हाताबाहेर गेलेली केस
*हाताबाहेर गेलेली* *केस...!!??*
✍️ २८७७
*विनोदकुमार महाजन*
👆👆👆👆
बरीच घरे अशी असतात की , त्या घरातील एखादा व्यक्ती अगदी हाताबाहेर गेलेला असतो.
हाताबाहेर म्हणजे नेमके काय ?
" *आऊट ऑफ कंट्रोल* .."
होय...
अनेक घरातून असे प्रकार पहायला मिळतात.
कोणी एवढा भयंकर व्यसनाधीन असतो की , त्याला त्या व्यसनातून बाहेर काढणे जवळ जवळ अशक्य असते.
कांही घरातून एखादी व्यक्ती एवढी भयंकर तर्कटी , हेकेखोर असते की , त्यांना इतरांच्या मनाशी आणी मताशी कांहीही घेणंदेणं नसतं.
आणी मग ?
हाताबाहेर गेलेल्या व्यक्तींच्या घरात चालू होतो... एक भयंकर उच्छाद...जो कधिही संपत तर नाहीच.
उलट ह्या उच्छादामुळे संपूर्ण परिवाराच्या नाकी नऊ येतात.तर कांही परीवार यामुळे अगदी पार उध्वस्त ही होतात.
अशा भयंकर प्रसंगामुळे अनेक कुटुंबे , परीवार बरबाद होतात , उध्वस्त होतात.
सैरभैर घरं आणी सैरभैर माणसे.?
कुणाचा पायपोस कुणाला नाही.?
आणी कुणी कुणाचं ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही.?
संवाद नाही तर सतत वाद आणी भांडणे , संघर्ष.
आणी त्यातून निर्माण होणारे भयंकर ताण तनाव.
अशा घरातून अनेक माणसे अक्षरशः वेडी होतात , कुणी आत्महत्या करतात.तर कुणी कायमचेच घरदार सोडून निघून जातात.
समाजात असं ब-याच वेळा घडतं.ब-याच जणांच्या आयुष्यात ही घडतं. आणी सैरभैर माणसे ? हताश होऊन पार उध्वस्त होतात.
आणी याला उत्तर ? कांहीही नसतं.
हे असं का घडतं ?
हा एक अनुत्तरित प्रश्न जरूर आहे.
आणी अशा भयंकर समस्येवर उत्तर , उपाय काय आहे ? हे ही कुणी सांगू शकत नाही.
तुटलेली मनं जोडण्याचा कायद्यामध्ये सुध्दा कांहीही पर्याय नाही.
हेकेखोर माणसं ? उध्वस्त मनं ? सैरभैर विचार ? याला विज्ञानात तरी कांहीं उत्तर सापडंत का ? नाही...!
अध्यात्म , दैवी उपाय योजना , मंत्र शक्तीचा प्रभाव , यामुळे कदाचीत अशक्य गोष्टी शक्य करता येतीलही.
पण ?
मनुष्य प्राणी सहजासहजी आध्यात्माकडे वळतो का ? अगदी उध्वस्त झाला तरी ?
नाही...!
हा प्रारब्ध भोग असू शकेल का ?
कदाचित !
कांहीं तांत्रिक प्रयोग , तांत्रिक क्रीया करून , असे परिवार , अनेक घरे ? उजाड , उध्वस्त केली जाऊ शकतात का ?
हो...असे अनेक निंदनीय प्रकार समाजामध्ये घडू शकतात.
कारण ?
भयंकर सामाजिक अंध:पतन...!
आज आपला समाज सुध्दा... ?
खूप प्रमाणात विकृत , असभ्य , असंस्कृत बनत चालला आहे का ?
होय...!
कारणे कांहीही असोत.
पण आजच्या घडीला सामाजिक अंध:पतन हे खूप वेगाने व प्रचंड प्रमाणात वाढते आहे.
एकमेकांच चांगलं झालेलं , कुणाचं बरं चाललेलं , कुणाचं भलं झालेलं आज ब-याच जणांना बघवत नाही , सहनही होत नाही.
समाजातील सहनशीलता , सोशीकता जवळ जवळ संपुष्टात आली आहे.
जो समजुतदार आहे तो ?
भरडला जातोय , क्रूरपणे चिरडला जातोय.
हे नेमके कशाचे प्रतीक आहे ? आणी हे नेमके का घडतंय याचा विचार करायला देखील आज कुणालाही वेळ नाही.?
ज्या कुटुंबातली अथवा समाजातली आत्मीयताच मरते तो समाज ? नक्कीच अंध:पतनाकडेच ओढला जातो.
आज घराघरातले कलह , समाजातील मतभेद , ढासळत चाललेली सामाजिक मानसिकता , एकमेकांबद्दल वाढत चाललेला वैरभाव ?
हे कशाचे द्योतक आहे ?
कुटुंबची कुटुंब उध्वस्त झाली की ? अनायासे समाज ही उध्वस्त होतो.
आणी ? समाज उध्वस्त झालेल्या देशाचे भवितव्य काय असू शकते ? हे सांगायला कोण्या ज्योतिषाची अथवा तर्कशास्त्राची गरज नाही.
किंवा कोणी मानसोपचार तज्ज्ञ देखील यावर उत्तर सांगू शकत नाही.
दुभंगलेली मनं , दुभंगलेली कुटुंब व्यवस्था , दुभंगलेले समाजमन , दुभंगलेली समाज व्यवस्था साधण्यासाठी व यावर उपाय योजना करण्यासाठी निदान आज तरी उत्तर नाही.
कायदेशीर पण नाही आणी ? तार्किक पण नाही.
एकंदर काय तर ?
हाताबाहेर चाललेली माणसं , हाताबाहेर चाललेली कुटुंब व्यवस्था , हाताबाहेर चाललेली समाज व्यवस्था आणी त्यातून होत असलेले नैतिक अध:पतन आणी होत असणारी भयंकर हानी याला निदान आज तरी उत्तर सापडत नाही.
सैरभैर माणसं , सैरभैर कुटुंब , सैरभैर समाज आणी सैरभैर देश ?
या सगळ्यावर विजय मिळवून एक नवीन समाज व्यवस्था घडवण्यासाठी ?
कोणी समाज सुधारक ? एखादा क्रांतिकारक तरी काय करू शकणार ?
संत महात्मे सुद्धा आज अशा भयंकर आणी विचित्र , विक्षीप्त समाज रचनेपुढे हतबल होतील.
त्यामुळेच आज बव्हंशी सज्जन शक्ती हताश व उदास आहे...
दुभंगलेली मने साधण्यासाठी आणी ? ती पुन्हा जोडण्यासाठी आज एखाद्या अवतारी पुरूषाची खरंच गरज आहे का ??
की ? ज्यावेळी समाजात असं आक्रीत घडायला लागतं ? त्यावेळी तो समाज ?
विनाशाकडे वाटचाल करत असतो का ?
प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्ण सुध्दा कौरव पांडवांचा विनाश रोखू शकला नाही अथवा थांबवू शकला नाही तर मग ?
हा चाललेला भयंकर कौटुंबिक , सामाजिक उद्रेक ? काळाचाचं महिमा आहे का ?
यांचं उत्तर मात्र फक्त आणी फक्त नियतीच देऊ शकेल.
पण अशा भयावह परिस्थिती मध्ये सज्जन शक्ती भयंकर भरडली जाते आहे ? याला निदान आज तरी उत्तर नाही...!
*कालाय तस्मै नमः*
🙏🙏🙏🕉️
Comments
Post a Comment