खणखणीत अग्रलेखासाठी

 दणदणीत अग्रलेख, खणखणीत आतील पानावरील लेख,ज्वलंत बातमीपत्रासाठी वाचा,

सा.सावधान हिंदुस्थान

---------------------------------------

वाचक मित्रांनो,

दर आठवड्याच्या प्रत्येक अंकात आम्ही आपणास वेगळे अग्रलेख, भरीव बातम्या, आतील पानावरील खणखणीत लेख देण्याचा प्रयत्न करत असतो.

वास्तविक पाहता सोशल मिडिया आणी आँनलाईन बातमीपत्र यामुळे प्रिंट मिडिया अथवा छापील वृत्तपत्र घेऊन वाचणे म्हणजे वरचेवर दुर्मीळच होत चालले आहे.पण आमचे मुख्य संपादक अलखनाथ बापू यांनी हे धाडस केले आहे हे खरोखरीच कौतुकास्पद तर आहेच. शिवाय वाचन संस्कृती शी तुटत चाललेला वाचक अथवा समाज पुन्हा वाचनसंस्कृती कडे वळावा हा प्रयत्न नक्कीच समाजात नवीन पायाभरणी करण्यासाठी कौतुकास्पद विषय आहे.

अलखनाथ बापूंचा पत्रकारीतेचा अनुभव तसा फार जुना आहे.दिल्लीमधून त्यांनी एक हिंदी साप्ताहिक यशस्वीपणे चालवून दाखवले आहे.आणी विशेष म्हणजे वयाच्या ब्याऐंशी व्या वर्षी अनेक व्याप सांभाळून, वीस वर्षांच्या मुलांना लाजवेल असे जबरदस्त कार्य बापू दिवसरात्र एक करून करत आहेत ही विषेश उल्लेखनीय बाब आहे.न थकता,न हारता अव्याहतपणे ही व्यक्ती पायाला भिंगरी लावून कार्यरत असते.अनेक तरूणांना लाजवेल व थक्क करेल असे त्यांचे कार्य बघून अन् समाजातील दु:ख,दैन्य दूर होऊन समाज नवचैतन्याने भारला जावून एक आदर्श समाज निर्मिती व्हावी यासाठी बापूंची तळमळ खरोखरीच शब्दात न व्यक्त करण्यासारखी आहे.त्यांच्या कार्याला ईश्वर नक्कीच यश देईल असा एक जबरदस्त आशावाद मनात ठेवून आपण आपण त्यांच्या कार्याच्या पाठीशी नक्कीच उभे रहाल अशी मी कार्यकारी संपादक या नात्याने अपेक्षा करतो.

प्रत्येक अंक वाचनीय, आकर्षक व्हावा यासाठी आम्ही तत्पर आहोतच.त्यासाठीच आम्ही समाज जागृती अभियानासाठी खणखणीत अग्रलेख, आतील पानावरील दणदणीत लेख,जबरदस्त बातमीपत्र देण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत आहोत.

आमच्या या उपक्रमासाठी आपण सर्वांनी भरभरून पाठींबा द्यावा अशी अपेक्षा आहे.आमच्या साप्ताहिकासाठी जास्तीत जास्त वाचक, वर्गणीदार,जाहिराती,देणग्या देऊन आमचा उत्साह आपण वाढवावा,आणी आपण सारे तो वाढवालच अशी आशा आहे.

आपल्या सगळ्यांच्या प्रेम व सहकार्यातूनच आम्ही ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी आम्हाला मदत होणार आहे.केवळ पैसा अन् प्रसिद्धी मिळवणे हे आमचे ध्येय अथवा ध्यास कधीच नव्हता.समाज बांधिलकी या नात्याने समाज जागृती व मेलेल्या अथवा मरत चाललेल्या मानवतेस नवसंजीवनी देण्याचे कार्य आम्ही या माध्यमातून करत आहोत.अपेक्षा आहे आपण सर्व वाचक व हिंतचिंतकांनी आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहावे.

सावधान हिंदुस्थान च्या माध्यमातून आम्ही संपूर्ण हिंदुस्थानातील समाजास सावधान करण्याचा प्रयत्न करतो आहोत.

बाकी आपण सगळे सूज्ञ आहातच.

हरी ओम्

---------------------

विनोदकुमार महाजन,

कार्यकारी संपादक,

सा.सावधान हिंदुस्थान

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस