सुखी

 *मी सुखी होत आहे...*

✍️ २७७९


 *विनोदकुमार महाजन* 

🌹🌹🌹🌹🌹


होय मित्रांनो ,

आपण दररोज आपल्या मनाला हे नक्की सांगायचं.


 *मी सुखी होत आहे.*

एवढं वाक्य जरी तुम्ही म्हणत असाल तर नक्कीच तुम्ही वरचेवर सुखी व्हालच व्हाल.


 *प्रयत्न करून तर बघा.*

याला कांहीं पैसा वगैरे नाही हो लागत.

" माझ्यावर दररोज सद्गुरूची , ईश्वराची कृपा होत आहे.

 *माझे दुःख हळूहळू* *संपत आहे.*

माझ्या आसपासची , माझ्यावर खरं प्रेम करणारी सगळी माणसं सुखी होत आहेत "

असही म्हणा.


स्वतः पेक्षा इतरांच्या सुखासाठी प्रार्थना करणारी निस्वार्थी माणसं देवाला खूपच प्रिय असतात.

म्हणूनच तो त्यांचं लवकर ऐकतो.


" मला वरचेवर सुख , समाधान , शांती , आनंद मिळतो आहे.

मला लवकरच मला हवे असणारे धनही मिळणार आहे "

 *अशीही प्रार्थना करा.*


 *प्रार्थनेत खूप मोठी शक्ती* *असते.* 


" मी तर सुखी होणारच पण माझ्या बरोबर येणाऱ्या प्रत्येकाला मी सुखी आनंदी करणार "

ही मनाची धारणा ठेवा.


एवढंच नाही तर,

मनात असंही म्हणा की,

" मला दुःख, त्रास,कष्ट देणा-यांनाही सुखी कर भगवंता.

त्यांच्या चुका माफ करून त्यांना सन्मार्ग दाखव . माझा अकारण द्वेष मत्सर करणारांनाही सुखी 

कर देवा ".


भलेही तुमच्या त्यांच्या आयुष्यात कधीही गाठीभेटी होऊ अथवा न होऊ,पण त्यांच्या साठी प्रार्थना तरी करा.


पटत नसेल तर एकमेकाचं आयुष्यभर तोंडही बघू नका,पण मनात कटुता ही ठेऊ नका.


वाटल्यास त्यांच्या आयुष्यातून कायमचं दूर निघून जा.

पण ह्रदयात मात्र प्रेम ठेवा.


बघा तुमचं आयुष्य कसं जादू झाल्यासारखं बदलतं आहे ते.


प्रत्यक्ष भगवंतच तुमच्या जवळ राहून तुम्हाला आनंदी जीवन देत आहे , असेही तुम्हाला जाणवेल.


जमलं तर तुळशीची माळ गळ्यात घाला.जमेल तसं एखाद्या मंदिरात जाऊन दर्शन , भजन , पूजन करा . कपाळावर हिंदू धर्माचा अभिमान वाटतो म्हणून भगवे गंध लावा.घरावर , दुकानात भगवंताचे प्रतीक म्हणून भगवा ध्वज लावा.

जागोजागी धर्म जागरण करा.

आसुरी व्यक्तिपासून समाजाला सावध करा.


एवढं तरी नक्कीच जमेल.


जमलं तर बघा प्रयत्न करून.नाहितर द्या सोडून.


 *सर्व मित्रांना समर्पित.*

 *हरी ॐ* 


🌞🌞🌞🌞🌞

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

संपूर्ण लेखांक भाग २५

सोनारीचा काळभैरवनाथ