धर्म जागृती साठी समाजातील प्रत्येक घटक जागरूक करणे अत्यावश्यक

 गेले काही दिवसापासून हिंदूंची हत्या वाढताय आणि अनेकांनी त्या घटनाविषयी निषेध नोंदवत हिंदूंनाही कट्टर होण्याविषयी जागरूक होण्याविषयी सांगितले जे की चुकीचे नाही...


परंतु कट्टर होण म्हणजे नेमकं काय??

किंवा त्यापासून ची साध्यता किंवा इतर अजून कुठले पर्याय आहेत का हिंदूंना जागरूक करण्याविषयीचे याचा धांडोळा घेतला असता लक्षात आलं की...


प्रत्येक हिंदूंना आपल्या विस्मृतीत गेलेले रीतिरिवाज, संस्कृती, परंपरा यांची परत एकदा आठवण करून देण्याची आवश्यकता आहे....


शांतीप्रिय समाजाकडून होणाऱ्या हत्याकांड आपले जितके सहजगत्या लक्ष वेधले जाते पण हिंदूंचं मिशनऱ्यांकडून शांततेचा होणाऱ्या छुप्या धर्मांतरंबाबत बरेचजण अनभिज्ञ आहेत...

मागास घटकातील किंवा आदिवासी भागातील आपल्याच कित्येक धर्म बांधवांनी २ किलो धान्यासाठी स्वधर्माचा त्याग करून ते ख्रिस्ती झाल्याची फक्त एकच नव्हे तर हजारो घटना आहेत...

पण हे का होतंय याचा कोणी विचार केलाय का??

आपले ऋषीमुनी वेदाअध्ययन करून त्यातील विचार खेडोपाडी घरोघरी जाऊन पोचवायचे, लोकांच्या मनात संस्कृतीचा बीजारोपण करायचे.हे परंपरा पुढे लुप्त झाली...

पण याच परंपरेची मूलभूत तत्व ख्रिस्ती मिशनऱ्यांनी उचलून त्याचा वापर त्यांनी त्यांच्या धर्मप्रसारासाठी केला...

ते लोकांपर्यंत जाऊन पोहोचले आणि बाटनुकिस सुरुवात केली. आपण सहजगत्या म्हणतो की लोकांनी दोन किलो तांदळासाठी धर्म बदलला, पण याला जबाबदार कोण? आपण कमी पडलो आपल्या धर्म बांधवांना समजून घेण्यास, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास...


आज जर का आपण आपल्या पूर्वाश्रमी हिंदू असणाऱ्या बांधवांना आपण बुधभूषण मधील 'जीवित मुर्तक मन्ये' किंवा श्रीमद्भागवतेतील 'स्वधर्म निधन श्रेय' हे श्लोक त्यांच्या मनावर बिंबवली असते तर धान्य सोडा जीव गेला तरी त्यांनी धर्म सोडला नसता...

आपल्या धर्मातील विचार, तत्व, रीतिरिवाज, परंपरा, आपले सांस्कृतिक खूप व्यापक आहे...


आपण तिला लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडतोय. एक उदाहरण आठवलं जेव्हा एक ख्रिस्ती धोकादायक व निर्जन अशा बेटावर धर्मप्रसाराचे कार्य करण्यासाठी चालला होता, तिथे जीव घेणे हल्ले करणाऱ्या आदिवासी राहत होते, ज्यांच्या बाहेरील जगाशी संपर्कच नव्हतं, अशा परिस्थितीत तो तिथे गेला आणि जाताक्षणी मारला गेला, त्या क्रिस्ती माणसाला ९९ टक्के खात्री होती, की आपण मरणार पण तरी त्याला कुठेतरी जिद्द होती की एक तरी माणसाला बाटवयाच...


हीच वेळ आहे आपल्याला शस्त्राबरोबरच शास्त्र आणि जाज्वल इतिहास जाणून घेण्याची, आपली संस्कृती, आपली परंपरा अभिमानाने मिरवण्याची.


कट्टर होण्याऐवजी धर्मनिष्ठ व्हा...🙏

"जय जय श्रीराम" 🙏🚩

रोहित पेरे पाटील.

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र