हिंदुनों विचार करा

 *खुरटलेली झाडं*

✍️२७८३


 *विनोदकुमार महाजन* 


🪾🪾🪾🪾🪾


होय मित्रांनो ,

 *खुरटलेली झाडं.* 


हल्ली काय झालंय माझ्या हिंदू बांधवांना ?

कांहीच कळत नाही.


अनेक जागृत हिंदू बांधवांना ही कळत नाही की ,

अगदीच खुरटलेल्या झाडासारखीच वागतात आपली माणसं .


तेजोहीन , सत्वहीन , संकुचित विचारांचे , कोत्या मनाचे , कोत्या वृत्तीचे , स्वाभीमान शून्य , लाचार , हीन , दीन , हताश , उदास , मजबूर , असहाय , गलितगात्र असा बव्हंशी का झालाय बरं *माझा बांधव ?* 


मान्य आहे की ,

आमचा बांधव , रोजी रोटीतच एवढा अडकला आहे की , त्याला धर्म , संस्कृती याबद्दल अधिक विचार करायला ही वेळ नाही.

सकाळी कामावर जाणार.संध्याकाळी दमुन भागुन येणार आणी चार घास घाऊन झोपणार.


आमच्याकडे मनुष्य बळ आहे पण धन बळ नाही.

दुसरा एखादा श्रीमंत हिंदू देशही नाही की जो आमच्या बांधवांना सहकार्य करेल.


बरं , घरोघरी जाऊन समाज जागृती करण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज निर्माण करावी तर त्याला ही मर्यादा.

कारण कार्यकर्त्यांची रोजी रोटी कुणी चालवायची ? हा ही महत्वपूर्ण प्रश्न आहेच.


एके काळी घरोघरी जीथं सोन्याचा धूर निघायचा तो समाज आज दारीद्र्यातच समाधान का मानतोय ?

हा ही प्रश्न आहे.


फुकटच्या मिळणाऱ्या रेशन धान्यावरच तृप्त का होतोय ? फुकटच्या सवलतींची सतत अपेक्षा का करतोय ? तेच समजेनासं झालंय.?


 *तेजस्वी* ईश्वरपुत्रासमान जगणारा , धगधगते ईश्वरी तेज बाळगून असणारा हा माझा समाज एवढा *हतबल* का बरं व्हावा ?


बरं त्याला कुणी ईश्वरी तेज देण्याचा प्रयत्न करावा तर ? ते झाडं , ते खुरटं झाडं , त्या तेजाने स्वयं प्रकाशीत व्हायचे सोडून पार जळून , होरपळूनच जायला लागलंय , हे ही भयंकर आहे.


कारण संस्कृत भगवत् गीता समजत नाही म्हणून ज्ञानरायांनी प्राकृत भाषेत सांगीतली.

ती समजायला आणी वाचायला ही वेळ नाही.


त्यामुळे संस्कारांची शिदोरी संपत चालली आणी... वरचेवर 

खुरटलेली मनं , आखुड बुध्दी , संकुचित वृत्ती याने तर जणू आज चौफेर थैमानच घातले आहे ? अख्या समाजात ?


एकमेकांच्या लाथाळ्या अन् पाय खेचाखेची याचाच जणू ऊत आलाय.


कुणाचं चांगुलपण कुणाला सहन होईना , कुणाचा मोठेपणा कुणाला सहन होईना.


 *सगळीकडेच हाहाकार.* 


राजा व्हायचा कुणी प्रयत्नच करत नाही तर कुणी विचारही करत नाही,तर भिकारी होऊन आनंदाने जगण्याचीच जणू स्पर्धाच लागलीय आज , असं वाटतंय.


 *मनाची पण आणी* *धनाची पण.* 


जागोजागी कुबड्या हव्या.आर्थिक आधाराच्या कुबड्या.


अरे द्या ना स्वयंस्फुर्तीने फेकून त्या कुबड्या.

बना ना स्वयंपूर्ण ?


पण झालंय काय की *आमची जीद्दच* मुळापासून मारली गेली आहे.

का मारली ? कुणी मारली ? कांहीच कळत नाही.


जागोजागी द्वेष , मत्सर, हेवेदावे , नींदा, नालस्ती , मनाचे कुचकेपण, बुरसटलेली मनं , असले सगळे घाणेरडे प्रकार.??


याच्या पलीकडं कुणी जायलाचं तयार नाही.

याच्याही पलीकडे एक महान विश्व असतं हे कुणी मानायलाच तयार नाही ?


ईश्वर निर्मित महान सनातन हिंदू धर्मात आपण सगळे जन्माला आलो आहोत हेच मुळी आपलं सगळ्यांच परम भाग्य आहे.


पण हे परम भाग्यच आपण विसरलो आहोत.


आणी दुर्गंधी युक्त , घाणीच्या गटारगंगेत राहण्यातच आपण पावलोपावली समाधान मानतो आहोत.


आपली गाणी पण कोणती ?

" *आता माझी* *सटकली ,"* 

नाहीतर ?

" *आती क्या खंडाला* ? "

अरे त्या 

" अमीर "नावाच्या विषारी अन् दळभर्दी संगतीत राहून आपणही तसेच कधी झालो ? ते आपल्यालाही कळलं कसं नाही ?

एवढं भयंकर संस्कृती हनन केलं आपलं त्या 

" *लुटारूंनी ? "* 


आपल्या पुर्वजांनी , भगीरथाने गंगा धरतीवर अवतरीत केली होती , त्याचेच आपण अंश आहोत हेच मुळी आपण विसरलो आहोत.आणी डबक्यातल्या जीवनालाच खरे जीवन मानू लागलो आहोत ??


जागोजागी अन्नछत्र अन् पाणपोया चालवणारे आपण ? विकतच्या एका पाण्याच्या बाटलीवर तृप्त होऊ लागलो आहोत ?


राजासारखं जीवन जगण्याचे मार्ग शोधायचे सोडून ? भिका-यासारखे जीवन जगण्यातच आपण धन्यता मानू लागलो आहोत ?


मर्यादित डबक्यातलंच जीवन समाधानी जीवन होत आहे ? हीच आपली जीवनशैली होऊन बसली आहे ?


मग धर्म ग्रंथ वाचून , देवपूजा करून , तिर्थयात्रा करून तरी काय उपयोग ?


" *देवा मला तुझ्यासारखं* *तेजस्वी ,* *वैभवशाली* *

 *जीवन दे.."* 

असं देवाकडे मागणं आपण कधीच मागत नाही तर ?


" *देवा मला चार पैसे दे ,* *नोकरी* ( *लाचारी ?) दे , एक* *पोरगं दे , एक* *लेकरू दे , चांगली* *बायको दे , चांगला नवरा* *दे..."* 

असलं भिकार भाजणं मागणं आपण देवाकडे मागतो ? तर मग तो देव तरी *काय करणार* ?


" *भिकारीच रहा* *बाबांनो ..."* असा थोडाच आशिर्वाद देणार ?


कशी बशी नोकरी ( *नोकर ? )* मिळवायची ? चार पैसे कमवायचे ? कर्ज घेऊन घर बांधायचं , आयुष्य भर ते कर्ज फेडत बसायचं ? लग्न करून एक दोन पोरांना जन्म द्यायचा ? अन् एक दिवस ? किड्या मुंगीसारखं मरून जायचं ?

झालं जीवन ? हाच *जीवनाचा सार ?* 


 *धर्म कार्य ?* 

कधीतरी हरी हरी बोलला , झालं धर्म कार्य.?


कुणी कांहीं बोलायला जावं तर , धर्माची माहिती सांगायला जावं तर ? तु नको तत्वज्ञान शिकवू आम्हाला ?

मोठा *हितचिंतकलागून* गेलाय आमचा...?


पण ईश्वर म्हणतो आहे..

" *अरे तेजस्वी ईश्वर* *पुत्रांनों , माझ्यासारखं* *तेजस्वी* *होऊन ,* *जगावर सनातन* *संस्कृतीचे राज्य निर्माण* *करा* , *सत्याचा सत्य सनातन* *धर्माचा प्रचार* *प्रसार करा..."* 

असा संकेत तो दयाळू प्रभू परमात्मा आपल्याला , आपल्या सर्वांना पावलोपावली देतो आहे .


आणी आपण भगवंताला विसरून, कर्मदरीद्री होऊन , आपापसात भांडणे करून , जातीय मत्सर , तेढ, तिढा वाढवून ?  जगतो आहोत ?


उठा जागे व्हा बंधुनों...

 *तेजस्वी ईश्वर पुत्र व्हा.* 

लाचारीच्या कुबड्या फेकून द्या.

 *स्वयंपूर्ण बना.* 

जगावर सकारात्मक राज्य निर्माण करा.

जगावर *भगवंताचा* *भगवा झेंडा* दिमाखाने अन् स्वाभीमानाने फडकवण्याची जीद्द ठेवा.


मी मोठा की तू मोठा ?

ही जीवघेणी स्पर्धा बंद करा.


ईश्वर सगळ्यात मोठा आहे.आणी तोच सगळीकडे भरून उरला आहे.आणी सगळ्यांना पुरून पण उरला आहे.


 *उठा* 

नवयुग निर्मिती साठी सुसज्ज व्हा.

 *हिंदवी स्वराज्य* निर्मिती साठी सज्ज व्हा.


हे *दिवास्वप्न नाही,* *वास्तव आहे.* 

ईश्वरी नवसृजनाचा संकेत आहे.


हाच तर सगळ्यांच्या जीवनाचा उद्देश आहे.

हाच तर मनुष्य जन्माचा सार आहे.

हेच आपल्या नरदेहाचे ईश्वरी प्रायोजन आहे.


हाच तर खरा आपल्या सनातन संस्कृती मध्ये जन्माला येण्याचा महान उद्देश आहे.


वैश्विक स्तरावर आदर्श असणाऱ्या ,

 *हिंदू सनातन संस्कृती शी* ख-या अर्थाने एकरूप होऊन आपण सगळे मिळून कामाला लागू या व कार्याला गती देऊ या.


 *राम व्हा.* 

 *कृष्ण व्हा.* 

गरज लागली तर ?

 *कल्की सुद्धा व्हा.* 


नवजीवन , नवयुग आरंभ करु या.


 *हाच तर खरा* 

 *ईश्वरी संदेश आहे.* 


 *उठा* 

 *सुर्यासारखे* 

स्वयं प्रकाशमान व तेजस्वी बना.

सगळी धरती 

 *सनातन च्या* दिव्य प्रकाशाने उजळून काढू या.


दैदिप्यमान यश ,

प्रकाशमान विश्वासाठी तुमची सर्वांची आतुरतेने वाट बघत आहे.


 *खुरटलेली झाडं नव्हे तर* 

महान 

 *वटवृक्ष व्हा.* 


जग बदलण्याची संपूर्ण उमेद , संपूर्ण शक्ती तुमच्या आतच एकवटलेली आहे.

 *धगधगत ईश्वरी तेज* 

तुमच्या आतचं दडलेलं आहे.


दररोजच रडगाणं बंद करून , *तेजाकडे* वाटचाल सुरू करू या.


स्वतः जागून इतरांना ही जागवू या.

एक शक्तिशाली झंझावात बनून 

 *विश्व विजेता हिंदू धर्म* 

ही उक्ती खरी ठरवू या.


 *ज्ञाना , तुकाचा भगवा* 

 *वीर शिवरायांचा भगवा* 

 *भगवंताचा भगवा* 

खांद्यावर घेऊन आनंदाने नाचू या.


 *राम कृष्ण हरि* च्या निनादात 

विश्व व्यापून टाकू या.


 *जय श्रीकृष्ण* 

 *जय सुर्य नारायण* 

 *जय हरी विठ्ठल* 


 *विश्व स्वधर्म सुर्ये पाहो* 


🌞🌞🌞🌞🌞

Comments