बार्शीचे लक्ष्मी भगवंत

 *माझे मायबाप ?* *बार्शीचे लक्ष्मी* *भगवंत...!!!*

✍️ २९०१


 *विनोदकुमार महाजन*

👆✅🕉️🙏 


माझे मायबाप ?

बार्शीचे लक्ष्मी भगवंत !

होय...

आपले जन्मोजन्मीचे खरे मायबाप कोण ?

साक्षात विष्णू आणि लक्ष्मी !

पंढरपूरचा पांडुरंग आणि माता रूक्मिणी !

आळंदीचा ज्ञानराज !

कोल्हापूरची माता महालक्ष्मी !


जन्मोजन्मी आपली काळजी करणारी , आपली चींता वाहणारी , आपले पावलोपावली अश्रू पुसणारी ही खरी दैवत...

हाडामासाच्या रक्ताच्या नात्याच्या पलीकडची नाती...

प्रत्येक सुखदुःखात धावून येणारी , वात्सल्याने सतत काळजी करणारी आपली खरी नाती ?

हीच होत...

घोर कलियुगात , स्वार्थाच्या बाजारात , ज्याला ही खरी नाती सापडली तो खरा ?

राजा...

त्रिलोकीचा राजा...


माझ्या बार्शीचे लक्ष्मी भगवंत सुध्दा आमच्या बार्शीकरांचे खरे मायबाप !

बार्शी नगरी म्हणजे परम वैभवाचे भंडार !

सुख , शांती , समाधान , आनंदाचे परम माहेर घर म्हणजे माझ्या आई बापाची , लक्ष्मी भगवंताची , परम पावन नगरी बार्शी !


जगाच्या कोलाहलातून सुटुन , एक शांत , सुखी , समाधानी , आनंदी व यशस्वी जीवन जगायचे असेल तर बार्शी नगरीमध्ये यावे !

कोल्हापूरची माता महालक्ष्मी इथेही वास करते ! भगवंताबरोबर...अगदी आनंदाने... आणि आपल्या ख-या भक्तांची , लेकराची , पावलोपावली काळजी करते , याची दिव्य अनुभूती आपणास सदैव येत राहते !


जगातलं सगळं राज ऐश्वर्य सोडून बार्शी नगरीमध्ये जो येतो त्याला इथली एक साधी झोपडी सुध्दा परम वैभवापर्यंत घेऊन जाते.


माझे सद्गुरू आण्णा व माझी माऊली गोजरमायच्या संगतीतील बार्शी नगरीतील परम वैभवशाली बालपणाच्या दिवसाचे वर्णन शब्दाने काय करणार ?

साक्षात स्वर्गीय दिव्य अनुभूती म्हणजे बार्शी नगरीचे भाग्यदायी बार्शीचे वास्तव्य...


अंबरीश राजाला वरदान देणारा माझा भगवंत इथेच लक्ष्मी सह रात्रंदिवस वास करतो.

त्या मायबापाचा सहवास म्हणजे ?

नितदिन स्वर्गीय सुखाची प्राप्ती...


अंबरीश वरद श्री लक्ष्मी भगवंत की जय हो...


🙏🙏🕉️🌹

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

विश्व विजेता हिंदु धर्म