दत्त महिमा

 *श्री दत्तात्रय दैवत...उपासना  का व कशी करावी ?*


१. दत्त या देवतेकडून जिवाला अधिक प्रमाणात सात्त्विक शक्ती मिळत असल्याने त्याच्या आधारे जीव वाईट शक्तींशी लढू शकतो.

२. दत्ताच्या नामजपामुळे जिवाला शिवाचीही शक्ती मिळते.

३. दररोज किमान १५ ते २० मिनिटे एकाग्र चित्ताने दत्ताचा नामजप केल्यास वाईट शक्तींचा त्रास अल्प होतो.

४. पूर्वजांना गती मिळते आणि त्यामुळे घरातील वातावरण आनंदी रहाण्यास साहाय्य होते. 


लिंगदेहाला गती देण्याच्या संदर्भात दत्ताच्या नामजपाचे होणारे फायदे*


१. पूर्वजांना गती देणारी देवता दत्त आहे. दत्ताचा नामजप केल्याने नामजपातून प्रक्षेपित होणार्या आघातजन्य तेजोमय लहरींमुळे लिंगदेहाभोवती असलेल्या वासनात्मक लहरींची कार्य करण्याची तीव्रता अल्प होऊन त्यातील रज-तम नष्ट होऊ लागल्याने लिंगदेहाचे जडत्व अल्प होऊन त्याला पुढे जाण्यास ऊर्जात्मक बळ मिळते.

२. लिंगदेह आणि त्याच्या प्रत्यक्ष देहाभोवती संरक्षककवच निर्माण होते. यामुळे त्याचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होते.

३. पृथ्वीवरील वासनात्मक आसक्तीही अल्प होण्यास साहाय्य झाल्याने त्याला अल्प वेळात पृथ्वीमंडल भेदून पुढे जाता येणे शक्य होते.

४. दत्ताचा नामजप केल्याने वायूमंडलात चैतन्य कणांची निर्मिती होऊन त्याचा लिंगदेहाला फायदा होतोच.

५. नामजप करणार्या इतर जिवांचेही दूषित झालेल्या वायूमंडलातील त्रासदायक लहरींपासून रक्षण होते.


*पूर्वजांच्या त्रासांच्या निवारणार्थ दत्तोपासना*


दत्त म्हणजे ब्रम्हा, विष्णु, महेश यांच्या सगुण रुपांचे प्रत्यक्ष एकत्व!

विवाह न होणे, विवाह झाल्यास पती-पत्नींचे न जुळणे, जुळल्यास गर्भधारणा न होणे, गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे, अपत्ये बालपणातच मृत्यूमुखी पडणे वगैरे त्रास असलेले समाजात आपल्याला दिसतात. या गोष्टी पूर्वजांच्या त्रासामुळे होतात. दारिद्र्य, शारीरिक आजार यामागेही पूर्वजांचे त्रास असू शकतात. मात्र आपल्याला पूर्वजांचा त्रास आहे किंवा नाही, हे केवळ उन्नतच सांगू शकतात.


हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कोणी श्राद्धपक्ष वगैरे करत नाहीत. तसेच साधनाही करत नाहीत. त्यामुळे बहुतेकांना पूर्वजांच्या लिंगदेहामुळे त्रास होतो. मात्र तो त्रास आहे किंवा नाही, हे सांगणारे उन्नत न भेटल्यास येथे दिलेले काही तर्हेचे त्रास पूर्वजांमुळे होतात, असे समजून साधना करावी.


*समंधबाधा दूर होण्यासाठी दत्तोपासना*


समंधबाधांना (वेगवेगळया पद्धतीने किंवा मार्गाने आत्महत्या करणार्यांना) ब्रह्मांडातील कोणतीच गती प्राप्त होत नसल्याने (कोणत्याही योनीची प्राप्ती होत नसल्याने) त्यांना पाताळवास प्राप्त होतो. पाताळवासात पोहोचण्यापूर्वी त्याच्या कर्मगतीचा प्रवास त्याला भुवलोकात राहून पूर्ण करावा लागतो, उदा. जसे हलक्या वजनाच्या थोड्या बिया (मिरची, तुळस, सब्जा वगैरे) किंवा थोडे वाळूचे बारीक कण भरून फुगवून हवेत सोडलेला फुगा आतील बियांसहित किंवा वाळूच्या कणांसहित हवेत तरंगतो.


त्याची शक्ती क्षीण होऊन तो फुटल्यानंतर त्यातील बिया आणि कण यांसहित फुग्याचे जे व्रतडे हवेत वर तरंगत होते किंवा विहार करत होते ते आतील दाण्यांसहित खाली येते. याप्रकारेच भुवलोकातील कर्मगती संपल्यानंतर उरलेले तम (कातडे) त्याच्या तमाच्या वजनानुसार त्याला प्राप्त झालेल्या लोकात स्थीर होते. मात्र प्राप्त कर्मगती असेपर्यंत भुवलोकातील समंधबाधा इतर वाईट शक्तींच्या आश्रयाने आपल्या नातेवाइकांना प्रचंड प्रमाणात त्रास देत राहतात. अशा प्रकारे समंधबाधांमुळे साधकांना साधना करण्यात प्रचंड अडथळे निर्माण होतात. दत्ताच्या नित्य उपासनेने अशा समंधबाधांना कर्मगती संपेपर्यंत दत्तमहाराज आपल्यातील योगसामर्थ्याने सातत्याने आपल्या ताब्यात ठेवून साधनामार्गातील अडथळे दूर करतात.


*श्री दत्तात्रेय*


*श्री दत्तात्रेयांच्या स्वरूपांची बाबतची माहिती*


(दक्षिणांग) आदिगुरू

1 सुदर्शनचक्र - ज्ञानशास्त्र

2 डमरु - शब्दशास्त्र

3 माला - मंत्रशास्त्र.

( वामांग ) ईश्वर

1 शंख - धर्मशास्त्र

2 त्रिशूळ - आचारव्यवहार प्रायश्चित्त शास्त्र

3 कमंडलु - जीवनकर्म जीवन.

एवमीश्वरभागो यं जगत्स्थित्यै परेशितु:  |

तथान्य गुरुभागश्च माया भ्रमनिवर्तक:  ||

अर्थ - श्री दत्तात्रेयांच्या एकाच शरीरात दोन स्वरूपांची कल्पना केलेली आहे. त्यांचे उजवे अंग हे आदिगुरुस्वरूप असून,  ते मायाभ्रमाचे निवर्तक आहे  व डावे अंग हे जगाची सुस्थिति चालवणारे ईश्वरस्वरूप आहे.  श्रीगुरू टेंबे स्वामी महाराज हा असा खुलासा करतात,  स्वभक्तांवर अनुग्रह करण्याकरिता प्रभूंनी यथानुक्रम चक्रादिक आयुधे धारण केली आहेत.

*|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||*


*भक्तकाम कल्पद्रुम  भगवान दत्तात्रय*


शरणागत वत्सल अशी दत्त महाराजांची ख्याती आहे, जो मला अनन्य भावाने शरण येईल त्याला मी सहाय्य करेन. आता दत्त महाराजाना शरण येणाऱ्यात भक्त मंडळी तर कायम होती, आहेत आणि भविष्यातही असतील पण अभक्ताने जर शरण येऊन प्रार्थना केली तर? भक्त हा प्रीतीने अर्थात प्रेमाने प्रार्थना करतो पण त्याच बरोबर द्वेष अथवा भीतीने एखाद्या अभक्ताने प्रार्थना केली तरी दत्त महाराज कृपा करतातच. कैक उदाहरणे यास्तव देता येतील. गुरुचरित्राच्या दहाव्या अध्यायात वल्लभेश ब्राह्मणाला तीन चोर मारावयास येतात, तात्काळ श्रीपाद श्रीवल्लभ रुपी दत्त महाराज प्रकट होऊन त्यातील दोन चोरांना ठार करतात पण तितक्यात तिसरा चोर पाया पडून मारू नका असे विनवतो. हि विनवणी किंवा प्रार्थना भीतीने केली आहे, मारू नका. आता शरण आला म्हटल्यावर महाराजांनी नाही मारलं त्याला. पुढे दोन मदोन्मत्त ब्राह्मण जयपत्र घेण्यासाठी वाद विवाद करायला येतात. एका साधारण अशा माणसाने सात रेषा ओलांडताच तो विद्वान होतो आणि वाद करायला सिद्ध होतो हे पाहून त्या दोघा ब्राह्मणांची मती गुंग होते. आता यातून शरण जाण्याखेरीज दुसरा मार्ग नाही हे पा हून ते तात्काळ महाराजांना शरण येतात आणि गुरुमहाराज केवळ बारा वर्षांच्या शिक्षेवर त्यांची मुक्तता करतात. कोल्हापूरचा विप्र पुत्र असाच जीभ कापलेल्या अवस्थेत शरण येतो, त्याला कुठे दत्त महाराज ठाऊक असतात? पण शरण आला म्हटल्यावर उद्धार निश्चित आहे. केवळ गुरुचरित्रात नव्हे तर आपल्या आयुष्यात देखील कैक उदाहरणे अशी पाहण्यात येतात. शेवटी मला तारा म्हणून हात जोडले आणि घेतलं सांभाळून महाराजानी मात्र यात दत्त महाराज एका अटीवर उद्धाराचे वचन देत आहेत आणि ती अट म्हणजे विश्वास किंवा श्रद्धा!


हरी ओम्

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस