शिवरायांचा आदर्श कृतीत यावा

 *छत्रपती शिवरायांचा आदर्श आचरणात यावा*


छत्रपती शिवरायांना माँसाहेब जिजाऊ यांनी हिंदवी स्वराज्याचे धडे बालपणीच दिले.त्यामुळे बालपणीचे ते उच्च संस्कार आणी ते आदर्श संस्कारांचे धन शिवरायांना आयुष्य भर पुरले.

हिंदवी स्वराज्य निर्मितीमधून एक सुसंस्कारित तथा आदर्श वादी समाज निर्मिती हात्यांचा ध्यास होता.व त्यांनी तो ध्यास अव्याहतपणे आयुष्य भर सांभाळला.

जीवाचे राण करून अन् रक्ताचा थेंब न् थेंब त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी घालवला.स्वकियांचा विरोध, सामाजिक अज्ञान ,आर्थिक चणचण, कमी मनुष्यबळ, साधनांचा अभाव एवढे सगळे असुनही त्यांनी उच्च कोटींचा ध्येयवाद स्विकारला.आणी ध्येयपूर्तीसाठी अव्याहतपणे अथक परिश्रम घेतले.


आजच्या सामाजिक अव्यववस्थेकडे एक नजर टाकली तर काय दिसते ?

समाजातील सुंदोपसुंदी संपवून समाज एकसंध करण्यासाठी पुन्हा एकवार राजे शिवछत्रपती यांचे आदर्श स्विकारणे आणी ते अमलात आणणे ही आजची काळाची गरजच नव्हे तर तशी नितांत आवश्यकता आहे.


उच्च कोटींच्या ध्येयवादाने पेटून उठणे अन् त्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणे अत्यावश्यक आहे.

आम्ही 

शिवाजी महाराज की जय

अथवा

जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देतो.पण प्रत्यक्ष शिवाजी महाराजांची निती स्विकारून आदर्श समाज निर्मिती साठी किती,काय व कसा प्रयत्न करतो,हेही तपासून पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे.


अतीशय बिकट परिस्थिती मध्ये समाज एकसंध करून तो समाज कार्य प्रवण करणे आणी सामाजिक सौहार्द स्थापित करणे ही आजची काळाची गरज आहे.


समाज आज जातीपाती मध्ये विखरला गेला आहे.संत,महापुरुष यांच्या ही वाटण्या समाजात चालू झाल्या आहेत.

अमूक संत आमच्या जातीचा,तमुक महापुरुष तुमच्या जातीचा,अशी वर्गवारी समाजात पसरवली जात आहे.ही गोष्ट नक्कीच विचार करायला लावणारी तर आहेच.याशिवाय अत्यंत चिंताजनक बाब पण आहे.हे सगळ्यांनी समजावून घेणे गरजेचे आहे.व समाज पुन्हा एकसंध करण्यासाठी सामुहिक बैठकांचे आयोजन करणे,महापुरूषांचे कार्य ठराविक एका जातीसाठी नाही तर समस्त मानवतेच्या कल्याणासाठी आहे, हे समाज मनास पटवून सांगणे आज अत्यावश्यक झाले आहे.


अतीशय प्रतिकूल परिस्थिती मध्ये जीवाचे चार मावळे जमवून ईश्वरी कार्याला गती देणे हे त्याकाळी आव्हानात्मक कार्य नक्कीच होते.अनेक अत्याचारी,आक्रमणकारी यांचा समाजात सुळसुळाट झाला होता. व त्या सुळसुळाटातून थयथयाट करून अराजक तत्वांनी उच्छाद मांडला होता.कार्य भयंकर कठीण असुनही छत्रपती यांनी हे कार्य खंबीरपणे उभे करून दाखवले होते.

व ही श्रींची इच्छा म्हणत ईश्वरावर भार सोपवून खंबीरपणे पुढे वाढवले होते.


आजची सामाजिक स्थिती पाहिली तर काय दिसते ?

आज पुन्हा एकदा शिवछत्रपतींच्या कार्याची समाजास नितांत गरज आहे.


राजे पुन्हा जन्म घ्या

असे म्हणण्याची आज विदारक स्थिती निर्माण झाली आहे.

म्हणुनच आपण सा-यांनी आता एक होऊन, भगव्या झेंड्याची आन् बान् शान् राखून, राजे शिवरायांच्या आदर्श रस्त्याने पुढे जावून, ध्येयवादाने झपाटल्यागत कार्य करून, पेटून उठून, एकसंध नवसमाज निर्मितीसाठी पुन्हा एकवेळ कामाला लागू या.एक आदर्श समाज बांधणीसाठी सगळे एक होऊन, कंबर कसून कार्य आरंभ करू या.

चला तर मग.ध्येयवादाने पेटून उठा.समाजातील मरगळ घालवून एक चैतन्यमय समाज निर्मितीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू या.


विनोदकुमार महाजन,

कार्यकारी संपादक,

सा.सावधान हिंदुस्थान

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस