चक्रव्यूह

 *आयुष्य एक चक्रव्यूह* *आहे*

✍️२७७८


 *विनोदकुमार महाजन* 

🎡🎡🎡🎡🎡


 *होय मित्रांनो ,*

आपले आयुष्य हे खरोखरीच एक चक्रव्यूह आहे.

अगदी जन्मल्यापासून ते अखेरपर्यंत हे चक्रव्यूह भेदन करण्याचा आपण प्रयत्न करत असतो.


प्रत्येक सुखदुःखात एक आशेचा किरण घेऊन आपण एक नव्या जीवनाची , नव्या क्षितीजाची अगदी दररोज आतुरतेने वाट पाहत असतो.


 *पण काय करावे ?*

एका चक्रव्यूहातून बाहेर पडले की दुसरे चक्रव्यूह तयारच असते.

चक्रव्यूहातच आपले अख्खे जीवन अडकून पडलेले असते.


अनेक संकटांचे चक्रव्यूह.

जीवनात एवढी चक्रव्यूह येतात की ती भेदन करता करता आपल्या *नाकी नऊ येते.*


आता *नाकी नऊच का* येते ? हे पण कळत नाही.नाकी *आठ ,सात का बरे* नसावे ?

असो , हे एक पुन्हा वेगळेच चक्रव्यूह.

आता या चक्रव्यूहात पुन्हा अडकून पडायला नको.


असो.

तर असं आहे तर हे अख्या आयुष्याचं चक्रव्यूह आणी चक्रव्यूहाचं गणीत.


हे चक्रव्यूहाच गणीत भलतंच भयंकर वाटतंय नाही का ?

सुटकाच देत नाही.

अगदी कांहीही करा.


अभिमन्यू पण चक्रव्यूहातच अडकला.आणी शेवटी त्यातच संपला.


पण आपण मात्र कोणत्याही चक्रव्यूहात मुळीच अडकायचं नाही.

नाही म्हणजे नाही.


सतत पाण्याच्या प्रवाहासारखे निखळपणे वहात रहायचं.

मग कशाला येतंय चक्रव्यूह आडंव.

आडंव आलं की मार्ग काढत पुढे पुढे जायचं.

अन् यशस्वीपणे अंतिम ध्येय , अंतिम उद्दिष्ट गाठायचे.


आता प्रत्येकाचे , प्रत्येकाच्या जीवनाचे अंतिम ध्येय , अंतिम उद्दिष्ट वेगवेगळे असू शकते.


पण तरीही 

 *राजा शिवछत्रपती यांचे* 

 *हिंदवी स्वराज्याचे* 

स्वप्न मात्र आपण नक्कीच पूर्ण करु या.


 *अगदी सगळी चक्रव्यूह* *भेदून.*

 *सगळे अडथळे दूर* *करून* 

" *हिंदवी स्वराज्य "*

निर्माण करु या.


 *जय भवानी जय* *शिवाजी* 


🙏🙏🙏🚩🚩

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

संपूर्ण लेखांक भाग २५

सोनारीचा काळभैरवनाथ