मुर्दाड हिंदुंनों जिवंत व्हा
मेलेल्या मनाने जगणा-या हिंदुंनों, जिवंत व्हा ! ! !
---------------------------------------
देव,धर्म अन् देशासाठी आता हिदु बांधवांनी मुर्दाड मनाने,मेलेल्या मनाने ,स्वाभिमान शून्य, लाचार जगणे सोडून आता तेजस्वी, स्वाभिमानी अन्
जिवंत होऊन जगणे ही आज काळाची गरज आहे.
परकीय आक्रमणकारी मुघल, इंग्रज यांच्या अती अत्याचारामुळे व फोडा व झोडा या नितीमुळे हिंदु समाजाची भयंकर दयनीय अवस्था झाली आहे.
मानसिक खच्चीकरण यामुळे हिंदु समाज आज मुर्दाड मनाने जगतो आहे की काय ? अशी भयावह स्थिती आज निर्माण झाली आहे.देव,धर्म अन् देश यांचा आज आम्हाला विसर पडत चालला आहे की काय असे वाटायला लागते.
वर पुन्हा पाश्चात्य अंध अनुकरणामुळे तर समाज जास्तच भरकटत चालला आहे.
त्यामुळे तिन्हीसांजेला, दिवेलागणीला शुभंकरोती ऐवजी कौटुंबिक उद्वेग पसरविणा-या टिव्ही मालिका बघण्यातच सामुहिक, सामाजिक आनंद वाटतो आहे.त्यामुळे तरूण पिढीवर संस्कारांचे धन निर्माण करण्यामध्ये सामाजिक आस्था च कमी होत आहे.
फक्त पैसा कमावणे आणी त्यातच मश्गुल राहणे हेच जणू आजचे गणित होऊन बसले आहे.
इतर धर्मीयाकडे एक सूक्ष्म व चौफेर नजर टाकली तर काय दिसते ? त्यांचे धर्म प्रेम, तन - मन - धनाने धार्मिक निष्ठा वाढवण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत असतात. आपल्या दिवसभराच्या कमाईतून कांही हिस्सा ते हमखास धर्म कार्यासाठी अर्पण करत असतात.
याऊलट आमच्या कडे धर्म कार्यासाठी वेळच नसतो.भयंकर उदासिनता जागोजागी पहायला मिळते.ब-याच ठिकाणी तर आपलेच लोक आपल्या धर्माची,देवीदेवतांची टिंगलटवाळी करण्यात धन्यता मानतात.
असे का ???
म्हणूनच आम्ही आता
" सावधान हिंदुस्थानच्या "
माध्यमातून समाज जागृती अभियान आरंभ करीत आहोत.
समाजातील प्रत्येकाने आमच्या अभियानाला उस्फूर्त प्रतिसाद द्यावा ही अपेक्षा आहे.
आम्ही या माध्यमातून प्रत्येक गाव,गल्ली,शहर,खेडी या ठिकाणी अत्यंत जागृत कार्यकर्त्याची फौज निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.प्रत्येक गावामधून आमचे सक्रिय कार्यकर्ते समाज जागृती व धर्म जागृती अभियान विस्तृत प्रमाणात राबवून सामाजिक सौहार्द, धार्मिक अभियान, प्रत्येक गावामधून एक शक्तिशाली कार्यकर्त्याची फळी निर्माण करून, राबविण्यासाठी कांही योजना तयार करत आहोत. अपेक्षा आहे की.आपण सर्वांनी या कार्यासाठी भरभरून प्रतिसाद द्यावा.आमच्या साप्ताहिकास बळ लाभावे म्हणून जास्तीत जास्त वर्गणीदार, वाचक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे.आमचे ज्वलंत विचार समाजात खोलवर रूजले जावे म्हणून सामाजिक बांधीलकी म्हणून, व्यापक स्वरूपात सावधान हिंदुस्थान अंकातील जागृत लेख जास्तीत जास्त प्रमाणात मोठ्याने वाचून दाखवण्यात यावेत.समाज जागृती द्वारा धर्म जागृती साठी व्यापक स्वरूपामध्ये सर्वांनी भरभरून सहभाग घ्यावा.
ईश्वराप्रती श्रद्धा वाढवण्यासाठी जागोजाग धार्मिक अधिष्ठानाद्वारे सामुहिक, सामाजिक जागरूकता अभियान जोरदार पणे राबवण्यात यावे.
यामध्ये सकाळचे वेळी भजन किर्तन म्हणत गावागावातून उस्फुर्तपणे प्रभातफेरी काढण्यात यावी.यासाठी जास्तीत जास्त लोकांना प्रेरित करण्यात यावे.
मुर्दाड मनाने जगणाऱ्या मृतप्राय समाजास नवचैतन्य देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी आमच्या अभियानाला सहकार्य करावे.व सामाजिक अध:पनाचा भयंकर शाप संपवून एक आदर्श नवराष्ट्र निर्मितीच्या आमच्या कार्यास भरभरून प्रतिसाद द्यावा.
चला तर मग,
राजे शिवबांचे
हिंदवी स्वराज्य निर्मीतीचे कार्य सामुहिक प्रयत्नामधून पुढे नेवू या.सामाजिक कलह,उद्वेग, जातीपातीची फूट थोपवून एका नवसमाज निर्मीतीच्या ईश्वरी कार्यासाठी,सगळे एक होवून तन - मन - धनाने झोकून देवू या.
चला तर मग - उठा.
मेलेले मन ,उद्विग्नता सोडून चैतन्यमय होऊन झपाटल्यागत रात्रंदिवस कार्य करून एक आदर्श नवसमाज निर्माण करू या.
हरी ओम्
विनोदकुमार महाजन.
कार्यकारी संपादक,
सा.सावधान हिंदुस्थान.
Comments
Post a Comment