सारेच डाव...

 सारेच डाव उलटे पडले...

✍️ २३०४


विनोदकुमार महाजन

-------------------------------

असे कसे उध्दवा सगळेच

विपरीत घडले ?

सारेच डाव उलटे पडले.

शरदाचे ही सगळे फासे उलटले.

चाणक्याचे ही पार हसे झाले.

स्वत:चाही खंजीर उलटा फिरला.

दुस-याचा खेळ करता करता

स्वत:चाच " गेम " होऊन गेला.


उध्दवाचे ही राजकारण उध्द्वस्त झाले.

उध्दवाचे ही सरकार खरेच अजब की हो ठरले.

एकेक सरदार अन्यायाला कंटाळून दूर निघून गेले.

उध्दव उध्द्वस्त मनाने हात चोळीत बसले.


ना घर का ना घाट का

अशी दयनीय स्थिती झाली.

उध्दवा अशी कशी रे तुझी गत झाली ?


कोण होतास तू ?

काय झालास तू ?

अरे वेड्या,

कु - संगतीने पार

वाया गेलास तू .


" काय डोंगार , काय झाडी "

" समद कसं ओके हाय ! "

म्हणत म्हणत तुझे सरदार ही

तुझ्यापासून दूर निघून गेले.


सत्तेच्या लालसेने तू झाला होतास पूरता वेडा.

ईमानदार सवंगड्याचा ही तू घात का रे केला ?

अन् स्वतःचाच समाजातुन विश्वास संपवला ?


अनाजी पंताने ही दोघांचेही हसे केले.

सगळेच डाव उलटून टाकले.

अनाजी पंतच निघाला पक्का

आचार्य चाणक्य.

भल्याभल्यांनाही त्याने केले भलतेच थक्क. 


महाराष्ट्राच्या राजकारणात सगळेच आक्रीत घडले.

अन् मुत्सद्दी पंतानेही सगळेच

डाव पलटवले.


आता महाराष्ट्राला लागलीय एकच आस

पंतांकडून हवाय सगळ्यांच्या विकासाचा ध्यास.


जय भवानी , जय शिवाजी !

हर हर महादेव !

म्हणत म्हणत महाराष्ट्रात घडवा

आता एक नवा इतिहास .

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस