धर्माभिमानी होऊ या

 हिंदुंनों धर्माभिमानी व्हा

हिंदु बांधवानों,

आपण संपूर्ण जगावर एक नजर टाकली तर काय दिसते ?

प्रत्येक धर्मियांचे देश आहेत.आणी प्रत्येक धर्मीयांना आपल्या धर्माबद्दल अभिमान आहे,गर्व आहे.

असे जर असेल तर मग जगाच्या पाठीवर आज एकही हिंदुराष्ट्र का बरे नाही ?

मनाला प्रश्न विचारून बघा.अस काय झाले की आमच्या हिंदुंचा एकही देश जगाच्या नकाशात नाही.

असे का ?

बर एवढ भयंकर होऊनही आम्ही धर्बाबद्दल उदासीन का बरे आहोत ?

आम्हाला आमच्याच धर्माबद्दल अभिमान का बरे नाही ?

आणी वर जे धर्माभिमानी आहेत,त्यांची टिंगलटवाळी करण्यात, त्यांना त्रास देण्यात, त्यांचा मानसिक छळ करण्यात ब-याच हिंदुंना आनंद का बरे वाटतो ?

भगवे कपडे घातलेला,गळ्यात तुळशी माळा अथवा रूद्राक्ष माळा घातलेला,आम्हा ब-याच हिंदुंना नेभळट,बावळट,गांवढळ,खेडवळ का बरे वाटतो ?

आमचे भयंकर मानसिक अध:पतन का बरे झाले ?

बरं,एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही तर आमची संस्कृती, सभ्यता, शालीनता, आमचे देवीदेवता,आमचा धर्म ,आमच्या चालिरीती याचा आम्हाला विसरच केवळ पडत चालला नाही तर आम्ही आमच्याच धर्माची,देवीदेवतांची, संस्कार - संस्कृती ची टिंगलटवाळी करण्यातच धन्यता का बरे मानू लागलो ?

प्रश्न गंभीर आहेत.आणी सावधान हिंदुस्थानच्या संपूर्ण सामाजिक समुहाला याची उत्तरे ही अपेक्षित आहेत.

परधर्मीयांची,त्यांच्या धर्मगुरूंची,त्यांच्या देवीदेवतांची टिंगल टवाळी तरी करून बघा.ते कसे एक होतात ?

मग ही एकी आमच्यात का नाही ? का आम्ही मुर्दाड झालो अन् मुर्दाड मनाने जगू लागलो ?

असे का घडले ? एवढे भयंकर काय घडले की आमच्यातले ईश्वरी तेज,स्वाभिमान सगळंच संपल.अन् आम्ही मानसिक गुलाम झालो ?

का असे विपरीत घडले ?

चला उठा,एक होऊ या.जातीपातीच्या पलीकडे जाऊन, एकसंध समाज निर्मितीसाठी सगळे एकत्र येऊ या.बैठका घेऊ या.गावागावात, गल्लीगल्लीत,घराघरात, मनामनात पोचून सामुहिक चर्चा घडवू या.

अन् धर्माभिमानी होऊ या.ईश्वर पूजक,संस्कृती पूजक,निसर्ग पूजक होऊ या.

धर्माचा अभिमान वाठवण्यासाठी प्रत्येक जण कपाळावर भगवे गंध अभिमानाने लाऊ या.घरावर,दुकानावर,व्यावसायाच्या ठिकाणी भगवा ध्वज लावू या.आपण सुरूवात करू या.इतर बांधवांना पृव्रत्त करू या.मनामनात शुभ संस्कारांचे बीज पेरू या.चला उठा नवसमाज घडवू या.सुसंस्कृत, सुजलाम, सुफलाम, संपन्न राष्ट्र घडवू या.

उठा बांधवांनो उठा.धर्म रक्षणासाठी पेटून उठा.

आपल्या या आदर्श आचरणातून आपल्या संस्कृति चे उच्च विचार जगाच्या कानाकोप-यात पोचवू या.भारताला विश्व गुरु बनवू या.

चला तर मग,धर्म रक्षणासाठी एक होवू या.सुसज्ज होऊ या.अन् चैतन्य दाई समाज निर्मितीद्वारा एक आदर्श राष्ट्र घडवू या.

उठा बाधवांनो उठा. उठा भगिनींनों उठा.

धर्माभिमानी होऊन जगापुढे आदर्श ठेऊ या.

हरी ओम्

विनोदकुमार महाजन.

कार्यकारी संपादक,

सा.सावधान हिंदुस्थान.

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र