भगवंत सगळं बघत असतो

 *भगवंत सगळे बघत असतो...*

👍 Raut um 🙏

महेशचे एका देवळा समोर घर होतं. पहाटेच लोक मंदिरात यायला लागायचे. एक दिवस महेश उठून पाहतो तर काय, ही रस्त्यावर असलेल्या त्याच्या गाडीला मागून कोणीतरी धडक दिलेली.

कामचडफडत महेश गाडीजवळ गेला, किती नुकसान झालंय ते बघायला, तर काचेवर अडकवलेली एक चिठ्ठीत एक नाव आणि फोननंबर लिहिलेला होता आणि फोन करण्यास सांगितले होते.

त्याने त्या नंबरवर फोन लावला. पलीकडचा माणूस म्हणाला, 

‘‘मी वाटच पाहत होतो तुमच्या फोनची. तुमच्या गाडीला धडक देणारा मीच. 

 मी काकड आरती करून बाहेर आलो. चुकीचा गियर पडल्यामुळे गाडी मागे जायच्याऐवजी पुढे गेली आणि तुमच्या गाडीवर आदळली. 

पहाटे तुम्हाला त्रास म्हणून चिठ्ठी ठेवली. मी तुमचं सगळं नुकसान भरून देतो.’’

त्याने सगळं नुकसान भरूनही दिलं, माफी मागत होता. 

महेशला काही राहवेना. त्याने विचारलं, ‘‘तुम्हाला धडक देताना कोणीही पाहिलं नव्हतं. आपणहून कबुल कसं काय केलंत? हे सगळं टाळू शकला असतात.

तो माणूस म्हणाला...

कोणी बघत नव्हतं कसं? भगवंत सगळं बघत असतो आणि रोज पहाटे दर्शन घेऊन माझ्या अंगात एवढाही प्रामाणिकपणा नसेल तर...

 *माणसाला मंदिरात जाण्याचा काय अधिकार?*🙏🏻

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस