सात्विक व अघोरी
सात्विक व अघोरी
सात्विक साधना ही सर्वश्रेष्ठ मानली जाते व सात्त्विक साधनेमध्ये आत्मोध्दारातून वैश्विक कल्याण हा साधारणतः उद्देश असतो.तर अघोरी मध्ये आत्मोध्दारातून मोक्षप्राप्ती हा साधारणतः उद्देश असतो.अघोरी मध्ये मांस , मदिरा , स्त्रीभोग ही सामान्य बाब समजली जाते तर , सात्विक साधनेमध्ये वरील गोष्टी निषिद्ध समजल्या जातात.दोन्हीकडे मनाच्या शुध्दीतून ईश्वर प्राप्ती कडे जाता येते.अघोरी साधारणतः महादेव , महाकाली व कालभैरव यांचे उपासक असतात तर सात्विक साधनेमध्ये सर्व देवतांची उपासना केली जाते.अघोरी हा ईश्वर प्राप्तीचा तामसी मार्ग आहे तर सात्विक हा सत्वशील मार्ग आहे.साधारणपणे स्मशानात अघोर साधना केली जाते तर मंदिरात , घरी सात्विक साधना करतात.कलियुगात ब-याच वेळा राक्षसी शक्तिंवर विजय मिळवण्यासाठी दोन्ही मार्गांनी यश मिळवावे लागते.कारण आसुरी शक्ती आज प्रचंड ताकतवान आहेत.त्यांना शह देणे ब-याच वेळा सात्विक साधनेमध्ये अशक्य होऊन जाते.परंतु दोन्ही मार्गामध्ये सध्या भोंदूगिरी व बजबजपुरी खूपच माजली आहे.त्यामुळे खरा व्यक्ती सापडणे म्हणजे महाकठीण काम आहे.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती...🙏🙏🕉️🚩
हरी ओम...
विनोदकुमार महाजन
Comments
Post a Comment