दाब

 *वरचा खालच्याला* *दाबतो...*

✍️ २८९२


 *विनोदकुमार महाजन* 


👍👍👍👍


होय...जणू निसर्ग नियमच आहे हा...

वरचा नेहमीच खालच्याला दाबत राहतो ?


मराठी म्हणीमध्ये अनेक म्हणी आहेत...

जसे...

" वासरात लंगडी गाय शहाणी... 

सत्तेपुढे शहाणपण चालत नाही...

बळी तो कान पिळी...

ज्याच्या हाती ससा तो पारधी..."

वगैरे वगैरे...


" बाॅस आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना नेहमी दाबत राहतो...

नवरा बायकोला नेहमी दाबत राहतो...

मिळवती बायको नव-याला दाबत राहते...

श्रीमंत बायको ? गरीब नव-याला दाबत राहते...?

मोठा छोट्यांना दाबत राहतो...

दादा , भाई सगळ्यांनाच दाबत राहतो..."

इत्यादी इत्यादी...


दाब , दबाव , दबावतंत्र , दादागिरी वगैरे शब्द चांगलेच लोकप्रिय आहेत.


खरं खोटं देवचं जाणे.

पण साधारण पणे वरील विचारात बरेच तथ्य असावे असे वाटते.


कारण हवेचा सुध्दा दाबच मोजला जातो.

राजकारण सुध्दा ब-याच वेळा दबाव तंत्रावरच चालते असे म्हणतात.

दबावतंत्र नाही ते राजकारण कसले ?


एकंदर काय तर ?

सगळे जगचं दाबावर चालतयं का ?

होय...


अगदी वरीष्ठांचा दाब नसेल तर ?

उनाड पोरं सुध्दा अगदी बिथरून जातात.आणी ? उभं आयुष्यच जवळजवळ बरबाद करून टाकतात.


म्हणून दाब हा हवाच हवा.अगदी प्रत्येक क्षेत्रात हवा.

आणी ? दाब ?

कमीजास्त झाला की ?

आयुष्याचे गणित सुध्दा ब-याच वेळा कोलमडून जाते.


म्हणूनच तर दाब हा हवाच हवा.

पण ? योग्य वेळी , योग्य दाब असेल तरच जीवनाला नवी दिशा मिळते.


आपल्याला माझे विचार कसे वाटले ते जरूर कळवा.


 *जय हरी विठ्ठल* 


🚩🚩🚩🚩

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

सोनारीचा काळभैरवनाथ