शिवबांचे दु:ख !!!

 शिवबांचे दु:ख


आऊसाहेब गेल्या,

खंबीर मानसिक आधार गेला.

मिर्झाराजे जयसिंग बरोबरच्या

तहात रक्ताच पाणी करून

मिळवलेल हिंदवी स्वराज्य

गहाण पडल.

शंभूराजे संकटात सापडले.

आग्र्याहून सुटका करवून घेतली.

पण गडावर स्वकियांच्या

मानसिक छळाने त्रस्त झाले.

गुढग्याचा आजार बळावला.

जगात कुणाचाच आधार उरला नाही.


आई तुळजाभवानीचा,साधुसंतांचा,

पुण्यवंताचा आशिर्वाद असुनही,


दिल्लिवर भगवा फडकवता

आला नाही.


केवढे हे भयंकर, अफाट दु:ख ?

केवढे वैशम्य ?

कसे पचवले असेल हे सगळं ?


परकाया प्रवेश करून पाहिलं

तर किती भयानक विष पचवलं ?

ईश्वरी कार्यासाठी किती भयंकर,

कठोर आयुष्य वेचल ?


सिध्दांतासाठी आयुष्य वेचल.


तडजोड केली असती तर ?

मनसबदारीतून राजऐश्वर्य ही

मिळालं असतं.


पण गुलामीच राजऐश्वर्य घेऊन

काय करायचं ?


किती हा स्वाभिमानी बाणा ?


धन्य ते शिवराय !!!

धन्य ते अवतार कार्य !!!


आजच्या भयंकर अधर्मी सुळसुळाटात,

पापाच्या अंध:कारात एक तरी

धगधगते शिवतेज पृथ्वीवर

पाठव आई जगदंबे.

एक तरी धगधगतं शिवतेज

पृथ्वीवर पाठव.


जागोजागी लपलेले अनेक उन्मत्त, अधर्मी, लुटेरे,

आक्रमणकारी,अफजलखानाचे, नारसिंव्ह बनून कोथळे टरटरा

फाडण्यासाठी.

उन्मत्त, उन्मादी स्वकीय खंडोजी

पाटलाचे त्वरित हातपाय तोडून

कठोर दंडीत करण्यासाठी,


एक तरी शिवतेज आज पृथ्वीवर

पाठव.

एकतरी शिवतेज पाठव !!!


हरी ओम् 


विनोदकुमार महाजन.

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस