कावळा आणी धर्म

 *✍🏽काकं स्पर्श.*( आपल्या वैदिक संस्कृतीला समजून घेण्यासाठी ही Post नक्की वाचा ! ) 🙏


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*रस्त्यावरचा उकिरडा फुंकणारा,काळ्या रंगाचा विचित्र कर्णकर्कश ओरडणारा "कावळा" त्याला श्राद्ध, कार्याला पिंडाला शिवण्याचा अधिकार कुणी दिला?? त्याने पिंडाला शिवले की ते पितरांना कसे पोचते?? याबाबतीत अनेक कुचेष्टा आणि सनातन वैदिक धर्माला नावे ठेवली जातात??*

*याचे उत्तर----*

#सनातन वैदिक संस्कृती सर्वसमावेशक आहे.या संस्कृतीने प्रत्येक सजीव-निर्जीव घटकाची उपयोगिता लक्षात घेऊन तशी व्यवस्था काही हजार वर्षांपूर्वी लावली आहे.ती व्यवस्था निर्सगाला मान्य आहे.परंतु सगळं माहित आहे असं वाटणाऱ्या माणसाला अनेक गोष्टींचे अजूनही अज्ञान असल्याने त्याच्याकडून याबाबतीत उगाच शंका उत्पन्न केल्या जात असतात.

*कावळ्याच्या बाबतीत अध्यात्मिक कथा-*

कावळा पूर्वी देव लोकीचा गंधर्व होता.अतिशय सुंदर दिसणारा आणि सुमधुर गायन करणारा गंधर्व होता.त्याने एकदा त्याच्या मनात आलेल्या पापवासनेमुळे चंद्र पत्नीस स्पर्श केला.यावेळी क्रोधीत होऊन चंद्र देवतेने त्याला शाप दिला *"हे गंधर्वा तू अतिशय कुरूप काळा दिसशील,तुझा आवाज कर्कश्य होईल.रस्त्यावर उकिरडा,घाण वेचशील. सगळीकडे तुझी हेटाळणी होईल."*

यावर गंधर्वाला आपली चूक समजली तो भानावर आला आणि चंद्रदेवतेजवळ क्षमा-याचना करू लागला.यावेळी देवाने त्याला उशाप दिला. 

"काही वर्षांनंतर भगवान श्रीविष्णू श्रीराम अवतारात तुझा उरलेला दंड देऊन तुझा उद्धार करतील." रामायण काळात प्रभुश्रीराम, सितामाता,लक्ष्मण वनवासात असताना या कावळ्याने पुन्हा आगळीक करून सीता मातेला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर श्रीरामांनी दर्भाचा बाण मारून कावळ्याचा एक डोळा फोडला.कावळ्याने क्षमा याचना केली आणि त्याची हकीकत सांगितली,श्रीरामांनी त्याला अभय दिले आणि त्याला काही वैशिष्ट्ये बहाल केली. 

"एका डोळ्याने तुला तिन्ही लोकांमधील दिव्य दृश्य पाहता येईल.जे अन्य कोणताही सजीव पाहू शकत नाही.ती दिव्य दृष्टी तुला प्राप्त होईल.कुणालाही न दिसणारे पितर(मृतआत्मे) तुला सहज दिसतील.कलीयुगात इतरवेळी तुझी सतत हेटाळणी करणारा मनुष्य मृत व्यक्तीचे श्राध्द,कार्य,पिंडदान करताना तुझी विनवणी करेल.मनुष्याच्या पितरांसाठी पिंडदान केले जाईल तेव्हा तुझ्या नावाचा वेगळा पिंड दिला जाईल.तू पिंडाला स्पर्श केल्यामुळे मनुष्याचे पितर समाधान पावतील.यावेळी मनुष्य  का.. का..काव.. काव... अशी साद घालून तुला बोलवेल. पितरांच्या मुक्तीचा आणि मनुष्याचा मानसिक समाधानाचा मार्ग तुझ्यापासून सुरु होईल."

याप्रमाणे गेली अनेक युगे कावळा आणि पिंडदान हे समीकरण सुरु आहे आणि यापुढे ते सुरु राहील.कारण ही योजना निसर्गतः आहे.

कावळ्याकडे असलेली ही वैशिष्ट्ये अन्य कोणत्याही सजीवामध्ये अजून पर्यंत आढळलेली नाहीत.

गणपती नंतर येणारा पितृ पंधरवडा हा कावळ्यांच्या विणीचा हंगाम असतो.यावेळी जर कावळ्याला अन्नपाणी मिळाले तर कावळ्यांची पुढील निपज चांगली होते.त्याचप्रमाणे त्यांना गरजेला अन्न पाणी देणाऱ्या माणसांच्या पुढील वाशांची निपज देखील निश्चित चांगली होते.निसर्ग किंवा पशु- पक्षी कधीच उपकाराची परत फेड केल्याशिवाय राहत नाहीत. मनुष्य मात्र कृतघ्न असतो.तो फक्त उपभोग घेत असतो.कधी निसर्गाचा,पशु-पक्षांचा तर कधी दुसऱ्या मनुष्याचा!

 कावळ्यांच्या विष्टेमधून अनेक वृक्ष वाढतात.मोठे होतात.

 भगवान श्रीहरी विष्णूंच्या व्यंकटेशस्तोत्रामध्ये

*"काग विष्ठेचे झाले पिंपळ"* अशा प्रकारची ओवी आहे.याच कावळ्याला श्रीविष्णूंच्या स्तोत्रामध्ये महत्वाचे स्थान देण्यात आले आहे.

कावळ्यांच्या विष्ठेमधून वड,पिंपळ,उंबर,पायर,कडूलिंब हे वृक्ष वाढून प्रचंड मोठे होतात

या झाडांमुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती होऊन कार्बनडाय ऑक्सईड या झाडांकडून ग्रहण केला जातो.

या शिवाय हे सगळे वृक्ष प्रचंड औषधी आहेत,आयुर्वेदात या झाडांना फार महत्व आहे.धार्मिक कार्यात वड,पिंपळ,उबर,पायर या झाडाची पाने,साली तसेच समिधा यांचा वापर केला जातो.या शापित कावळ्यांच्या विष्ठेपासून तयार झालेल्या वृक्षांची पाने, साली,समिधा या देवतांच्या पूजा,होम-हवन यासाठी वापरल्या जातात त्या कशा वापरायच्या??याबाबतीत कुणाच्याही मनात कसलीही शंका येत नाही.ही व्यवस्था निसर्गाची आहे.प्रत्येकाची शक्तीस्थान ओळखून निसर्गाने हि व्यवस्था लावली आहे.

वडाचे झाड व मुळ यापासून तयार झालेली औषधे हि स्त्रियांच्या मासिक पाळी तक्रारी त्याच प्रमाणे अन्य लैंगिक समस्यांवर उपायकारक आहेत.(याचसाठी स्त्रियांनी वडाची पूजा करायची आहे.त्यानिमित्ताने आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. तसेच पती व मुलांसाहित पूर्ण कुटुंब उत्तम दीर्घयुष्य पावेल.'सात जन्म हाच पती मिळावा दुसरा चान्स नको का?अशी कुचेष्टा आम्हाला अज्ञानातून सुचते'.)


कावळ्या पासून कोणतीही गोष्ट लपून राहत नाही कुणी येणार किंवा जाणार असेल तर तो तसा शकुन देतो,तो सत्य आहे. येणाऱ्या संकटांची चाहूल पहिल्यांदा कावळ्याला लागते.मनुष्याला त्याप्रमाणे तो सतर्क करतो.पण आपल्याला कुणी जाग करतंय हे मनुष्याला हल्ली कुठे कळतय? 

(गणपतीचे वाहन उंदीर याला देखील संकटाची चाहूल लगेच लागते.मोठया नौका,जहाजे यांच्यावर असलेले उंदीर मोठे वादळ येणार असेल तर कोपऱ्यातून बाहेर पडतात एकत्र येऊन मोठ्याने आभाळाकडे बघून ची...ची.. करतात.हि सूचना असते की नौका जवळच्या किनारी भागात घ्या आणि बाहेर पडा. माणसाला समजले नाहीच तर उंदीर मात्र पाण्यात पाण्यात उड्या मारून जवळचा किनारा गाठतात.म्हणून पूर्वीच्या काळी मोठ्या व्यापारी,प्रवासी नौकांमध्ये उंदीर पाळले जात असत.)

संतांनी देखील पशु-पक्ष्यांच महत्व वेळो वेळी आपल्या राचनांमधून वर्णन केले आहे.

*"पैल तो गे काउ कोक ताहे शकुन गे माये सांगत आहे"*

हि ओवी माउली ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवली ती याच अभ्यासातून.

*'रस्त्यावरील घाण वेचून सृष्टी स्वच्छ राखावी हा संदेश कावळा मनुष्याला देऊ पाहतोय.'*

कावळा माना वकड्या करून एका डोळ्याने जे पाहू शकतो ते आम्ही कितीही चस्मे,दुर्बिणी लावून पाहू शकत नाही.

"काव..काव..किंवा का..का.."

याचा एक संस्कृत आणि तामिळ अर्थ असा आहे की 'पितरांनो आमचं रक्षण करा'

कावळ्याला पिंड ठेऊन काव... काव..का..का.. म्हणणारी प्रत्येक व्यक्ती हि नकळत स्वतःच्या पितरांना कावळ्यांच्या माध्यमातून विनवणी करते 

*"हे आमच्या गेलेल्या पितरांनो आमचं सदैव रक्षण करा".*

देवतांच्या कृपे प्रमाणे आपल्यावर पितरांची कृपा असणे अत्यंत महत्वाचे असते.ती असंतुष्ट असतील तर आपली अनेक कामे रखडतात,असंख्य विघ्ने येतात पण पितरांची कृपा असेल तर आपल्याला घोर संकटातून सुद्धा सावरतात.आपल्या नकळत आपल्याला अन्य रुपात मदत करतात.गेलेल्या पितरांना वर्षातून एकदा श्राद्ध कर्म करून अन्न- पाण्याचा घास देणे खरच अशक्य नक्कीच नक्की नाही.श्रद्धेने निष्ठापूर्वक केलेले कर्म निश्चित फलप्राप्ती देते.पण आम्ही शंका,कुशंका उत्पन्न करून निष्ठने श्राध्दकर्म करीत नाही.

अनाथ-आश्रम,गरीब,गरजू, देवळे,शाळा,सामाजिक संस्था अन्य कोणत्याही घटकांना दान करणे पैसे स्वरूपात मदत करणे यातून देखील समाधान पुण्यप्राप्ती नक्की आहे.परंतु यातून आपल्या मृत पितरांची संतुष्टी नाही.मृत्यूनंतर आत्म्याचा पुढील प्रवास सुखावह व्हावा या कल्पनेतून सनातन वैदिक धर्माने श्राध्दकर्म याची निसर्गतः योजना केली आहे. *"पिठाचा अथवा भाताचा दिलेला एक मोठा पिंड एक वर्षभरासाठी आपल्या पितर योनीला व्यवस्थित पुरतो."* शस्त्रकार्त्यांनी हि योजना अभ्यासातून अनुभवातून मांडली आहे.

देवदेवतांचे धार्मिक कृत्य जितके महत्वाचे त्याहून जास्त महत्वाचे पितरांचे श्राद्ध कर्म आहे.

*देव सगळीकडे आहे मग देवळात का जायचे?*

*गेलेल्या पितरांचे श्राध्द का करायचे त्यांना कुठे पोचते?*

अशा प्रश्नांसाठी आधी त्याविषयी योग्य ती माहिती करून घेणे आवश्यक आहे.

हवा सगळीकडे आहे पण गाडी पंक्चर झाली की टायरमधली हवा कमी झाली की,पंक्चर कढणाऱ्याकडे,हवा भरण्यासाठी पंपावर जावेच लागते.सगळीकडे हवा आहे म्हणून ती आपोआप टायरमध्ये भरली जाते का?नाही ना?यालाच निसर्ग म्हणतात, तसंच देऊळ हे श्रद्धास्थान आहे. म्हणून देवासाठी नाही तर केवळ स्वतःसाठी,मनःशांतीसाठी देवळात जावे.

डार्विनचा उत्क्रांतीवाद आम्हाला लगेच पटतो पण श्राध्दकर्म करा म्हटले की थोतांड वाटते.डार्विन अत्ता काही वर्षांपूर्वी झाला.पण आपली सनातन वैदिक संस्कृती एकपेशीय उत्क्रांतीपासून बहुपेशीय उत्क्रांती,पंचमहाभूते, स्वर्ग,मोक्ष,नरक,चौऱ्यांशी लक्ष योनी या सगळ्या लोकांचा सिद्धांत मांडते तो देखील हजारो वर्षांपूर्वी.जर मनुष्याच्या अस्तित्वा बरोबरच आज देखील जगात लाखो प्रकारचे जीव,जंतू, प्राणी,किटाणू ,पशु,पक्षी,जलचर,उभयचर अस्तित्वात आहेत तर चौऱ्यांशी लक्ष योनी नाहीत हे तत्वज्ञान कस सिद्ध होत?

निसर्गतः निर्माण झालेल्या या चोऱ्यांशी लक्ष योनींमध्ये मनुष्य जन्म हा सर्वश्रेष्ठ मानला गेला आहे याच कारण तो सगळ्यां हुशार आहे.नवनिर्मिती करू शकतो स्वतंत्र विचार करू शकतो.

विज्ञान-तंत्रज्ञान या बरोबरच आपल्या सनातन वैदिक संस्कृतीचा आदर सन्मान राखुया

"कावळ्या इतक्या दिव्य दृष्टीने नाही पण अधिक डोळसपणे सगळीकडे वावरुया."

 


संकलन : - विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र