* 


💘💘💘💘

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

सोनारीचा काळभैरवनाथ