पटलं तर घ्या
पटलं तर घ्या.
चाळणीत पाणी ओतलं,
की ते खाली वाहुन जातं.
तसंच...कसोटीच्या परीक्षेत,
खोटे मित्रही दूर निघून जातात.
म्हणून परीक्षा बघूनच मित्र बनवा,नसता...
असंगाशी संग...प्राणाशी संकट..
असे प्रसंग उद्भवतात.
जे कसोटीवर खरे उतरतात,
त्यांचीच आजीवन दोस्ती करा.
म्हणजे पश्चातापाची वेळ येणार नाही.
पटलं तर घ्या, नसता सोडून द्या.
विनोदकुमार महाजन.
Comments
Post a Comment