भूत आणी गाढव

 भूत आणी गाढव ....


तात्पर्य : - अविचाराने आणी अफवांवर विश्वास ठेवून निर्णय घेऊ नका.अन्यथा,आपल्यासह अनेकांचे जीवन बर्बाद होईल.


ही सुंदर बोधकथा नक्कीच वाचा.

हरी ओम्


विनोदकुमार महाजन



घटनाक्रम लक्षात घ्या...


एका कुंभाराने आपले *गाढव* दोरीने खुंट्याला बांधून ठेवले होते. रात्री एका *भूताने* दोरी कापून गाढवाला मोकळे केले. 


त्या गाढवाने एका शेतकऱ्याच्या शेतातील ज्वारीचे पीक नष्ट करून टाकले. 


हे पाहून चिडलेल्या शेतकऱ्याच्या बायकोने भला मोठा दगड घालून गाढवाला ठार केले. 


गाढव मेल्यामुळे कुंभार उध्वस्त झाला. 


प्रत्युत्तरादाखल कुंभाराने त्याच दगडाने शेतकऱ्याच्या बायकोची हत्या केली. 


बायकोच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने कुऱ्हाडीचे सपासप वार करून कुंभाराचं डोकं धडावेगळे केलं. 


कुंभार मेल्याचे बघून कुंभाराच्या बायको व मुलाने शेतकऱ्याच्या घराला आग लावली. 


हे पाहून क्रोधीत झालेल्या शेतकऱ्याने कुऱ्हाडीचे घाव घालून कुंभाराच्या बायको व मुलाला ठार केले... 


शेवटी जेव्हा शेतकऱ्याला पश्चात्ताप झाला तेव्हा तो त्या भूताला म्हणाला, "तुझ्यामुळे माझी पत्नी, कुंभार, कुंभाराची बायको व मुलगा मेले अन् माझ्या घराची राखरांगोळी झाली. तू असं का केलंस ??"


त्यावर भूताने शांतपणे उत्तर दिले... "मी कुणालाही ठार केले नाही, *मी फक्त 'दोरीने बांधलेले गाढव'  सोडले !!"*

 

             *--- तात्पर्य ---*


आज माध्यमं (WhatsApp, Facebook, Instagram, Twitter, Print Media, News Channel etc.) *भूतासारखी* झाली आहेत. ते रोज नवनवीन *गाढवांच्या दोऱ्या सोडतात* आणि लोकं कसलाही विचार न करता, सत्यासत्यता न पडताळता उलट - सुलट प्रतिक्रिया देतात आणि एकमेकांशी भांडतात, एकमेकांची मने दुखावतात. माध्यमं मात्र तमाशा घडवून आणतात आणि बक्कळ पैसा कमावतात... *आपले मित्र, नातेवाईक, हितचिंतक आणि सहकारी यांचेशी असलेले संबंध जपण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे.*


*सतर्क राहा... सुरक्षित राहा...*

🙏


कशी वाटली बोधकथा मित्रांनो ?

आवडली ना ?

तर मग प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडलेल्या घटनेशिवाय,सांगीवांगी घटनांवर,अफवांवर विश्वास ठेवून मुळीच निर्णय घेऊ नका.

आणी अविचाराने मुळीच वागू नका.

अन्यथा ?

भयंकर परीणाम .


म्हणूनच प्रत्येक गोष्टीची शहानिशा करूनच, सत्त्याअसत्या पडताळूनच निर्णय घ्या .


बोधकथेचा अर्थ नीट समजला ना ?

म्हणुनच कुजक्या आणी हलक्या कानाच्या लोकांवर विश्वास ठेऊ नका.

अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येते.


लोकांना सवयच असते.एक असलं तर दुसरंच बोलायचं.अन् चर्वीत चर्वण करून आनंद घ्यायचा.


खरंय ना ?


हरी ओम्

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस