देवाला काळजी

 *तुझी काळजी ? देवच* *करतोय रे...!!*

✍️२८४५


 *विनोदकुमार महाजन* 


🌹🌹🌝✅


होय...

अगदी प्रत्येक जीवाची काळजी ? तो प्रभू परमात्मा करतो आहे.

निरंतर करतो आहे.


प्रत्येक सजीवाचा जन्मही त्याच्या हातात , आणी प्रत्येकाचा मृत्यू सुध्दा ? त्याच्याच हातात.


सगळ्या विश्वाचा पसारा तो चालवतो.अथक आणी अव्याहतपणे.


कोणत्या जीवाचा , कुठे , कधी , कसा आणी कोणत्या योनिमध्ये जन्म होणार आहे , आणी ? कोणाचा कधी , कुठे , कसा ? मृत्यू पण होणार आहे ?

याचा अचूक हिशोब त्याच्याकडे आहे.

अचूक टायमिंग त्याच्याकडे आहे.


त्याच टायमिंग कधिही चुकत नाही.

त्याच्या अचूक टायमिंग प्रमाणे अगदी चंद्र सुर्य सुध्दा अचूकपणे उगवतात आणी मावळतात ?


त्याच सृष्टी चक्र अचुकपणे चालवण्यासाठी , सजीव सृष्टी चक्र चालवण्यासाठी.


चंद्र सुर्य कधी म्हणतात का हो ? की मी आज सुट्टीवर जाणार आहे म्हणून ?

मी आज फार दमलो थकलो रे बाबा , आजच्या दिवस मी पूर्ण विश्रांती घेतो...

असं कधी ते म्हणतात का ?


नाही.

कारण त्यांना अचूकपणे सृष्टीचा गाडा चालवायचा आहे.

प्रत्येक जीवाची त्यांना काळजी आहे.

अगदी प्रत्येकाच्या खाण्यापिण्याची पण त्याला काळजी आहे.


म्हणूनच म्हणतात ना ?

" *चोच आहे तिथे ? चारा* *आहे. "*


 *प्रत्येक जीवाचा करीतो* *सांभाळ.* 


अगदी तुमची माझी सुध्दा तो काळजी करतो.

अगदी रात्रंदिवस काळजी करतो.


म्हणूनच तर आपल्याला वेळच्या वेळी तहान लागते , भूक लागते.झोप सुध्दा त्याच्या इच्छेनेच लागते.

अगदी प्रत्येकाला.


मग ?

किती छान , सुंदर आयुष्य दिलंय बरं त्या भगवंतानं आपल्याला.

आपली किती चिंता करतो ?

अगदी पावलोपावली.


 "*तुझी चींता त्याशी ?*

 *सर्व आहे. "*


आणी एखादा खुळा जीव ?

एखादा खुळा मनुष्य प्राणी ?

मोठ्या अहंकाराने विचारतो...?

" *कुठाय रे तो भगवंत* *दाखव बरं* *मला , तरच विश्वास* *ठेवतो मी . "* 


तुझे आहे तुजपाशी परी जागा चुकलाशी...

वेड्या जीवा.


 *तुझी चींता तोची वाहतो* *आहे.*

 *रात्रंदिवस...*


तुझा जन्म जसा त्याच्या हातात आहे ?

तसाच ? तुझा मृत्यू सुध्दा ? कुठे आहे ? कसा आहे ? कधी आहे ? पुढचा जन्म कोणत्या योनीत आहे ?

याचा अचूक हिशोब त्याच्याकडे आहे.

मग ?

" *आता कशाला फुकाची* *बात...बघ* *उडून चालली* *आयुष्याची रात..."*


मित्रांनो ,

सगळं गणीत , आपल्या आयुष्याच सगळं *आयुष्याच पॅकेज* 

त्याच्याच हातात आहे.


मग उगीचच कशाला ?

माझं माझं म्हणून रात्रंदिवस उर बडवून घ्यायचा ?

माझं घरं , माझा पैसा , माझी प्राॅपर्टी , माझी लेकरं बाळ ?

 *माझं माझं कबाड ओझं* 

वेड्या जीवा...

हे देह सुद्धा तुझा नाही.

त्याचं बोलावणं आलं की ? सगळं एका सेकंदात सोडून जायचं आहे...आणी त्याच्या शक्तिशी ? एकरूप व्हायचं आहे.


मगं मागं उरतं तरी काय ? मागं उरतं ते सत्य...सत्याचं आणी सत्य सनातन धर्माचं कार्य...

त्याची किर्ती दिगंत राहते.


म्हणूनच तर म्हणतात ना ?

" *त्याच्या इच्छेशिवाय* *काडी* *सुद्धा हालत नाही. "* 


अगदी वारा , ऊन , पाऊस सुध्दा ? अगदी सगळी पंचमहाभूते सुद्धा ? त्याचे इच्छेनुसार च चालतात .


मग एकंदर काय तर ?

 *तुझी चींता त्याशी सर्व* *आहे...*

त्याच्या चरणांवर सर्वस्व समर्पण केल की ?

आपण सुटलो.


 *जय हरी विठ्ठल* 


🙏🙏✅🚩

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

सोनारीचा काळभैरवनाथ

विश्व विजेता हिंदु धर्म