नशीब

 *नशीबा नशीबा दार* *उघड...!!*

✍️ २८३२


 *विनोदकुमार महाजन* 


✅✅✅✅


प्रत्येकाला सुख हवं असतं.अपेक्षीत सुख.

सगळे दुःख संपवून हवे असलेले सुख.


प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना व अपेक्षा ह्या नेहमी वेगवेगळ्या असतात.

आणी प्रत्येक जण आपापल्या परीने आपल्याला हवे असणारे अपेक्षित सुख मिळवण्यासाठी रात्रंदिवस धडपड असतो.

सगळ्यांना काय हवं असतं तर अपेक्षेप्रमाणे आनंदी जीवन.


पण होतं काय की , आपण जसजस्या सुखाच्या कल्पना करत राहतो आणि त्या दिशेने प्रयत्न करतो पण ? बरेच प्रयत्न करूनही यश मिळत नाही अथवा हाती कांहीच लागत नाही म्हटल्यावर आपल्याला दुःख होते आणि मग आपण आपल्या नशीबाला कोसत बसतो.

" माझे नशीबच बेकार..

माझ्या नशीबातच अमुक तमुक नाही , माझ्या नशीबातच दु:ख लिहीले आहे..."

वगैरे संवाद आपण मनाशीच करत राहतो.


पण वेडी आशा आणी सुखाची अपेक्षा कांहीं सुटत नाही.

नशीब उघडण्यासाठी अथवा बदलण्यासाठी आपण देव धर्म करतो , अनेक वृत वैकल्ये करतो , तिर्थाटने करतो...

आणी मनातल्या मनात आपण दररोजच जणू हेच घोकत बसतो की...

" *नशीबा नशीबा दार* *उघड..."* 


दररोजच्या रहाट गाडग्यातून , दररोजच्या कटकटीतून , त्याच त्या कंटाळलेल्या आयुष्यातून आपल्याला सुटका हवी असते.अगदी कायमची.

पण नशीब कांही साथ देत नाही.


पण माझ्या अनुभवाने सांगतो...नशीब बदलते नक्कीच बदलते.प्रयत्न केले तर नशीब नक्कीच बदलते.


पण खरा विचार केला तर आणी तसं पहायला गेलं तर जगात संपूर्ण सुखी कुणीच नसतं.


म्हणूनच रामदास स्वामी सुद्धा म्हणतात , 

" *जगी सर्व सुखी असा* *कोण आहे ?* *विचारी मना तुची* *शोधुनी पाहे..."* 


खरोखरीच जगात संपूर्ण सुखी असा कोणीच नसतो.प्रत्येकाला कांहीं ना कांहीं दुःख असतेच असते.अगदी ईश्वर जरी देह रूप धारण करून आला तरी त्याला ही दु:ख असतेच.


मग तरीही आपणाला दु:ख संपवून सुख हवे असतेच.अपेक्षीत सुख.

संपूर्ण सुखी जीवन.

आणी प्रत्येकाला असे वाटत असते की ,

" *तो माझ्या पेक्षा किती* *सुखी आहे* *बरं...? आपल्याला ही* *असे सुख असायला* *हवे होते..."* 


पण तो समोरचा व्यक्ती ही कांहीं ना कांहीं दु:खाने व्यापलेला असतोच असतो.फक्त आपल्याला ते माहीत नसते.


अगदी साधु संतही संपूर्ण समाधानी कधीच नसतात.त्यांनाही सामाजिक अंध:पतनाचे व संस्कृती हननाचे दु:ख असतेच.


सर्व दु:खावर विजय मिळवण्याचा केवळ एकमेव मार्ग म्हणजे संपूर्ण ...

" *स्थितप्रज्ञ* " होणे.


पण हे सामान्य माणसाला न समजणारे कोडे आहे.व सामान्य मनुष्य स्थितप्रज्ञ स्थिती पर्यंत पोचण्यासाठी कधीच प्रयत्नशील नसतो.


तरी सुद्धा आणी म्हणूनच आपणही आपले नशीब बदलण्यासाठी नक्कीच दररोज प्रयत्न करू या.

आणी...

" *नशीबा नशीबा दार* *उघड..."* अशी दररोजच नशीबाला साद घालू या.

 *प्रयत्नांती परमेश्वर...* 


पैशानेच सगळी सुखे मिळतात असेही नाही ,  तर अनेक धनवान व्यक्ती सुध्दा नेहमी अनेक कारणांमुळे दु:खी असतातच.


सुखी होण्याचा सगळ्यात सोपा आणखी एक प्रशस्त मार्ग म्हणजे , " *निष्कपट* *मनाने* *एकमेकांना भरभरून* *प्रेम वाटणे,* *एकमेकावर* *भरभरून प्रेम करणे..."* 


पण ब-याच वेळा होतं काय की , आपण भरभरून प्रेम वाटूनही समोरचा व्यक्ती दगड निघतो... *अगदी खट्ट* *पाषाण*

आपल्या प्रेमाची त्याला कवडीची ही कींमत नसते.अगदी आपल्याला तो कवडीमोल आणी कस्पटाप्रमाणे लेखत असतो...

 दु:खाचे आणखी एक हे महत्त्वाचे कारण असते.

त्यावरही रामबाण उपाय म्हणजे *निरपेक्ष वृत्तीने* सदैव जगाला प्रेम वाटत राहणे.


साने गुरूजी नेहमी म्हणायचे ,

" *खरा तो एकची धर्म* *जगाला प्रेम* *अर्पावे..."* 

पण असे म्हणणा-या साने गुरूजींचा अंतही अत्यंत दुर्देवी व्हावा ...?

आश्चर्य आहे ना हेही मोठे ? न उलगडणारे कोडे ?


सदैव जगाला प्रेम वाटणारे साने गुरूजी ? यांना कोणते दुःख होते ? म्हणून त्यांचा अंतही दुर्देवी व्हावा ?


असो...

तरीही आपण जगावर प्रेम करत रहावे.

 *करतच रहावे.अगदी* *निरपेक्ष* *वृत्तीने.* 


आणी ?

स्वार्थी मनुष्य प्राण्याला त्या प्रेमाची कवडीची ही कींमत नसेल तर ? तेच प्रेम ? *भगवंतावर करत* *रहावे.* 


निस्सिम प्रेम.. निरपेक्ष प्रेम.. निस्वार्थी प्रेम...

असे प्रेम देवालाही नक्कीच आवडते.

" *देव भावाचा* *भूकेला..."* 


आणी मग आपण 

" *नशीबा नशीबा दार* *उघड..."* 

असे नित्यनेमाने म्हणण्याच्या ऐवजी..

" *देहाची तिजोरी* *भक्तिचाच ठेवा... उघड* *दार देवा आता* *उघड दार* *देवा..."* असे आनंदाने म्हणू लागतो.

अगदी आपली मुक्ताबाई सुध्दा ज्ञानरायांना अगदी कळवळून , आर्ततेने हाका मारते...

" *ताटी उघडा* *ज्ञानेश्वरा..."* 


मुक्ताबाईची आर्तता आपल्याकडे असेल तर नक्कीच...

" *भाग्याचे दार एक ना* *एक दिवस* *उघडलेच जाते..."* 


माझे तरी भाग्याचे दार मी उघडले आहे.


परम दयाळू ईश्वराला व विश्वाची माऊली ज्ञानरायाला...

मी आपणा सर्वांसाठी दररोज नक्कीच प्रार्थना करेन...


" *नशीबा नशीबा दार* *उघड...* *प्रत्येकाच्या भाग्याचे दार* *उघड..."* 


सबका कल्याण हो.

सबका मंगल हो.


तोपर्यंत... आपणा सगळ्यांना...

 *जय जय राम कृष्ण हरी* 


🚩🚩🚩🚩

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

सोनारीचा काळभैरवनाथ

संपूर्ण लेखांक भाग २५