अनेक प्रतिक्रिया

 [04/11, 8:50 pm] vinodkumarm826: एक प्रश्न आहे हो तुम्हाला ? उत्तर द्याल का ?? खरंच सांगा बरं...माजलेला गरीब नावाची एक नवीन प्रजाती उदयास आली आहे का ? फुकटचे सगळे , म्हणजे ? फुकटची सबसिडी , फुकटचे अनुदान , फुकटचे धान्य , घर , गॅस , पैसा लाटायचा अन् ? वर सरकारलाच शिव्या हासडायच्या... शिवाय ? सरकार हटाव आंदोलनात सहभागी भी व्हायचं ??? कमालिची दुनियादारी आली की राव... कली मातला...दुसरं काय रजे हो...बेइमानी की भी हद होती है प्यारे...!

विनोदकुमार महाजन

[04/11, 9:50 pm] +91 72083 71523: वेळ सगळ्या गोष्टींचं उत्तर देईल परंतु जेव्हा लोकांना कळेल व  त्याची जाणीव होईल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल ही दुनियादारी सर्वांच्याच आयुष्यात अनुभवायला येते आणि पुढेही येईल.. आज जे सरकार हटाव अश्या घोषणा देत आहेत ते उद्या नक्कीच पश्चाताप करतील आणि या उठा ठेवी मध्यम वर्गाला आणि गरिबाला जास्त असतात. आणि जेव्हा याची जाणीव होईल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल...

[04/11, 10:03 pm] +91 75586 27753: अगदी खरं  आहे यांचा माज व सवलती बंद च  करायला  पाहिजे  गरीब  म्हणून  सवलतीचा फायदा  शिव्याशाप  मात्र देशाच्या  सर्वोच्च  पंतप्रधानांना 🙏🏻🙏🏻

[05/11, 12:44 am] +91 90960 61013: 👍🌹*एक नवीन प्रजाती उदयास आली आहे हे अगदी बरोबर आहे पीसाळलेल्या कुत्र्यापेक्षाही घातक अशा प्रजातीचा शेवट निश्चित होणारच कर्माचे फळ लवकरच मीळणार व हे सर्व ईश्वरीय कृपा प्राप्त साधका कडूनच होणार त्यांना अशा कामात यश प्राप्त होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना*🙏👌

[05/11, 2:26 am] +91 94201 42360: हा एक भिकारडा पण आहे . जसं सुरवातीला भिकारी गरज म्हणून पोट भरण्यासाठी भिक मागतो . आणि भिक मागता मागता तो अधिक पैसा आला की त्याचा  भिक मागणे हा व्यवसाय बनतो . असं कितीतरी भिकारी मोठ्या शहरात श्रीमंत झाले आहेत . पैसा असुन जगु शकत नाहीत . शेवटी भिक मागणे हा व्यवसाय  बनतो . तसंच हा वरील प्रकार आहे आणि सत्तेसाठी राजकारण हा त्यातलाच दुसरा भाग आहे . सुरवातीला  विकासाच्या नावाखाली राजकारणात येतात नंतर सत्तेसाठी राजकारण  मग कितीही कमविले , कितीही पैसा असला करोडपती झाले तरी .‌भिकारी पणा जात नाही तसंच सत्ता राजकारण सुटत नाही शेवटी तो सवयीचा भाग ठरतो  . शेवटी  पुन्हा पैसा कमविण्याचा मार्ग म्हणजे सत्तेसाठी भिकारी राजकारण . हा त्यातलाच वरील प्रकार .

घनश्याम संगीडवार

[05/11, 3:14 am] +91 94201 42360: हा एक भिकारडा पण आहे . जसं सुरवातीला भिकारी गरज म्हणून पोट भरण्यासाठी भिक मागतो . आणि भिक मागता मागता तो अधिक पैसा आला की त्याचा  भिक मागणे हा व्यवसाय बनतो . असं कितीतरी भिकारी मोठ्या शहरात श्रीमंत झाले आहेत . पैसा असुन जगु शकत नाहीत . शेवटी भिक मागणे हा व्यवसाय  बनतो . तसंच हा वरील प्रकार आहे आणि सत्तेसाठी राजकारण हा त्यातलाच दुसरा भाग आहे . सुरवातीला  विकासाच्या नावाखाली राजकारणात येतात नंतर सत्तेसाठी राजकारण  मग कितीही कमविले , कितीही पैसा असला करोडपती झाले तरी .‌भिकारी पणा जात नाही तसंच सत्ता राजकारण सुटत नाही शेवटी तो सवयीचा भाग ठरतो  . शेवटी  पुन्हा पैसा कमविण्याचा मार्ग म्हणजे सत्तेसाठी भिकारी राजकारण . हा त्यातलाच वरील प्रकार . या पेक्षा दुसरं काय असु शकतं  यालाच म्हणायचं माजलेला गरीब  नावाची एक नविन प्रजाती जी उदयास आली आहे . देशाला संपविण्यासाठी   ,  भिकारी पण दाखवुन श्रीमंत बनण्यासाठी , भिकारी राजकारण करुन सत्ता मिळवायची नंतर फंडीग च्या माध्यमातून पैसा कमवायचा .  यासाठीच पाहिजे असते सवलती . सरकारची मदत इतके हे सर्व गरीब झाले आहेत काय . ज्याला गरज नाही तोही सवलतीचा फायदा घेतो . जसं सुरवातीला गरज म्हणून आरक्षण दिले .तो आता प्रतिष्ठेचा भाग बनला .   सुरवात गरजेसाठी होते . आणि शासन गरजे कमी करण्यासाठी सवलत देणे . फुकटचे सर्वं अनुदान सबसिडी सवलतीच्या नावाखाली आरक्षण, अन्न धान्य गैस  पैसा सारं काही . मग ती गरज उरत नाही तर तो व्यवसाय बनतो . धनसंपत्ती  मिळविण्याचा  सर्वोत्तम उत्कृष्ट  श्रेष्ठ मार्ग हाच आजचा अराजकता निर्माण करण्याचा माध्यम ठरते  . सामाजिक व सांस्कृतिक  स्तरावर  गरीब गरजु   विद्यार्थ्यां करीता शैक्षणिक  मदत ,  नंतर  नौकरी साठी आरक्षण आणि  गरीबांना उपचारासाठी वैद्यकीय मदत , दुष्काळ ग्रस्तांना , शेतकऱ्यांना सांत्वनासाठी मदत . एवढेच सांगावेसे वाटते मतदार  बंधु हो जागा  हो . 

              शासन स्तरावर वरील  सर्वोत्तम  श्रीमंत श्रेष्ठ उपक्रम . गरीबांपेक्षा  श्रीमंतांचा फायदा अधिक . शेवटी गरीब कोण होतो  तो तर शासनच !    सवलत नाही तर भिक मिळण्यासाठी दाखविलेला , चालविलेला   लाजारीपण , लाचारीपण आहे .   उपक्रम कितीही चांगला असला तरी त्या ऊपक्रमा करीता फौंडेशन हा सुद्धा मजबूत असायला पाहिजे . आता  फुकटचे मिळविण्यासाठी मदतीचे आवाहन समोर दिले  जाते . सांत्वनासाठी मदत सुध्दा सुरू झालेली आहे . 

        मदतीसाठी जो फौंडेशन मजबुत व्हायला पाहिजे  तो  फौंडेशन मजबुत व्हायच्या अगोदरच  जर  छत टाकुन  दिला तर ती इमारतच कोसळेल . असंच काहीसं आपल्या  राज्यात  , देशात  तर  होत नाही  ना .‌!  कोणत्या मार्गाने भिक मागायची हा विचार करायला नको  काय . मदत ही जोपर्यंत ‌चारही बाजुंनी होत नाही तोपर्यंत प्रत्येक गरजुंना‌ मदत   देणे  हे कितपट संयुक्तिक आहे . जर मुख्यमंत्री निधी मध्ये  फंडच  कमजोर असेल तर  केंद्रीय मदतीचा ओघच नाही तर  लाडक्या बहीनी म्हणा की दुष्काळ ग्रस्त शेतकरी म्हणा यांना मदत तरी कुठपर्यंत  आणि किती देणार .  सांत्वनासाठी दिलेली मदत तीही मान्य नसते . 

           शासनाकडून असेच होत नाही ना .!  यावर  विचार व्हायला पाहिजे .‌ मदत‌ देण्यासाठी जे उद्दीष्ट  ठरविण्यात आले होते . ते उद्दिष्टच अपुर्ण असेल तर समाज संघटना या मदतीसाठी सक्षम ठरणार काय . . जर  गरजवंताना मदत  ( शैक्षणिक ‌आणि वैद्यकीय) ‌आपण द्यायला हरकत नाही .‌ द्यायची  पण सत्तेसाठी  मतांसाठी  नाही .‌परंतु सक्षम आधार   असलाच पाहिजे .‌ सवलती पुर्वी  गरज तपासायला पाहिजे . सरसकट सर्वच स्तरावर नको तेही सवलतीचा , आरक्षणाचा फायदा घेतात . इथेच समाज कमजोर ठरतो . आणि आता सुरूवात आहे .  मग ती अराजकता ठरते . हिंसक रुप धारण करीत  , देण्याची सुरुवात झाली   /  नाही झाली तेच एक एक करीत ही संख्या भविष्यात ‌वाढत जाणार तेव्हा आपण कुठला विचार करणार , पैसा कुठला आणणार ‌ पाच वर्षांच्या आतच हा निधी संपणार नंतर पुढे काय हा प्रश्न कायम असणार तेव्हा संघटना काय करणार . यामुळे बिघडणार काहीच नाही . परंतु ज्या उद्दीष्टांच्या पुर्तीसाठी योजना  निर्माण केल्या जातात त्या शेवटी अपुर्णच राहतात .  योजनांचा मुख्य उद्देशच बाजुला राहतो .अपुर्ण राहिले त्या कडे   कोणाचे लक्ष जात नाही . शेवटी या सर्व प्रयत्नांत  शासनच संपेल ! 

              हा प्रकार , ही भिती आजच का निर्माण व्हावी .‌यासाठी कोणती परिस्थिती जबाबदार आहे .‌त्याकडे लक्ष घालायचे नाही काय .‌लक्षच घातले नाही तर लाख  कोटी देणार कुठुन .‌ त्यासाठी लाख  कोटी तर शिल्लक पाहीजे . हाच उद्देश आपण ठेवून मदत देण्याचा विचार करण्यात आलेला  होता  काय .......?

  धन्यवाद नमस्कार 

 .घनश्याम लक्ष्मणराव संगीडवार संगीडवार सावली .

                   95 11736153. .

[05/11, 9:18 am] +91 94201 42360: *"सवलत कोणाला? सत्ता कोणाची? आणि शेवटी गरीब कोण?"*

*- घनश्याम लक्ष्मणराव संगीडवार, सावली*


*मतदार बंधूंनो, जागे व्हा! आता वेळ गप्प बसायची नाही!*


एकेकाळी एक माणूस भुकेने हात पसरवायचा. त्याला भिक मागायची लाज वाटायची. आज परिस्थिती अशी आहे की हात पसरवायला लाज वाटत नाही, उलट हात पसरवणाऱ्याला सवलत मिळते, आणि कष्ट करणाऱ्याला विसर पडतो!


*हा बदल कोणी केला? गरीबाने नाही! शासनाने केला!*


*१. सरकार - देणारं की विकत घेणारं?*


सरकारची कामं काय? गरीबाला पायावर उभं करणं!

पण आज सरकार काय करतंय? गरीबाला आयुष्यभर हातावर ठेवणं!


लाडकी बहीण, मोफत धान्य, मोफत गॅस, मोफत पैसा - हे सगळं मदत आहे की मतांचं अॅडव्हान्स बुकिंग आहे?


जर खरंच मदत द्यायची होती, तर आधी गरज तपासली का? ज्याला गरज नाही, त्याच्या घरीही सवलत का पोहोचते? कारण मतं गरीबाचीही एकच आणि श्रीमंताचीही एकच!


*सरकारला गरीब नकोय, सरकारला गरीबाचा मतदार पाहिजे!*


*२. शासन - फाउंडेशन कुठे आहे?*


कोणतीही योजना म्हणजे इमारत! आधी पाया मजबूत लागतो!

पण इथे काय चाललंय?


मुख्यमंत्री निधीत पैसाच नाही, केंद्राकडून ओघ नाही, आणि घोषणा मात्र लाखो कोटींच्या!


पाया नसताना छत टाकलं की इमारत कोसळतेच! तसंच आज राज्याचं आणि देशाचं होतंय!


आज दिलं, उद्या निधी संपला तर काय? पाच वर्षात योजना संपणार, मग पुढचा नेता येऊन पुन्हा नवी घोषणा करणार! गरीब तिथेच! शेतकरी तिथेच! फक्त नेत्याच्या गाड्या बदलणार!


*३. राजकारण - सेवेतून सत्तेत, सत्तेतून व्यवसायात!*


सुरुवातीला नेता म्हणतो - "मला विकास करायचाय!"

नंतर म्हणतो - "मला सत्ता पाहिजे!"

आणि शेवटी म्हणतो - "मला सत्ता पाहिजेच, कारण सत्ताच माझा व्यवसाय आहे!"


भिकाऱ्याला भिक मागायची सवय लागते, तशी नेत्याला सत्तेची सवय लागते! भिकारी पैसा असूनही भिक सोडत नाही, नेता करोडपती होऊनही सत्ता सोडत नाही!


*हाच तर "माजलेला गरीब" नाही, "माजलेलं राजकारण" आहे!*


*४. आरक्षण - गरजेपासून प्रतिष्ठेपर्यंत!*


आरक्षण दिलं होतं गरजवंताला वर आणण्यासाठी!

आज आरक्षण झालंय प्रतिष्ठेचं शस्त्र!


ज्याला खरंच गरज आहे, तो शैक्षणिक मदतीसाठी, वैद्यकीय मदतीसाठी, नोकरीसाठी वाट पाहतोय, आणि ज्याला गरज नाही, तो आरक्षणाच्या नावाखाली श्रीमंत होतोय!


इथेच समाज कमजोर होतो! इथेच अराजकता जन्माला येते!


*म्हणून शेवटचा प्रश्न -*


*शासनाकडे जर देण्यासाठी लाख कोटी नाहीत, तर घोषणा लाख कोटींच्या का?*

*जर फाउंडेशनच कमजोर आहे, तर छताचं स्वप्न का दाखवता?*

*जर मदत मतांसाठीच द्यायची आहे, तर गरजवंताचं नाव का घेता?*


मतदार बंधूंनो, मदत नको असं नाही! मदत ही गरजवंताला मिळालीच पाहिजे - शिक्षणासाठी, औषधासाठी, दुष्काळासाठी!


पण मदत ही *"चारही बाजूंनी तपासून, सक्षम पाया घालून, गरजवंतालाच"* मिळाली पाहिजे! सरसकट नाही!


नाहीतर एक दिवस असा येईल, जेव्हा योजना अपूर्ण राहतील, उद्दिष्ट बाजूला राहील, आणि शेवटी गरीब होईल ते शासनच!


*आणि शासन गरीब झालं की देश गरीब होतो!*


*विचार करा! जागे व्हा! नाहीतर उद्या विचार करायलाही वेळ उरणार नाही!*


*धन्यवाद! नमस्कार!*

*घनश्याम लक्ष्मणराव संगीडवार, सावली*.

[05/11, 9:33 am] +91 97675 85868: एकदम सुंदर विचार आहेत. या सवलती मुळे गावखेड्यात मजुर मिळणे कठीण झाले आहे. वास्तविक पाहता अशी फुकट वाटप सुरू झाले होते तेव्हाच अटकाव करायला हवे होते. सर्व प्रथम अशी मतदारांना चारा टाकायची पद्धत संयुक्त तेलंगाना असतांना एक फिल्म अ‍ॅक्टर एन टी रामाराव यांनी सुरु केले व निवडून आला होता. सत्ता काबीज केले होते. दिल्ली सारख्या महानगरात श्री केजरीवाल यांनी फुकट वीज व इतर सवलती देत सत्ता काबीज केले होते. कर्नाटकात वर्तमान सरकार नी, मुस्लीम समाज बांधवांना रिझर्वेशन लागू करत मतदारांना भुरळ घालत सत्ता काबीज केले. यादी भरपुर आहे. करीता सरकारांना दोष देण्यापेक्षा, मतदारांना जागृत करत राहणे, जागृत करत राहणे, मोफत शिक्षण व मोफत वैद्यकीय सेवा ईत्यादी साठी सरकारला वेठीस धरणे जोपर्यंत विरोधी पक्ष प्रयास करणार नाही, तोपर्यत सर्व काही असेच सुरु राहील व लोकशाहीस घातक होईल. तुमचे विचार एकदम सुंदर आहेत.

[05/11, 9:58 am] vinodkumarm826: माझ्या या पोस्टर वर आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद 

🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

निम करोरी बाबा

VSHYM से जुडऩे के लिए