शेतकरी राजा

 शिकुन सवरून व्हा मोठे,

आयुष्यात राहु नका हो छोटे.


बालपण गेल हसत खेळत,

खुप खुप मज्जा होती शाळेत.


शाळेत जावून काय शिकलो ?

फक्त नोकरीच करण्याच

आम्ही ठरवलं.


शेती दिली सोडुन,

खेडीही सुटली अन्

नोकरीसाठी आलो,

शहरात पळून.


मुलिंना तर नोकरीवालाच,

नवरा हवा.

शेतकरी नवरा नको गं बया.

अशी जणू जगरहाटीच बनली.


शेतक-याची पोरं

बदनाम झाली.


अस कस गं बया

कलीयुग आलं ?


उत्तम शेती,

मध्यम व्यापार,

कनीष्ठ नोकरीचं,

गणीत कस समदच,

उलट झालं.


शेतकरी राजा झाला ,

अती हैराण.

कोण हाय आता त्याला,

तारणहार ?


विचार करा गड्यांनो,

विचार करा.

जगाचा पोशिंदा,

जगाचा अन्नदाता,

असा कसा हो,

परेशान झाला ?


सरकारनं बी त्याला,

दुर्लक्षित केला.


नका असं करू बाबाहो,

नका अस करू.

टाहो फोडून,

सांगतोय मी आज,

शेतकरी राजा.


जर जगला शेतकरी,

तरच दुनिया तरल.


समदी मिळून आता,

शेतक-याला तारा.

तरच चालल समदा,

जगाचा पसारा.


कवी : - विनोदकुमार महाजन.

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र