भगवंत सगळं बघत असतो

 माझे एक पत्रकार मित्र आहेत.किशोर समुद्रे.

फार छान पोष्ट टाकली आहे त्यांनी मला.आपण जरूर वाचावी अशी पोष्ट आहे.


खरंच, भगवंत सगळंच बघत असतो.तो दिसत नसला तरीही तो सगळं बघतो.आपण करत असलेलं पुण्य,अथवा अनभिज्ञ पणे ...जाणता,न जाणता,नकळतपणे आपल्या हातून घडलेल्या चुकाही तो बघत असतो.म्हणून उठल्याबरोबर सर्वांनी सर्वप्रथम ईश्वराचे स्मरण करावे, व त्याच्याशी प्रेमाने बोलावे,व त्याला प्रेमाने सांगावे....

" हे भगवंता,कळत नकळत माझ्या हातून कांही चूका... अपराध घडले असतील तर मला क्षमा कर.आणी तुझ्या कार्यासाठी मला निरंतर,नितदिन,अखंड, सदोदित नवचैतन्याचा झरा दे.विश्वोध्दाराचं कार्य माझ्या हातून घडू दे. "


मित्रांनो,

प्रार्थना करून तरी बघा.नक्कीच तो तुमचे कांही अपराध असतीलच तर तो क्षमाही करेल, आणी प्रत्येक क्षणी भरभरून तुम्हाला सहकार्य पण करेल. मला तरी तो अहोरात्र सहकार्य करतो.आपणही ईश्वरावर खरेखुरे, निष्कपट, निर्मळ, निरपेक्ष प्रेम तरी करून बघा.तो परमात्मा तुमच्यावर सुध्दा नक्कीच शुध्द अन् पवित्र प्रेमच करेल.खूप दयाळू आहे प्रभू परमात्मा. आपणही त्याच्याशी तेवढ्याच तन्मयतेने एकरूप होऊन, त्याच्या पवित्र चरणकमलावर सर्वस्व समर्पित केलं पाहिजे.

हरी ओम्


विनोदकुमार महाजन.


खालील सुंदर कथा जरूर वाचा.

👇👇👇



*भगवंत सगळे बघत असतो...*

👍 Raut um 🙏

महेशचे एका देवळा समोर घर होतं. पहाटेच लोक मंदिरात यायला लागायचे. एक दिवस महेश उठून पाहतो तर काय, ही रस्त्यावर असलेल्या त्याच्या गाडीला मागून कोणीतरी धडक दिलेली.

कामचडफडत महेश गाडीजवळ गेला, किती नुकसान झालंय ते बघायला, तर काचेवर अडकवलेली एक चिठ्ठीत एक नाव आणि फोननंबर लिहिलेला होता आणि फोन करण्यास सांगितले होते.

त्याने त्या नंबरवर फोन लावला. पलीकडचा माणूस म्हणाला, 

‘‘मी वाटच पाहत होतो तुमच्या फोनची. तुमच्या गाडीला धडक देणारा मीच. 

 मी काकड आरती करून बाहेर आलो. चुकीचा गियर पडल्यामुळे गाडी मागे जायच्याऐवजी पुढे गेली आणि तुमच्या गाडीवर आदळली. 

पहाटे तुम्हाला त्रास म्हणून चिठ्ठी ठेवली. मी तुमचं सगळं नुकसान भरून देतो.’’

त्याने सगळं नुकसान भरूनही दिलं, माफी मागत होता. 

महेशला काही राहवेना. त्याने विचारलं, ‘‘तुम्हाला धडक देताना कोणीही पाहिलं नव्हतं. आपणहून कबुल कसं काय केलंत? हे सगळं टाळू शकला असतात.

तो माणूस म्हणाला...

कोणी बघत नव्हतं कसं? भगवंत सगळं बघत असतो आणि रोज पहाटे दर्शन घेऊन माझ्या अंगात एवढाही प्रामाणिकपणा नसेल तर...

 *माणसाला मंदिरात जाण्याचा काय अधिकार?*🙏🏻

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस