बाळा , हे ही दिवस जातील
*बाळा , जातील हं दिवस*
✍️ २८७२
*विनोदकुमार महाजन*
🩷🩷🩷🩷
ज्या वेळी आपण खूप
दुःखात , संकटात , अडचणीत असतो तेंव्हा आपल्या आईचे दोन आधाराचे शब्द किती महत्वाचे आणी लाख मोलाचे असतात बरं ?
संकटकाळात आपली आई वात्सल्याने आणी मायेने डोक्यावरून , पाठीवरून हात फिरवते आणी म्हणते...
" *बाळा , जातील हं हे ही* *दिवस.काळजी* *करू नको.सगळं* *व्यवस्थित होईल . "*
अगदी करोडो रूपये देऊनही असे आधाराचे , मायेचे चार शब्द मिळतील का हो या जगात ?
म्हणूनच आई ही आईच असते.
अगदी फुटक्या तुटक्या झोपडीतही आणी भाजी भाकरीतही ? मायेच्या उबेची आणी आधाराच्या दोन शब्दांची खरंच किती ताकद असते बरं.
जग जींकण्याची उर्मी ही ह्या प्रेमात असते.
आणी सगळी स्वर्गीय सुखेही आईच्या प्रेमापुढे फिकी असतात.
म्हणूनच म्हणतात ना ?
" *स्वामी तिन्ही जगाचा* *आई विना* *भिकारी..."*
एक जुनी म्हण आहे...
बघा आपल्याला त्याचा अर्थ बोध होतोय का ते ?
" आंस का बाप , निरास की माॅं , होते की बहन , जोरू साथ , पैसा गाॅंठ , निदान का दोस्त..."
*माता महालक्ष्मी की जय*
🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment