अवतार कार्य
विठ्ठल ( पंत ) रूक्मिणी : -
ज्ञानेश्वर महाराजांचे आईवडील.
मुलांची नावे : -
सोपान
निवृत्ती
ज्ञानदेव
मुक्ताबाई.
सोपान चढूनी,
निवृत्त जाहलो,
ब्रम्ह ज्ञान मिळवुनी
मुक्त जाहलो.
आध्यात्माचा सोपान चढला,
मग मोह,मायेतुन निवृत्त झाले.
तदनंतर, ब्रम्हज्ञानाची प्राप्ति झाली.
आणी सरते शेवटी मुक्त ही झाले,
याची देही याची डोळा,
मुक्तीही मिळाली.
धन्य तो देह,
अती भाग्यवंत....
नाम तयांचे
विठ्ठल रूक्मिणी.
चार अपत्ये मिळाली,
ईश्वर स्वरूप.
सोपान, निवृत्ति, ज्ञानदेव, मुक्ताबाई.
डोहामध्ये उडी मारूनही मुक्त
जाहले जीव.
पुण्यवंत जाहले ईश्वर स्वरूप
तयावेळी.
आळंदी जाहली बहु
लोकप्रिय,
सज्जनांचा येतो तीथे,
महापूर.
चौ-यांशी सिध्द,
प्रत्यक्ष महादेव,
सिध्देश्वर बनूनी,
राहतो तेथे.
सुवर्ण पिंपळ,
वसे तीथे,
ज्याशी सव्वा लक्ष प्रदक्षिणा
घातली ज्ञानेश्वर माऊली,
रूक्मिणी ने.
अशा सिध्दक्षेत्री,
एक तप पूर्ण,
कठोर तपश्चर्या करून,
मिही झालो,
सिध्द एक.
प्रत्यक्ष ज्ञानदेवे,
फल ते दिधले,
पसायदानामधले
" विश्व - स्वधर्म - सुर्ये - पाहो " ,
हे वचन पूर्ण करण्या,
दिधली अनुमती,
ज्ञानदेवे मजला.
सुरू झाले कार्य,
" विश्व विजेता,हिंदु धर्म ",
बनविण्याचे धर्मकार्य,
आरंभीले.
असावा तुम्हा सर्वांचा हातभार,
जगाच्या कानाकोप-यावर,
भगवंताचा भगवा,
पोचविण्यासाठी.
माझ्या सद्गुरू आण्णांनी,
कृपा मजवर केली,
माता गायत्री ची,
तप:साधना करविली,
सद्गुरूंनी माझ्या.
पंढरपूरी एक तप,
आळंदीशी एक तप,
साधना ती माझी पूर्ण
झाली तपे दोन
ईश्वरी कृपेने.
त्या तपाचे बळावर,
मिळाले ज्ञानरायासह
सा- या सिध्दांचे,
देवीदेवतांचे आशिर्वाद मजला,
मिळाले ब्रम्हज्ञान,
ईश्वरी कृपेने.
आता कोण थांबवेल,कोण अडवेल ?
ईश्वरी कार्यासाठी मला...?
नाव असे विनोद,
करीतो कवन आज,
मुक्तछंदे.
असावा सा-यांचा जीव्हाळा,
कार्यासाठी कळवळा,
सदा ठेवावा तुम्ही,
मजसाठी.
हरी ओम् 🕉🚩
विनोदकुमार महाजन.
Comments
Post a Comment